विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळांसाठी महत्वाचे निवेदन - हे सर्वदूर पोहोचवायला मदत करा.
ll विद्यार्थ्यांसाठी
अक्षर मानव रोजनिशी स्पर्धा २०१८ ll
- स्पर्धेला कसलेही प्रवेश शुल्क नाही.
- स्पर्धेचा वयोगट इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी
- करायचे इतकेच - १ नोव्हेम्बर २०१८ ते ३० नोव्हेम्बर २०१८ या दरम्यान विद्यार्थ्यांनी रोज आपली रोजनिशी लिहायची. त्यात दिवसभर काय केले, भोवती काय घडले, मनाशी कोणते विचार आले असे सगळे काही लिहायचे. असे न कंटाळता ३१ दिवस लिहीत राहायचे.
- अटी अशा : रोजनिशी फक्त मराठीत लिहायची. एकही दिवसाचे पान कोरे सोडायचे नाही. एका दिवसात एकच पान लिहिले पाहिजे असे नाही, जास्त पाने लिहिली तरी चालतील. फार खाडाखोड करायची नाही.
- मग : पूर्ण महिनाभर लिहिलेली रोजनिशी तारीख १ ते १५ डिसेम्बर २०१८ पर्यंत आपला पूर्ण पत्ता, नाव, वय, वर्ग, शाळा अशी माहिती लिहून अक्षर मानवच्या पत्त्यावर पाठवायची. शाळांनीं मिळून अनेक विद्यार्थ्यांच्या रोजनिशी एकत्र पाठवल्या तरी चालतील.
- बक्षीस : सर्वात चांगल्या ठरणाऱ्या पाच रोजनिशींना प्रत्येकी रुपये ५०००, सन्मानपत्र दिले जाईल. उल्लेखनीय रोजनिशींना सन्मानपत्र दिले जाईल.
- फायदा : रोजनिशी स्पर्धेत भाग घेऊन बघा, आपोआप अनेक फायदे झालेलेे कळतील.
जमले तर एक गोष्ट करायची - आपल्या लिहून झालेल्या रोजनिशीची झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवायची. भविष्यात या रोजनिशी स्वतःचा इतिहास म्हणून उपयोगी पडतील. स्पर्धेनंतर आपल्या मूळ रोजनिशी अक्षर मानवकडून परत मागवू शकता.
रोजनिशी पाठवायचा पत्ता : अक्षर मानव, ९५९, पवनपुत्र, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे ४११००२
- माहितीसाठी संपर्क : ९५५२५१६५१३
aksharmanav@yahoo.com
No comments:
Post a Comment