" मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" १ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ - विशेष
मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे याकरता राज्यात विशेतः शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही १ ते १५ जानेवारी 2017 या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे.
**************************************************
ह्या संबधी थोडीशी माहिती आपणास देत आहे
------------------------------------------------------------
**************************************************
सर्व माहिती गुगल माध्यमातून घेतली आहे.या माहितीचा उपयोग फक्त शैक्षणिक कार्य साठी करण्यात यावा.
**************************************************
⏺आपणास येथे काय बघण्यास मिळेल⏺
********************************
! शासनाचे परिपत्रक pdf मध्ये
पंधावाडा कसा साजरा करावा
मराठी भाषा संवर्धन निमित्त शाळेत कोणते कार्यक्रम घ्यावेत - माहिती
शिक्षक तसेच विद्यार्थ्यासाठी उपयुक्त पुस्तके pdf मध्ये
**************************************************
महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संबंधी परिपत्रक download करण्यासाठी खाली क्लिक करा
**************************************************
⏺पंधावाडा कसा साजरा करावा⏺
*************************
*************************
शिक्षक उपयोगी BEST EXCEL SOFTWARE साठी -
<<<【 क्लीक करा 】>>>
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
शिवाजी महाराज जयंती - संपूर्ण माहिती
🔷मराठी भाषा विषयी थोडे -🔷
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. इ.स. ११८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.
शिवाजी राजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.राजा केसिदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे.
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोदला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. अर्थ :--जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणार्याचे नाव आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।': कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटचे वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाचा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाचा शोध लागला. त्याचा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलच्या शिलालेखाचा शोध लागला.
**************************************************
🎯पंधावाडा कसा साजरा करावा🎯
शाळास्तरावर मराठी भाषा सर्वर्धन पंधरवडा साजरा करणे अतिशय मोलाचे आहे कारण विद्यार्थी हा समाजाचा प्रतिनिधी आहे.समाजाला बघण्याचे दृष्टीकोण बदल हा शिक्षणानेच होऊ शकतो.आपण महाराष्ट्र राज्यात राहतो तो आपणास मराठी होण्याचा गर्व आहे.मग मराठी भाषा जतन करण हे आपल कर्तव्य आहे.आपण शिक्षकवृंद विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषा विषयी प्रेमाचे जतन करू शकतो.ह्या साठी आपणास अनेक माध्यमातून शाळा स्तरावर मराठी भाषेचे जतन करू शकतो
1.मराठी भाषा पुस्तक दिंडी काढणे
2.मराठी भाषेवर कवी,साहित्यिक.ई.यांचे व्याख्यान आयोजन
3.मराठी भाषेवर निबंध स्पर्धा
4.मराठी भाषेत शुद्ध लेखन स्पर्धा
5.ग्रंथालय पुस्तके वाचणे
6.पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे
7.मराठी भाषेत सुभेच्छा पत्र तयार करणे
8.मराठी भाषेवर वाद विवाद स्पर्धा आयोजन
9.वकृत्व स्पर्धा
10.मराठी गीत गायन स्पर्धा
11.मराठी भाषेचे विवध साहित्यिक ,कवी,लेखक यांची माहिती विद्यार्थ्यास देणे
12.मराठी भाषा - कथा कथन इत्यादी ,
**************************************************
शिक्षक तसेच विद्यार्थ्यासाठी उपयुक्त पुस्तके pdf
1.गायब झाली नानखटाई - download pdf
2.मुलावरील लैगिक अत्याचार - download pdf
3.आधुनिक मुद्रा अक्षर कला - download pdf
4.आपले शरीर - download pdf
अधिक पुस्तके वाचण्यासाठी खाली क्लिक करा
*****************************************
*****************************************
**************************************************
⏺मराठी भाषेवर कविता ⏺
जन्मलो ज्या मातीस
ती माती मराठी.......
बिलगलो ज्या छातीस
ती छाती मराठी.......
चाललो पकडून हातास
तो हात मराठी.........
लाभली आजवर साथ
ती साथ मराठी........
