*विषय:-प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सन 2018-19 बाबत*
वरील विषयान्वये आपणास वारंवार सूचित करण्यात येते की,प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना 2018-19 या वर्षात फ्रेश व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची व शाळास्तरावरुन अर्ज व्हेरिफाय करण्याची अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2018 असून अद्याप पर्यंत बऱ्याच शाळांनी नूतनीकरण चे अर्ज भरलेले नाहीत,त्याच बरोबर मागील वर्षाचे तुलनेत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी अतिशय कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज मुख्याध्यापकांनी त्यांचे लॉगिन मधून व्हेरिफाय करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे, तरी सर्व अर्ज भरणे व ते स्वतः पडताळणी करून डिस्ट्रिक्ट लॉगिन ला पाठविण्याचे काम दिलेल्या मुदतीत करून घेण्यात यावे.
सन 2017-18 या वर्षी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज लॉगिन होत नसल्यास nsp कडून *Recover Password *update mobile no* ही सुविधा देण्यात आली असून ह्या सुविधेचा वापर करून पासवर्ड उपलब्ध करून घ्यावा. तसेच भविष्यात ही अडचण येणार नाही त्या करिता विध्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या अर्जाच्या कॉपी वर पासवर्ड लिहिण्या बाबत सूचना द्याव्यात.
शाळा,तालुका स्तरावर किती विध्यार्थी प्रलंबित आहेत हे माहित होण्यासाठी आपणास प्रत्येक तालुक्याची शाळा निहाय यादी pdf स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे तरी यादीचे अवलोकन करून प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.
No comments:
Post a Comment