THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 4 September 2018

*स्वच्छ भारत पंधरवडा*
1 सप्टेबर ते 15 सप्टेबर 2018.
मा. पंतप्रधान महोदयांनी 2 आक्टोबर 2019 पर्यंत Clean India ध्येय साध्य करावयाचे ठरविले आहे.
शासन निर्णय 4 ऑगष्ट 2017 व 16 ऑगष्ट 2018 नुसार राज्यातील सर्व शाळामधून स्वच्छता पंधरवडा साजरा करावयाचा आहे. सर्व शाळांमधून खालीलप्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात यावे.
1) स्वच्छता शपथ - 1 सप्टेबर रोजी सर्व शाळा व संस्थामधून स्वच्छतेची शपथ घ्यावी तसेच यानंतर दररोज सकाळी शालेय परिपाठामधून ही शपथ घेण्यात यावी. - सहभाग सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी.
2) शाळा व्यवस्थापन समिती बैठक - पंधरवड्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ बैठक घेऊन स्वच्छतेचे महत्व सांगणे.
3) स्वच्छता विषयक सुविधा - शाळा व संस्थेतील स्वच्छता विषयक सुविधांची तपासणी करावी. त्या अद्ययावत कराव्यात. आवश्यकता वाटल्यास दुरुस्ती प्रस्ताव सादर करावे.
4) स्पर्धांचे आयोजन - जिल्हा/तालुका स्तरावर स्वच्छ परीसर , स्वच्छ शाळा स्वच्छ शौचालय स्पर्धांचे आयोजन करावे.
5) चित्रकला स्पर्धा - स्वच्छतेवर आधारीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे.
6) वादविवाद स्पर्धा - स्वच्छतेवर आधारीत वादविवाद स्पर्धेचे आयोजन करावे.
7) स्वच्छता संदेश - शाळा व गावामध्ये स्वच्छता संदेश लिहावेत.
8) छायाचित्रे - शाळेच्या व संस्थेच्या वेबसाईटवर स्वच्छते विषयक छायाचित्रे प्रकाशित करावी. बॅनर्स लावावेत.
9) परीसर स्वच्छता - शालेय परीसर व शाळेच्या जवळचा परीसर स्वच्छ करण्यात यावा.
10) स्वच्छ भारत गीताचे प्रसारण करण्यात यावे.
11) विद्यार्थी राजदूत - स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विद्यार्थी राजदूत (Student Ambassadors) यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.
12) पंधरवडा अहवाल- स्वच्छता पंधरवडा दिनांक व त्या दिनांकास घेतलेल्या उपक्रम याबद्दलचा अहवाल सादर (मोजक्या फोटोसह) करावा.

No comments:

Post a Comment