THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 24 September 2018

नमस्कार बंधू भगिनींनो असे म्हणतात की, "प्रिकोशन इस बेटर दॅन क्युअर' आपणास माहित आहेच की शैक्षणिक वर्ष 2018 सुरु होऊन 4 महिने झाले आहेत .तालुक्यात शाळा भेटी करताना काही ठिकाणी खूप चांगल्या उल्लेखनीय बाबी आढळून आल्या तर काही ठिकाणी अजूनही काही बाबींची पूर्तता होणे गरजेचे आहे चला तर मग आपला तालुका प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत अग्रेसर राहण्यासाठी  आपल्या शाळेत खालील बाबींची पूर्तता करू या .
वर्गस्तर व मुख्याध्यापक कार्यालय स्तर -
१) विद्यार्थी हजेऱ्या अद्ययावत करू या .
२) वर्गात दर्शनी भागात वार्षिक नियोजन,मासिकनियोजन, वेळापत्रक, शिक्षकपरीचय , अप्रगत विद्यार्थी यादी , विद्यार्थी व पालकांचे संपर्क नंबर यादी, वर्षभरात राबवायांचे प्रकल्प यादी, लावू या.
३) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे वर्गस्तरावरील सर्व अभिलेखे फाईल मध्ये ठेऊन त्यावर वर्ष ,इयत्ता व सर्वात वर गुण तक्ता लावू या. यावर्षीच्या पायाभूत चाचणीचा निकाल व पेपर अद्ययावत फाईल मध्ये ठेऊ या .
४) वर्गात किमान 10 घटकांवर आधारित स्वनिर्मित शै.साहित्य तयार करू या.
५) शासनाकडून प्राप्त विविध साहित्य पेट्यांचा वापर करून त्यांची टाचण वहीत नोंद ठेऊ या.
५) नियमित टाचण काढूया .
६) सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना अवतीभोवतीच्या परिसरा विषयीच्या सामान्य ज्ञानाची ओळख करून देऊ या गावचे सरपंच, ग्रामसेवक, पं. स सभापती, जि. प.अध्यक्ष ,शिक्षणाधिकारी, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान ,राष्ट्रपती इत्यादी सामान्य ज्ञान ओळख करून द्या.
७) दाखवलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अप्रगत निघू नयेत.शिवाय अप्रगत मुलांसाठी कृती आराखडा वर्गात दर्शनी भागात  लावावा.
८) शिक्षकांनी ओळखपत्र व मंगळवारचा गणवेश सक्तीने घालावा.
९) वर्गात मोबाईलवर बोलू नये तसेच वर्गात चार्जर वगैरे ठेऊ नये.
१०) डिजिटल साहित्याचा वापर करण्यात मुलांचा सहभाग घ्यावा.
११) वर्गाव्यतिरिक्त मुख्याध्यापकांनी सोपवलेली कामे उदा. विविध समित्या रजिस्टरे अद्यावत ठेवावी.विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांचा लाभ वर्गातील मुलाला मिळालाय का हे पाहावे .काही ठिकाणी लाभार्थींच्या सह्या राहिलेल्या असतात त्या घ्याव्यात.
१२) वर्ग सजावट करावी ,आवार स्वच्छता ठेवावी, शौचालय स्वच्छता ठेवावी, हॅन्डवॉश स्टेशनवर टॉवेल,व साबण असावा  , हात धुन्याच्या 6 सवयी मुलांना माहित असाव्यात, वैयक्तिक स्वच्छता कटाक्षाने पाहावी.
१३) वर्गातील बैठक व्यवस्था इंग्रजी सी आकारात असावी मधल्या मोकळ्या जागेत विविध कृती करण्यास जागा असावी.
१३) सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंद वहीत प्रथम सत्र अनुषंगाने निरीक्षणात्मक नोंदी करून घ्याव्यात, झालेल्या चाचण्यांचे गन नोंदवावे, पहिल्या तिमाहीचे वजन उंची घ्यावी व ती नोंदवावी, वर्गात घड्याळ असावे, शालेय पोषण आहार दर्जा अधिक चांगला राहण्यासाठी सामूहिक प्रयत्न व सहकार्य व्हावे. विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळतोकी नाही याकडे लक्ष द्यावे.१४)कला ,कार्यानुभव शा. शि.या अनुषणगाने घेतलेल्या उपक्रमांची नोंद टाचण वहीत घ्यावी,
१५)शाळेची वेळ कटाक्षाने पाळावी. (किमान पाऊण तास अगोदर उपस्थित राहावे)
१६) विद्यार्थी वाचनालय देवघेव रजिस्टर नोदवावे.
१७)मुलांना बोलते करावे शांत वर्ग हा सर्व कामावर पाणी फिरवतो.
१८) अध्ययन स्तर निश्चिती टप्पा 1 व 2 चा तक्ता वर्गात दर्शनी भागात लावावा.तसेच वर्ग किती टक्के प्रगत आहे त्याची माहितीदर्शनी भागात लावावी. वर्ग 100 टक्के प्रगत असेल तर ठळक अक्षरातील फलक वर्गाच्या बाहेरील बाजूस दिसेल असा लावावा.
बंधू भगिनींनो वरील प्रमाणे काटेकोर प्रमाणे  कामकाज करून पूर्ण झालेल्या बाबींची माहिती खालील नमुन्यात मुख्याध्यापकांकडे दोन ते तीन दिवसात सादर करावी
अ. नं|  वर्गाचा पट| प्रगत विद्यार्थी संख्या| अप्रगत विद्यार्थी संख्या| राबवलेल्याउपक्रमाचे नाव| उपक्रमाची सद्यस्थिती | (पूर्तता झाली/ नाही ) वर्गशिक्षक सही
१९) मुख्याध्यापकांनी कार्यालयीन सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवावेत.
२०) सर्व प्रकारची इतिवृत्ते संपूर्ण सदस्यांच्या स्वाक्षरीसहीत लिहुन पूर्ण करावेत.
२१) कार्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसवावी .
२२) शाळा सिद्धी उपक्रमात शाळेची श्रेणी दिसेल अशी दर्शनी भागात लावावी.
२३)शालेय आवारात धूम्रपान निषेध फलक लावावा.
कार्यालयात विविध समित्यांचे फलक व त्यांचा कार्यकाळ स्पष्ट दिसेल असे लावावेत .
वरील प्रमाणे कामकाज करून शाळा प्रगती पथावर नेण्यासाठी सांघिक योगदान द्यावे . आपण सर्वजण भरपूर एफर्ट्स घेत आहातच यापुढेही आपले सहकार्य राहील अशी अपेक्षा
     
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment