पायाभूत चाचणी स्वरूप व पूर्वतयारीपायाभूत चाचणी स्वरूप व पूर्वतयारीपायाभूत चाचणीचे पेपर शासन आपणास उपलब्ध करुन देणार आहे.आतापर्यंत झालेल्या इतर चाचण्या व पायाभूत चाचण्या यात फरक काय असे वाटणे साहजिकच आहे, मात्रहे लक्षात घ्या या चाचणीचे मार्क आपणास तात्काळ अॉनलाइन फिड करायचे आहेत तसेच या चाचणीचे त्रयस्तयंत्रणेकडून मुल्यमापन होणार आहे. परंतु काळजी करु नका यात शिक्षकावर कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष कारवाई नाही.पण आपण विद्यार्थ्याचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करायचे आहे. आपण आता आपल्याविद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारायची आहे.आपण घेतलेल्या व ञयस्त यंञणेने घेतलेल्या चाचणीत तफावत येऊ नये.आपण सप्टेबर तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात राज्यभर पायाभूत चाचणी घेणार आहोत. मुलांना काय येते, कोठे मदतीची गरज आहे ते शोधण्यासाठी या चाचण्या आहेत. शिक्षकांनी आपापल्या वर्गात त्या घ्यायच्या आहेत. या चाचणीचा बाऊ होणार नाही, वातावरण आश्वासक असेल, प्रात्यक्षिक-लेखी प्रश्न सोडवताना मुलांना मजा येईल, आणि एखादी न येणारी गोष्ट चाचणी देता-देता मूल सहज शिकेल अशी अपेक्षा आहे.मुलांची गणिताची समज, कौशल्ये, विचारक्षमता तपासण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न यात आहेत. मुलांना कदाचित या प्रकारच्या प्रश्नांचे अनुभव याआधी मिळाले नसतील.चाचणीच्या प्रश्न प्रञिका शाळेवर मिळाल्या आहेत .तशा प्रश्नाचा सराव आपण घ्यावा . म्हणजे मुलांना त्या गोष्टी चाचणीत करता येतील. या चाचण्या अजिबात गोपनीय नाहीत. चाचणीतील विशिष्ट प्रश्नांची उत्तरे पाठ करून घेऊ नयेत, इतकेच.संख्यांची समज तपासताना केवळ संख्येचे वाचन लेखन तपासून पुरत नाही. ती संख्या म्हणजे नेमके किती, ते शतक-दशक-एकक प्रतीके वापरून दाखवता आले पाहिजे. तुमच्या शाळेत नेहमी जी प्रतीके वापरली जात असतील, उदा. काड्यांचे गठ्ठे-सुटे, मणी-माळा, दहाच्या व एकच्या नोटा, दांडे-सुटे, ती जास्त संख्येने जमवून ठेवा. जी प्रतीके तुम्हाला सोयीचीवाटतील ती वापरा. एक, दहा, शंभर, हजारच्या खोट्या नोटा जमवा अथवा कार्डांवर लिहून मुलांच्या मदतीने तयार करा. प्रतीके वापरून संख्या तयार करणे, जमिनीवर अथवा पाट्यांवर आखलेल्या घरांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे याचा पुन्हा सराव घ्या.या चाचणीत पुढील प्रकारचे प्रात्यक्षिक, मनात विचार करून उत्तर लिहिण्याचे किंवा लेखी प्रश्न असतील.-ऐकलेली संख्या प्रतीके वापरून दाखवणे, अंकातील संख्या वाचून प्रतीके देणे, प्रतीके पाहून संख्येचे नाव सांगणे.-आयतातील चौकटी मोजून गुणाकार लिहिणे.-मोजपट्टीच्या सहाय्याने लांबी मोजणे, टेलरिंग टेपच्या सहाय्याने लांबी, परिमिती मोजणे.-कोनमापकाच्या सहाय्याने कोन मोजणे व दिलेल्या मापाचा कोन काढणे.-कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे.-रंगवलेला भाग अंश छेद रूपात व दशांशात लिहिणे, सांगितलेला अपूर्णांक रंगवणे.यासारख्या गोष्टींचा चाचणीपूर्वी सराव घ्या.लेखी चाचणीतील प्रश्नही थोडे निराळ्या प्रकारचे असू शकतील. इयत्ता दुसरी व तिसरीच्या मुलांसाठी एक एक प्रश्न वाचत तो प्रश्न समजावून सांगा व मग सोडवायला सांगा. उत्तराचा क्ल्यू न देता प्रश्न समजावा. अगदी आठवीपर्यंतच्या मुलांना गरज असेल तेथे प्रश्न वाचून दाखवा. उत्तरामध्ये मांडणी, रीत, शुद्धलेखन यातले काहीही तपासायचे नाही. फक्त गणिताची समज तपासायची आहे. त्यामुळे उत्तर आले किंवा नाही आले इतकेच पहायचे आहे.मुलांना वरील प्रकारचे अनुभव देऊन चाचणीपूर्वी जरूर सराव घ्या. पण इतके लक्षात ठेवा की चांगला रिझल्ट दाखवण्यासाठी आपण ही चाचणी घेत नाही. आपण कोठे आहोत ते पाहून पुढील काम आखण्यासाठी घेत आहोत.
Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
Please give me a question papers format of 5th math
ReplyDelete