THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

लेझीम माहिती -

लेझीम  माहिती -

           क्रीडाप्रकार , साधन, व्यायाम व मनोरंजन अश्या सर्व प्रकारांसाठी लेझीम खेळतात. ‘लेझम’ या मूळ फारशी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता लेझीमच्या आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सुमारे २ १/२ हात लांब (वेळू ) घेऊन त्याला २ हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून ही लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत आणि व्यायाम करतानाच साखळी अडकवित असून धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरायच्या जड लेझीमची तार वजनदार असे. लेझिमचे निरनिराळे हात करून ही मेहनत केली म्हणजे हाताला व्यायाम होत असे. हा खेळ खास महाराष्टीय असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून ती रूढ आहे. हा खेळ गुजरात मध्ये ही खेळला जातो.
हल्लीची लेझीम सुमारे ३८ ते ४५ सें.मी. लांब लाकडी दांडयाचे असून त्या दांडयाला दोन्ही टोकांना कोयंडे बसवून लोखंडी कड्यांची साखळी जोडलेली असते. हातात धरता येण्यासाठी मध्यभागी हाताच्या चार बोटात बसेल एवढी असते. सळईसारखी लोखंडी मुठ असते. साखळीतील लोखंडी कड्यामध्ये, नादध्वनी निर्माण व्हावा म्हणून पत्र्याच्या दोन-तीन चकत्या बसवलेल्या असतात. लेझीमचे वजन अदांजे ०.७८ ते ०.९० किग्रॅ असते. लेझीम चा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळे उलटसुलट वर्तुळ रचित पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येऊन, दोनचारच्या रांगा करून संचलन इत्यादी सर्व हालचालीमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्यायात येतो. यामध्ये उडया मारणे, उकीडवे बसणे, वाकणे, पावले तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत नर्तकाचे दोन्ही जात गुंतलेले असल्याने हाताच्या हालचाली नियंत्रित होतात. लेझीम नृत्याची प्रत्येक हालचाल लेझीमच्या ठेक्याशी सुसंगतरित्या केली जाते. लेझीम नुत्य हलगी, ढोल,झांजा,ताशा या वाद्यांच्या किंवा आधुनिक बॅन्डच्या साथीवर केले जाते. ग्रामीण देवदेवताच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्र, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे पहावयास मिळतात.

No comments:

Post a Comment