शाळासिद्धी
शाळासिध्दी विषयाशी अनेक शाळा व निर्धारकांकडून विचारणा होत आहे. सर्व निर्धारकांनी खालील माहीती शाळांना अवगत करावी. तसेच खाली दिलेल्या लिंकचा अभ्यास करुन काही सूचना व सुधारणा सुचवावयाच्या असल्यास मेल करावा.
विषय - शाळासिध्दी
शाळास्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावयाची कार्यवाही
1. सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूर्वक वाचन करावे.
2. “शाळासिद्धी” संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करण्यात यावे.
3. शाळा माहिती व दर्शक फलक (Dashboard) नुसार आपल्या शाळेची माहिती सात मुख्य क्षेत्र व 45 उपक्षेत्रानुसार तयार करण्यात यावी.शाळेची वस्तूनिष्ठ स्वरुपाची माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती तयार करुन ठेवावी. या माहिती बरोबरच माहितीची पुष्टी देणारे पुरावे , फोटो, चित्रफिती, रजिष्टर, अभिलेखे तयार करण्यात यावे.
4. शाळा – UDISE CODE युडायस कोडचा वापर करुन शाळेचा पासवर्ड असलेला लॉग इन आय डी (Login ID) शाळा तयार करु शकते. यासाठी शाळेने LOGIN ID म्हणून शाळेचा UDISE कोड टाकावा. शाळेचे gmail खात्याचा समावेश करावा. पासवर्ड शाळेनेच निवडून तो टाकावा. त्यानंतर हाच पासवर्ड जतन करावा व प्रत्येक लॉग इन च्या वेळी वापरावा.आपल्या शाळेचे खाते अशाप्रकारे उघडून शाळा स्वयं मूल्यमापन विषयक सर्व माहिती भरावी व save करावी. काही बदल नसल्यास final submit करावी. Final submit केल्यानंतरच सदरची माहिती इतरांना दिसेल याची नोंद घ्यावी.
5. शाळेची माहिती व बाह्यमूल्यमापनाची तयारी पूर्ण झाल्यावर शाळेने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडे शाळा बाह्य मूल्यमापन व समृध्दशाळा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर 1 महिण्याच्या आत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे कडून शाळा बाह्य मूल्यमापन निर्धारकांकडून करण्यात येईल. निर्धारणाच्या वेळी शालेय माहितीशी संबंधित सर्व माहिती, पुरावे व अभिलेखे निर्धारकांना उपलब्ध करुन देणे शाळांना बंधनकारक आहे.
6. बाह्य मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित शाळा ही समृध्द शाळा निकष पुर्तता करीत असल्यास नियोजित तारखांना शाळेचे प्रमाणपत्र “समृध्दशाळा – 2016” अर्थात“SS- 2016”वितरीत केले जातील.
7. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी dir.mscert@gmail.com व shalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
8. सर्व माहिती भरुन झाल्यावर खालील लिंक मध्ये देखील माहिती भरण्यात यावी.
http://goo.gl/forms/omIiwWETqXTBvlw73
शाळांसाठी आचारसंहिता – शाळा माहितीचे प्रपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सात क्षेत्रे व 45 उपक्षेत्राची माहिती तयार करुन ठेवावी.चूकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.शाळा निर्धारणासाठी येणा-या निर्धारकांना कोणत्याही कामाची किंवा नोंदीची सक्ती करु नये.निर्धारकांना आवश्यक त्या माहितीचे रजिष्टर्स,दाखले,पुरावे व अभिलेखे पाहण्यासाठी उपलब्ध करुन द्यावे. निर्धारक, कामकाज याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.
शाळा बाह्य मूल्यमापनासाठी आवश्यक निर्धारक (Assesoors )निर्मिती व कार्यपध्दती
1. निर्धारक म्हणून काम करण्यास इच्छूक व्यक्तीने सर्व प्रथम शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता शाळा सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय शैगुवि/2016/(12/2016)/एसडी-6 दिनांक 30 मार्च, 2016 चे काळजीपूरक वाचन करावे.
2. निर्धारक निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहिती भरावी. सदर लिंकनुसार प्राप्त अर्जामधून निर्धारकांची निवड केली जाईल. निवड करतांना निर्धारकाचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कामाचा विचार केला जाईल.
3. गुगल फॉर्म लिंक फक्त असेसर करिता -
http://goo.gl/forms/gE6Hm1dbKacoDc6s2
4. निर्धारकांनी “शालासिध्दी”संदर्भातील school Evaluation या Dashboard (दर्शक फलक) वर केंद्र शासनाच्या www.nuepa.org,www.nuepa.eduplan.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीचे वाचन करावे.
5. निर्धारकांसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच शाळा बाह्य मूल्यमापन करण्यासाठी निर्धारक म्हणून कामकाज करता येईल. निर्धारकांसाठी विद्या परिषदेने नियोजित केलेल्या तारखांना संबंधित शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे अनिवार्य राहील.
6. शाळा सिध्दी- समृध्दशाळा या विषयाशी संबंधित पत्र व्यवहारासाठी dir.mscert@gmail.com व shalasiddhimaha@gmail.com या मेल ॲड्रेस चा वापर करावा.
निर्धारकांसाठी आचारसंहिता – 1.शाळा स्वयं मूल्यमापन व शाळा बाह्य मूल्यमापन याबाबत योग्य ती गोपनियता पाळण्यात यावी.विद्या परिषदेने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

No comments:
Post a Comment