THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 30 September 2018

*Online Test*

*स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता .....*
- स्कॉलरशीप बुद्धिमत्ता

link  👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1)  या link ला click करा
2) तुमचे नाव लिहा
3) 20 प्रश्न येतील ...योग्य पर्याय निवडा व *शेवटी submit करा*
4) तुम्हाला किती गुण मिळाले ते पण पहा  ..

*link  👇🏻👇🏻  इथ click करा*

https://testmoz.com/1834504

=======================
Test Created By
*Sadhana Pawar*

🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜

Saturday 29 September 2018

*------- धाव शिक्षका धाव ----------*
💐📷📷📷📷💐
धाव शिक्षका धाव रे
शाळा सोडून सारा गाव रे

वर्गात शिकवायचे बंद कर
गल्ली बोळ फिरायचा छंद कर
खडू डस्टर हाती धरू नको
सरकारी योजना राबवीण्यास मागे सरू नको
नाहीतर गुन्हेगार म्हणून
होईल तुझे नाव रे
          धाव शिक्षका धाव रे...

जनगणनेची डोकी मोज
दारोदारी भेटी रोज
आधार , वोटिंग कार्ड जोडून दे
शेत जमीन खाते फोडून दे
गावकऱ्यांची सग�ळी कुंडली
तुलाच फक्त ठाव रे .       
धाव शिक्षका धाव रे

मतदारांची नोंदणी कर
डबल झालेली छाननी कर
शाळाबाह्य मुलांचा पुरावा आण
तोपर्यंत शाळेशी दुरावा मान
पाया पड, हात जोड
येथे सारे बाजीराव रे.      
धाव शिक्षका धाव रे

खुन दरोडा सारे पंचनामे
आता तुझ्या साक्षीने होणार आहेत
शाळे ऐवजी तुझी हजेरी
कोर्टात पोलीस घेणार आहेत
शिक्षण क्षेत्राबाहेर सगळीकडे
वाढला तुझा भाव रे
          धाव शिक्षका धाव रे

डी.एड,बी.एड आता आठवू नको
तसं शिकवायचं डोक्यात साठवू नको
खिचडी कामांची करीत रहा
त्यांचे मस्टर नीटनेटके भरीत रहा
इतक्या आघाड्यावर लढूनही शेवटी
तुझ्याच नावाने काव काव रे
. . . . .  धाव शिक्षका धाव रे
. . . . .  शाळा सोडून सारा गाव रे
🙏🙏🙏🙏🌇🌇🌇🙏🙏🙏🙏 (फॉरवर्ड करावी
अर्थातच कविता आवडली तर)

