अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार सन २०१८-१९ साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ता धारक पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती online योजनचे e अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
सन २०१८-१९ या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर आपले अर्ज केवळ online भरावयाचे आहेत. सन २०१७ -१८ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे अशा सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Renewal Student म्हणून भरावयाचे आहेत.तसेच नवीन विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh Student म्हणून भरावयाचे आहेत. प्रि-मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचे online अर्ज भरावयाची मुदत खालीलप्रमाणे आहे.
*नवीन Fresh विद्यार्थी :- दि.23 जुलै २०१८ ते ३0 सप्टेंबर २०१८*
*नुतनीकरण Renewal विद्यार्थी :- दि. 23 जुलै २०१८ ते ३0 सप्टेंबर २०१८*
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र लाभार्थी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज online पध्दतीने भरण्याची जबाबदारी *संबंधित शाळांच्या* *मुख्याध्यापकांची* आहे.
*एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.*
राज्यातील ज्या शाळांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी NSP 2.0 या पोर्टल वर अद्यापही नोंदणी (Add) / (Registration) केलेली नाही व ज्या शाळांकडे Institue ID व password नसेल अशा शाळांनी मा.शिक्षणाधिकारी(माध्य.)यांचेकडे शाळेचे पत्र देऊन शाळा नोंदणी करुन घ्यावयाची आहे.
*शिक्षणाधिकारी (माध्य.)*
*जिल्हा परिषद,अहमदनगर*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
*टिप:- सन २०१७-१८ साठी शिष्यवृत्ती धारक Renewal विद्यार्थ्यांची यादी आपापल्या शाळा / Institute लॉगीनला उपलब्ध करुन दिलेली आहे.*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
No comments:
Post a Comment