THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

स्क्रीन शॉट

स्क्रीन शॉट

कॉम्प्युटरचा स्क्रीन शॉट कसा घ्यावा  



स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. 
त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील ‘प्रिंट स्क्रीन’ ही की दाबावी. त्यानंतर minimize करून ‘पेंट’  ओपन करून त्यामध्ये ‘पेस्ट’ करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर (SAVE AS JPG) त्याला ईमेज म्हणून ‘सेव्ह’ करावं.
तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अँक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास ‘अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन‘ दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता. स्क्रीन शॉट साठी काही software देखील आहेत . उदा free screen recorder . असे बरेच आहेत . आपण google वर search करू शकता . software वर घेतलेला स्क्रीन शॉट one click असतो व थेट galary मध्ये save होतो .

अँण्ड्रॉईड मोबाईल चा स्क्रीन शॉट


अँण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम डाऊनआणि पॉवर हे *दोन्ही बटण एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो.
स्क्रीनशॉट घेतला की तो फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अँपमध्ये सेव्ह होतो.
जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अँण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.काही मोबाईल च्या वेगळ्या पद्धती असू शकतील .मोबाईल मध्ये short cut देखील असू शकतो .

No comments:

Post a Comment