नमस्कार बंधू भगिनींनो असे म्हणतात की, "प्रिकोशन इस बेटर दॅन क्युअर' आपणास माहित आहेच की शैक्षणिक वर्ष 2018 सुरु होऊन 4 महिने झाले आहेत .तालुक्यात शाळा भेटी करताना काही ठिकाणी खूप चांगल्या उल्लेखनीय बाबी आढळून आल्या तर काही ठिकाणी अजूनही काही बाबींची पूर्तता होणे गरजेचे आहे चला तर मग आपला तालुका प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत अग्रेसर राहण्यासाठी  आपल्या शाळेत खालील बाबींची पूर्तता करू या .
वर्गस्तर व मुख्याध्यापक कार्यालय स्तर -
१) विद्यार्थी हजेऱ्या अद्ययावत करू या .
२) वर्गात दर्शनी भागात वार्षिक नियोजन,मासिकनियोजन, वेळापत्रक, शिक्षकपरीचय , अप्रगत विद्यार्थी यादी , विद्यार्थी व पालकांचे संपर्क नंबर यादी, वर्षभरात राबवायांचे प्रकल्प यादी, लावू या.
३) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे वर्गस्तरावरील सर्व अभिलेखे फाईल मध्ये ठेऊन त्यावर वर्ष ,इयत्ता व सर्वात वर गुण तक्ता लावू या. यावर्षीच्या पायाभूत चाचणीचा निकाल व पेपर अद्ययावत फाईल मध्ये ठेऊ या .
४) वर्गात किमान 10 घटकांवर आधारित स्वनिर्मित शै.साहित्य तयार करू या.
५) शासनाकडून प्राप्त विविध साहित्य पेट्यांचा वापर करून त्यांची टाचण वहीत नोंद ठेऊ या.
५) नियमित टाचण काढूया .
६) सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना अवतीभोवतीच्या परिसरा विषयीच्या सामान्य ज्ञानाची ओळख करून देऊ या गावचे सरपंच, ग्रामसेवक, पं. स सभापती, जि. प.अध्यक्ष ,शिक्षणाधिकारी, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान ,राष्ट्रपती इत्यादी सामान्य ज्ञान ओळख करून द्या.
७) दाखवलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अप्रगत निघू नयेत.शिवाय अप्रगत मुलांसाठी कृती आराखडा वर्गात दर्शनी भागात  लावावा.
८) शिक्षकांनी ओळखपत्र व मंगळवारचा गणवेश सक्तीने घालावा.
९) वर्गात मोबाईलवर बोलू नये तसेच वर्गात चार्जर वगैरे ठेऊ नये.
१०) डिजिटल साहित्याचा वापर करण्यात मुलांचा सहभाग घ्यावा.
११) वर्गाव्यतिरिक्त मुख्याध्यापकांनी सोपवलेली कामे उदा. विविध समित्या रजिस्टरे अद्यावत ठेवावी.विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांचा लाभ वर्गातील मुलाला मिळालाय का हे पाहावे .काही ठिकाणी लाभार्थींच्या सह्या राहिलेल्या असतात त्या घ्याव्यात.
१२) वर्ग सजावट करावी ,आवार स्वच्छता ठेवावी, शौचालय स्वच्छता ठेवावी, हॅन्डवॉश स्टेशनवर टॉवेल,व साबण असावा  , हात धुन्याच्या 6 सवयी मुलांना माहित असाव्यात, वैयक्तिक स्वच्छता कटाक्षाने पाहावी.
१३) वर्गातील बैठक व्यवस्था इंग्रजी सी आकारात असावी मधल्या मोकळ्या जागेत विविध कृती करण्यास जागा असावी.
१३) सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंद वहीत प्रथम सत्र अनुषंगाने निरीक्षणात्मक नोंदी करून घ्याव्यात, झालेल्या चाचण्यांचे गन नोंदवावे, पहिल्या तिमाहीचे वजन उंची घ्यावी व ती नोंदवावी, वर्गात घड्याळ असावे, शालेय पोषण आहार दर्जा अधिक चांगला राहण्यासाठी सामूहिक प्रयत्न व सहकार्य व्हावे. विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळतोकी नाही याकडे लक्ष द्यावे.१४)कला ,कार्यानुभव शा. शि.या अनुषणगाने घेतलेल्या उपक्रमांची नोंद टाचण वहीत घ्यावी,
१५)शाळेची वेळ कटाक्षाने पाळावी. (किमान पाऊण तास अगोदर उपस्थित राहावे)
१६) विद्यार्थी वाचनालय देवघेव रजिस्टर नोदवावे.
१७)मुलांना बोलते करावे शांत वर्ग हा सर्व कामावर पाणी फिरवतो.
१८) अध्ययन स्तर निश्चिती टप्पा 1 व 2 चा तक्ता वर्गात दर्शनी भागात लावावा.तसेच वर्ग किती टक्के प्रगत आहे त्याची माहितीदर्शनी भागात लावावी. वर्ग 100 टक्के प्रगत असेल तर ठळक अक्षरातील फलक वर्गाच्या बाहेरील बाजूस दिसेल असा लावावा.
बंधू भगिनींनो वरील प्रमाणे काटेकोर प्रमाणे  कामकाज करून पूर्ण झालेल्या बाबींची माहिती खालील नमुन्यात मुख्याध्यापकांकडे दोन ते तीन दिवसात सादर करावी
अ. नं|  वर्गाचा पट| प्रगत विद्यार्थी संख्या| अप्रगत विद्यार्थी संख्या| राबवलेल्याउपक्रमाचे नाव| उपक्रमाची सद्यस्थिती | (पूर्तता झाली/ नाही ) वर्गशिक्षक सही
१९) मुख्याध्यापकांनी कार्यालयीन सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवावेत.
२०) सर्व प्रकारची इतिवृत्ते संपूर्ण सदस्यांच्या स्वाक्षरीसहीत लिहुन पूर्ण करावेत.
२१) कार्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसवावी .
२२) शाळा सिद्धी उपक्रमात शाळेची श्रेणी दिसेल अशी दर्शनी भागात लावावी.
२३)शालेय आवारात धूम्रपान निषेध फलक लावावा.
कार्यालयात विविध समित्यांचे फलक व त्यांचा कार्यकाळ स्पष्ट दिसेल असे लावावेत .
वरील प्रमाणे कामकाज करून शाळा प्रगती पथावर नेण्यासाठी सांघिक योगदान द्यावे . आपण सर्वजण भरपूर एफर्ट्स घेत आहातच यापुढेही आपले सहकार्य राहील अशी अपेक्षा
     
