THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 14 September 2018

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
*अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2018-19*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

      आपणास सूचित करण्यात  येते की, अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार  सन २०१८-१९ साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ता धारक पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनचे online अर्ज  भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
           सन २०१८-१९ या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर आपले अर्ज केवळ online भरावयाचे आहेत. सन २०१७ -१८  या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे अशा सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी आपले अर्ज  Renewal Student म्हणून भरावयाचे आहेत.तसेच नवीन विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh Student म्हणून भरावयाचे आहेत. प्रि-मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचे online अर्ज भरावयाची मुदत खालीलप्रमाणे आहे.

  *नवीन Fresh विद्यार्थी :- दि.23 जुलै २०१८  ते ३0  सप्टेंबर २०१८*    
                                                                                
  *नुतनीकरण Renewal विद्यार्थी   :-  दि. 23 जुलै २०१८  ते ३0  सप्टेंबर २०१८*
         
     शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र लाभार्थी असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज online पध्दतीने भरण्याची जबाबदारी *संबंधित शाळांच्या* *मुख्याध्यापकांची* आहे.
*एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.*

       राज्यातील ज्या शाळांनी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी NSP 2.0 या पोर्टल वर अद्यापही नोंदणी (Add) / (Registration) केलेली नाही व  ज्या शाळांकडे Institue ID व password  नसेल अशा शाळांनी मा.शिक्षणाधिकारी(माध्य.)यांचेकडे शाळेचे पत्र देऊन शाळा नोंदणी करुन घ्यावयाची आहे.

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
*टिप:- सन २०१७-१८ साठी शिष्यवृत्ती धारक  Renewal  विद्यार्थ्यांची यादी आपापल्या शाळा / Institute लॉगीनला उपलब्ध करुन दिलेली आहे.*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷

No comments:

Post a Comment