विविध लाभाच्या योजना
विद्यार्थ्यांसाठी विविध लाभाच्या योजना
1) सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना :-
योजनेचे स्वरूप :-
- अनुसूचित जमातीच्या (S.T.) मुला-मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
- इयत्ता 1 ली ते 4 थी साठी वर्षाला रू.1000/-
- इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.1500/-
- कमीतकमी 80% उपस्थिती आवश्यक.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू.108000/- पेक्षा जास्त नसावे.
- राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक.
- शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात परस्पर जमा होते.
- डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
2) सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना :-
योजनेचे स्वरूप :-
- अनुसूचित जातीच्या (S.C.) मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
- इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.600/-
- कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
- राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक.
- शाळेमार्फत ऑनलाईन फॉर्म भरले जातात.
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात परस्पर जमा होते.
- डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
3) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना :-
योजनेचे स्वरूप :-
- सर्व प्रकारच्या अल्पसंख्यांक मुला-मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे.
- इयत्ता 1 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.1000/-
- राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आवश्यक.
- शाळेमार्फत ऑनलाईन फॉर्म भरले जातात.
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात परस्पर जमा होते.
- डायरेक्ट वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
4) दारिद्र्यरेषेखालील मागासवर्गीय मुलींसाठी उपस्थिती भत्ता योजना :-
योजनेचे स्वरूप :-
- दारिद्र्यरेषेखालील अ.जाती, अ.जमाती व वि.जा.भ.ज.संवर्गाती मुलींसाठी ही योजना आहे.
- इयत्ता 1 वी ते 4 थी साठी उपस्थित दिवसासाठी रू.1/- प्रमाणे भत्ता.
- कमीतकमी 75% उपस्थिती आवश्यक.
- शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.
- शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
5) मागासवर्गीय मुला-मुलींसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना :-
योजनेचे स्वरूप :-
- अ.जाती, अ.जमाती व वि.जा.भ.ज.संवर्गाती मुला-मुलींसाठी ही योजना आहे.
- इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वर्षाला रू.500/-
- गत शैक्षणिक वर्षातील इयत्तेत वर्गात प्रथम/द्वीतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
- शाळेमार्फत प्रस्ताव पाठविला जातो.
- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या पालकांना वितरीत केली जाते.
No comments:
Post a Comment