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*_👨‍⚖बँक खाते सिम कनेक्शन साठी आधार अनिवार्य नाही_*

*IN NAGAR*
_Stay Connected... Stay Updated_

_आधारच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये तीन न्यायमूर्तींनी बहुमताने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला. सोबतच काही अटीही घातल्या आहेत. बँकिंग आणि मोबाईल सेवांसाठी आधार अनिवार्य नसेल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही सुप्रीम कोर्टाने निकाल वाचन करताना दिला._

*_🤔आधार कुठे गरजेचं?_*
◼सरकारी योजना
◼सरकारी अनुदान
◼पॅन कार्ड लिंकिंग
◼आयटी रिटर्न

*_💁‍♂इथे आधारची गरज नाही_*
◼बँक अकाऊंट उघडण्यासाठी
◼मोबाईल सेवा
◼शाळा, विविध परिक्षा
◼मोबाईल वॉलेटसाठी आधारची गरज नाही
◼सर्व शिक्षा अभियानासाठी गरज नाही

💥💥

*संचमान्यतेसाठी तातडीने पुर्ण करावयाची कामे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
**
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

_कालच्या VC तील सुचनेनुसार यावर्षी ३० सप्टेंबर च्या ऑनलाईन पटावर संचमान्यता होणार असल्याने प्रत्येक शाळेने आपला Student portal वरील ऑनलाईन पट चेक करावा व तो आपल्या हजेरीशी जुळतोय का याची खात्री करावी._

*जर पट जुळत नसेल तर.*👇

♻ _दुस-या शाळेतून आपल्याकडे आलेल्या मुलांना तात्काळ Reqest send करावी._

_त्यांनी त्या Request त्वरीत Approve कराव्यात यासाठी पाठपुरावा करावा._

♻ _आपल्या ऑनलाईन पटावर जर अशी काही मुलं दिसत असतील की जे आपल्या शाळेत नाहीत परंतु Student portal वर दिसतात अशा मुलांना Out of school करावे._

♻ _वरील प्रक्रिया करून सुद्धा काही विद्यार्थी Request पाठवायला कोणत्याही शाळेत दिसत नसतील तर अशा विद्यार्थ्यांची BEO LOGIN वरून NEW ENTRY TAB घेऊन नवीन Entry करावी._

♻ *_काही शाळांनी यावर्षी नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू केला आहे व जि प ने तो वर्ग सुद्धा Student portal ला Add केलेला आहे.परंतु ते विद्यार्थी अद्यापही त्या वर्गात न दिसता Dropbox मध्येच दिसत आहेत._*

_या मुलांना पुढील पद्धतीने त्या वर्गाच्या पटावर आणावे._👇

_उदा. एखाद्या शाळेने यावर्षी ५ वी चा वर्ग नव्याने सुरू केला असेल तर._

_Attach tab मधून आपल्याच शाळेचा युडायस टाकून त्यांना request send करा... Request टाकताना जनरल रजिस्टर नंबर तात्पुरता दुसरा टाका...(कोणत्याही विद्यार्थ्यांना न दिलेला).नंतर आपल्याच लॉगिन वरून request approve करा..._
_विद्यार्थी ५ वीत दिसतील..._
_नंतर update student details मधून त्यांचा जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो करून घ्या._

♻ *काही कारणाने आपण काही विद्यार्थी Out of school केले असतील व ते आता regular शाळेत येत असतील तर त्यांना आपल्याच शाळेतून आपल्याच शाळेचा युडायस नंबर टाकून Request send करा व ती Request approve केल्यानंतर  ते विद्यार्थी Regular होतील.*

♻ _पहिलीच्या मुलांची माहिती भरायची राहिलेली असेल तर त्वरीत भरून घ्या._

♻ *_मागील वर्षीच्या अनुभवानुसार ३० सप्टेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने पोर्टलवर आलेले विद्यार्थी संचमान्यतेसाठी Count होणार नाहीत. म्हणून वरील सर्व कामे ३० सप्टेंबर पुर्वी च पुर्ण करावेत._*

♻ *SCHOOL PORTAL FINALIZE करावे. SCHOOL PORTAL finalize करताना वर्गखोल्यांची संख्या काळजीपूर्वक टाकावी. ही संख्या शिक्षक संख्येइतकी किंवा त्यापेक्षा जास्त असावी. वर्गखोल्यांची संख्या संचमान्यतेसाठी महत्वाची असते.*

♻ _वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार च संचमान्यता पट केंद्रप्रमुख लॉगीन ला Forward करावा. पट फॉरवर्ड करण्याची घाई करू नये._

Thursday 27 September 2018

   *विषय:-प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सन 2018-19 अंतिम मुदतबाबत*

    वरील विषयान्वये आपणास वारंवार सूचित करण्यात येते की,प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना 2018-19 या वर्षात फ्रेश व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची व शाळास्तरावरुन अर्ज व्हेरिफाय करण्याची अंतिम *दिनांक 30 सप्टेंबर 2018* हीच आहे.मुदत वाढ देण्यात येणार नाही.
      अद्याप पर्यंत बऱ्याच शाळांनी नूतनीकरण चे अर्ज भरलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी भरलेले Fresh व Renewal अर्ज मुख्याध्यापकांनी Institute लॉगिन मधून व्हेरिफाय करणे सुद्धा गरजेचे आहे, तरी सर्व अर्ज भरणे व ते स्वतः पडताळणी करून डिस्ट्रिक्ट लॉगिन ला पाठविण्याचे काम दिलेल्या मुदतीत करण्यात यावे.
   शाळा,तालुका स्तरावर किती Renewal विद्यार्थी प्रलंबित आहेत हे माहित होण्यासाठी  आपणास  प्रत्येक तालुक्याची शाळा निहाय यादी pdf स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे तरी यादीनुसार प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.

Monday 24 September 2018

   *विषय:-प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सन 2018-19 बाबत*

    वरील विषयान्वये आपणास वारंवार सूचित करण्यात येते की,प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना 2018-19 या वर्षात फ्रेश व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची व शाळास्तरावरुन अर्ज व्हेरिफाय करण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2018 असून अद्याप पर्यंत बऱ्याच शाळांनी नूतनीकरण चे अर्ज भरलेले नाहीत,त्याच बरोबर मागील वर्षाचे तुलनेत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी अतिशय कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज मुख्याध्यापकांनी त्यांचे लॉगिन मधून व्हेरिफाय करणे सुद्धा अत्यंत  गरजेचे आहे, तरी सर्व अर्ज भरणे व ते स्वतः पडताळणी करून डिस्ट्रिक्ट लॉगिन ला पाठविण्याचे काम दिलेल्या मुदतीत करून घेण्यात यावे.
   सन 2017-18 या वर्षी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज लॉगिन होत नसल्यास nsp कडून *Recover Password *update mobile no* ही सुविधा देण्यात आली असून ह्या सुविधेचा वापर करून पासवर्ड  उपलब्ध करून घ्यावा. तसेच भविष्यात ही अडचण येणार नाही त्या करिता विध्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या अर्जाच्या कॉपी वर पासवर्ड  लिहिण्या बाबत सूचना द्याव्यात.
   शाळा,तालुका स्तरावर किती विध्यार्थी प्रलंबित आहेत हे माहित होण्यासाठी  आपणास  प्रत्येक तालुक्याची शाळा निहाय यादी pdf स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे तरी यादीचे अवलोकन करून प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.

नमस्कार बंधू भगिनींनो असे म्हणतात की, "प्रिकोशन इस बेटर दॅन क्युअर' आपणास माहित आहेच की शैक्षणिक वर्ष 2018 सुरु होऊन 4 महिने झाले आहेत .तालुक्यात शाळा भेटी करताना काही ठिकाणी खूप चांगल्या उल्लेखनीय बाबी आढळून आल्या तर काही ठिकाणी अजूनही काही बाबींची पूर्तता होणे गरजेचे आहे चला तर मग आपला तालुका प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत अग्रेसर राहण्यासाठी  आपल्या शाळेत खालील बाबींची पूर्तता करू या .
वर्गस्तर व मुख्याध्यापक कार्यालय स्तर -
१) विद्यार्थी हजेऱ्या अद्ययावत करू या .
२) वर्गात दर्शनी भागात वार्षिक नियोजन,मासिकनियोजन, वेळापत्रक, शिक्षकपरीचय , अप्रगत विद्यार्थी यादी , विद्यार्थी व पालकांचे संपर्क नंबर यादी, वर्षभरात राबवायांचे प्रकल्प यादी, लावू या.
३) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे वर्गस्तरावरील सर्व अभिलेखे फाईल मध्ये ठेऊन त्यावर वर्ष ,इयत्ता व सर्वात वर गुण तक्ता लावू या. यावर्षीच्या पायाभूत चाचणीचा निकाल व पेपर अद्ययावत फाईल मध्ये ठेऊ या .
४) वर्गात किमान 10 घटकांवर आधारित स्वनिर्मित शै.साहित्य तयार करू या.
५) शासनाकडून प्राप्त विविध साहित्य पेट्यांचा वापर करून त्यांची टाचण वहीत नोंद ठेऊ या.
५) नियमित टाचण काढूया .
६) सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांना अवतीभोवतीच्या परिसरा विषयीच्या सामान्य ज्ञानाची ओळख करून देऊ या गावचे सरपंच, ग्रामसेवक, पं. स सभापती, जि. प.अध्यक्ष ,शिक्षणाधिकारी, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान ,राष्ट्रपती इत्यादी सामान्य ज्ञान ओळख करून द्या.
७) दाखवलेल्या अप्रगत विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अप्रगत निघू नयेत.शिवाय अप्रगत मुलांसाठी कृती आराखडा वर्गात दर्शनी भागात  लावावा.
८) शिक्षकांनी ओळखपत्र व मंगळवारचा गणवेश सक्तीने घालावा.
९) वर्गात मोबाईलवर बोलू नये तसेच वर्गात चार्जर वगैरे ठेऊ नये.
१०) डिजिटल साहित्याचा वापर करण्यात मुलांचा सहभाग घ्यावा.
११) वर्गाव्यतिरिक्त मुख्याध्यापकांनी सोपवलेली कामे उदा. विविध समित्या रजिस्टरे अद्यावत ठेवावी.विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांचा लाभ वर्गातील मुलाला मिळालाय का हे पाहावे .काही ठिकाणी लाभार्थींच्या सह्या राहिलेल्या असतात त्या घ्याव्यात.
१२) वर्ग सजावट करावी ,आवार स्वच्छता ठेवावी, शौचालय स्वच्छता ठेवावी, हॅन्डवॉश स्टेशनवर टॉवेल,व साबण असावा  , हात धुन्याच्या 6 सवयी मुलांना माहित असाव्यात, वैयक्तिक स्वच्छता कटाक्षाने पाहावी.
१३) वर्गातील बैठक व्यवस्था इंग्रजी सी आकारात असावी मधल्या मोकळ्या जागेत विविध कृती करण्यास जागा असावी.
१३) सातत्यपूर्ण मूल्यमापन नोंद वहीत प्रथम सत्र अनुषंगाने निरीक्षणात्मक नोंदी करून घ्याव्यात, झालेल्या चाचण्यांचे गन नोंदवावे, पहिल्या तिमाहीचे वजन उंची घ्यावी व ती नोंदवावी, वर्गात घड्याळ असावे, शालेय पोषण आहार दर्जा अधिक चांगला राहण्यासाठी सामूहिक प्रयत्न व सहकार्य व्हावे. विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळतोकी नाही याकडे लक्ष द्यावे.१४)कला ,कार्यानुभव शा. शि.या अनुषणगाने घेतलेल्या उपक्रमांची नोंद टाचण वहीत घ्यावी,
१५)शाळेची वेळ कटाक्षाने पाळावी. (किमान पाऊण तास अगोदर उपस्थित राहावे)
१६) विद्यार्थी वाचनालय देवघेव रजिस्टर नोदवावे.
१७)मुलांना बोलते करावे शांत वर्ग हा सर्व कामावर पाणी फिरवतो.
१८) अध्ययन स्तर निश्चिती टप्पा 1 व 2 चा तक्ता वर्गात दर्शनी भागात लावावा.तसेच वर्ग किती टक्के प्रगत आहे त्याची माहितीदर्शनी भागात लावावी. वर्ग 100 टक्के प्रगत असेल तर ठळक अक्षरातील फलक वर्गाच्या बाहेरील बाजूस दिसेल असा लावावा.
बंधू भगिनींनो वरील प्रमाणे काटेकोर प्रमाणे  कामकाज करून पूर्ण झालेल्या बाबींची माहिती खालील नमुन्यात मुख्याध्यापकांकडे दोन ते तीन दिवसात सादर करावी
अ. नं|  वर्गाचा पट| प्रगत विद्यार्थी संख्या| अप्रगत विद्यार्थी संख्या| राबवलेल्याउपक्रमाचे नाव| उपक्रमाची सद्यस्थिती | (पूर्तता झाली/ नाही ) वर्गशिक्षक सही
१९) मुख्याध्यापकांनी कार्यालयीन सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवावेत.
२०) सर्व प्रकारची इतिवृत्ते संपूर्ण सदस्यांच्या स्वाक्षरीसहीत लिहुन पूर्ण करावेत.
२१) कार्यालयाच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसवावी .
२२) शाळा सिद्धी उपक्रमात शाळेची श्रेणी दिसेल अशी दर्शनी भागात लावावी.
२३)शालेय आवारात धूम्रपान निषेध फलक लावावा.
कार्यालयात विविध समित्यांचे फलक व त्यांचा कार्यकाळ स्पष्ट दिसेल असे लावावेत .
वरील प्रमाणे कामकाज करून शाळा प्रगती पथावर नेण्यासाठी सांघिक योगदान द्यावे . आपण सर्वजण भरपूर एफर्ट्स घेत आहातच यापुढेही आपले सहकार्य राहील अशी अपेक्षा
     
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

संचमान्यता व सरल पोर्टल वरील इतर सर्व कामे ब्लॉकनिहाय अपूर्ण कामाची वरीलप्रमाणे माहिती घेऊन सबंधितांनी सदरचे काम तात्काळ पूर्ण करावे , दि 25 .9.18 रोजी दु 3 वा होणाऱ्या VC मध्ये मा. अप्पर मुख्य सचिव मॅडम व मा संचालक साहेब याबाबत चा सविस्तर आढावा घेणार आहेत , प्रत्येक शिक्षणाधिकारी व ब्लॉक ऑफिसर /गट शिक्षणाधिकारी यांना काम अपूर्ण का राहिले याचे उत्तर द्यावे लागणार आहे, त्यामुळे25 सप्टेंबर पूर्वी100%काम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक स्वतः लक्ष देऊन सरल पोर्टल वरील सर्व माहिती जबाबदारीने पूर्ण करावी , अन्यथा यासाठी वैयक्तिक लेखी खुलासे देण्याची वेळ येऊ शकते , त्यानुसार परिणामाचा विचार करून तात्काळ कार्यवाही करावी
       शिक्षण उपसंचालक , पुणे विभाग

विद्यार्थी, पालक, शिक्षक व शाळांसाठी महत्वाचे निवेदन - हे सर्वदूर पोहोचवायला मदत करा.

ll विद्यार्थ्यांसाठी
अक्षर मानव रोजनिशी स्पर्धा २०१८ ll

- स्पर्धेला कसलेही प्रवेश शुल्क नाही.
- स्पर्धेचा वयोगट इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी
- करायचे इतकेच - १ नोव्हेम्बर २०१८ ते ३० नोव्हेम्बर २०१८ या दरम्यान विद्यार्थ्यांनी रोज आपली रोजनिशी लिहायची. त्यात दिवसभर काय केले, भोवती काय घडले, मनाशी कोणते विचार आले असे सगळे काही लिहायचे. असे न कंटाळता ३१ दिवस लिहीत राहायचे.
- अटी अशा : रोजनिशी फक्त मराठीत लिहायची. एकही दिवसाचे पान कोरे सोडायचे नाही. एका दिवसात एकच पान लिहिले पाहिजे असे नाही, जास्त पाने लिहिली तरी चालतील. फार खाडाखोड करायची नाही.
- मग : पूर्ण महिनाभर लिहिलेली रोजनिशी तारीख १ ते १५ डिसेम्बर २०१८ पर्यंत आपला पूर्ण पत्ता, नाव, वय, वर्ग, शाळा अशी माहिती लिहून अक्षर मानवच्या पत्त्यावर पाठवायची. शाळांनीं मिळून अनेक विद्यार्थ्यांच्या रोजनिशी एकत्र पाठवल्या तरी चालतील.
- बक्षीस : सर्वात चांगल्या ठरणाऱ्या पाच रोजनिशींना प्रत्येकी रुपये ५०००, सन्मानपत्र दिले जाईल. उल्लेखनीय रोजनिशींना सन्मानपत्र दिले जाईल.
- फायदा : रोजनिशी स्पर्धेत भाग घेऊन बघा, आपोआप अनेक फायदे झालेलेे कळतील.
जमले तर एक गोष्ट करायची - आपल्या लिहून झालेल्या रोजनिशीची झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवायची. भविष्यात या रोजनिशी स्वतःचा इतिहास म्हणून उपयोगी पडतील. स्पर्धेनंतर आपल्या मूळ रोजनिशी अक्षर मानवकडून परत मागवू शकता.
रोजनिशी पाठवायचा पत्ता : अक्षर मानव, ९५९, पवनपुत्र, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे ४११००२
- माहितीसाठी संपर्क : ९५५२५१६५१३
aksharmanav@yahoo.com

Sunday 23 September 2018

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत दिनांक 24/09/ 2018 ते 28/09/ 2018 रोजी होणारे  इयत्ता पहिली व आठवी पुनर्रचित  अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रक्षेपण *Vande Gujarat  16 या चॅनेल संचामधील Vande Gujarat 1* या चॅनेल क्रमांकाद्वारे होणार आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शाळांना अवगत करावे.

*स्वाईन फ्लू* पासून दुर राहण्याचा सोपा उपाय

🖕🏻🔵*स्वाईन फ्लू* पासून दुर राहण्याचा सोपा उपाय

---डॉ.सौरभ म्हाडसे *
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,मुरबाड

राज्यात सध्या स्वाईन फ्लू ने धुमाकूळ घातला आहे. हा एक संसर्ग जन्य रोग आहे. याचा विषाणू ताप आलेल्या डुकरा कडुन पशु पक्षी यांच्याकडे नंतर माणसाकडे संक्रमित होतो. या विषाणू पासून वाचण्याचा सरळ आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितला आहे.

*हा उपाय करा*👇🏻🖕🏻🔵

✅ कापूर आणि वेलची चे छोटे दाणे (प्रत्येकी ५ ग्रॅम) समान प्रमाणात घ्या.

✅दोन्ही एकत्र करून बारीक कुटुन घ्या.

✅ या मिश्रणाची पुड (पावडर) एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून जवळ ठेवा.

✅  *दर तासा दिड तासाने तिचा वास घेत राहिल्यास स्वाईन फ्लु चा विषाणू मरतो.*

नको ते मेसेज सर्वच शेअर करतात. हा कामाचा मेसेज जरूर शेअर करा.

---डॉ.सौरभ म्हाडसे *
          चेअरमन, संजीवनी आयुर्वेदीक
         चिकित्सालय,मुरबाड