बोललो शब्द पहिला
तो शब्द मराठी.......
लिहिले पहिले अक्षर
ते अक्षर मराठी.......
गुणगुणलो जे गीत
ते गीत मराठी.......
जडली मनास प्रित
ती प्रित मराठी......
भांडले वेळीस भक्त
ते भक्त मराठी......
सांडले ऐक्याने रक्त
ते रक्त मराठी......
उतरवून निराशेची कात
चढवा कात मराठी.....
विसरुनी सारी जात
लढवा जात मराठी.....
बोलिन एक भाषा
ती भाषा मराठी.......
दाखवीन उद्याची आशा
ती आशा मराठी......
.........अमरीश अ. भिलारे.
ती माती मराठी.......
बिलगलो ज्या छातीस
ती छाती मराठी.......
चाललो पकडून हातास
तो हात मराठी.........
लाभली आजवर साथ
ती साथ मराठी........
बोललो शब्द पहिला
तो शब्द मराठी.......
लिहिले पहिले अक्षर
ते अक्षर मराठी.......
गुणगुणलो जे गीत
ते गीत मराठी.......
जडली मनास प्रित
ती प्रित मराठी......
भांडले वेळीस भक्त
ते भक्त मराठी......
सांडले ऐक्याने रक्त
ते रक्त मराठी......
उतरवून निराशेची कात
चढवा कात मराठी.....
विसरुनी सारी जात
लढवा जात मराठी.....
बोलिन एक भाषा
ती भाषा मराठी.......
दाखवीन उद्याची आशा
ती आशा मराठी......
.........अमरीश अ. भिलारे.
**********************
चिरंजीव मराठी
मराठी वाचवा,मराठी वाचवा
ह्या केवळ गप्पा आहेत.
घरोघरी मम्मी,आन्टी,
अंकल आणि पप्पा आहेत.
कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत.
अशांनी मराठी वाचवा म्हणायचे
काहीसुद्धा कारण नाही !
ज्ञाना,नामा,तुका,एका
जिचे पुत्र,
तिला कधीसुद्धा मरण नाही !!
चिरंजीव मराठी
मराठी वाचवा,मराठी वाचवा
ह्या केवळ गप्पा आहेत.
घरोघरी मम्मी,आन्टी,
अंकल आणि पप्पा आहेत.
कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत.
अशांनी मराठी वाचवा म्हणायचे
काहीसुद्धा कारण नाही !
ज्ञाना,नामा,तुका,एका
जिचे पुत्र,
तिला कधीसुद्धा मरण नाही !!
बोलिन एक भाषा
ती भाषा मराठी.......
दाखवीन उद्याची आशा
ती आशा मराठी......
ती भाषा मराठी.......
दाखवीन उद्याची आशा
ती आशा मराठी......
राजकारण्यांना आत्ता
भलताच आलाय पुळका
फेरीवाल्याभोवती आज
जमलाय एकच घोळका
लो ५०, ५० मे
असा गळा काढत होता
गिरगया, गिरगया, गिरगया
अशी ऐट झाडत होता
कुतूहल म्हणून जरा
मीही देउन आलो दस्तक
भैयाच्या हातात पाहिलं
चक्क मराठीचं पुस्तक
कहा करी साब अब
हमका सिखना पडी
नाही आलं वाचायला
तर कशी चालेल गाडी
टेक्सीवाला भैया आता
होणार आहे ग्लोबल
त्याच्या माथी पडलंय
इथल्या मराठीचं लेबल
मराठी मराठी म्हणत
सगळ्यांनाच चढतो चेव
इंग्रजाळलेल्या तोंडात
मराठीचा फुटतो पेव
५०, ५० रुपयाला
पुस्तके बघा विकतात
हिंदी इंग्रजीच्या झाडावर
मराठीची फळे पिकतात
मराठीच्या नावानं अजून
किती झोळी भरणार
सरकार आल्यावर मग
थोबाडं काळी करणार
बाजार मांडलाय सारा
त्यात मराठीच पोळते
५०, ५० रुपयाला मग
मराठीचे पुस्तक मिळते
|| माय मराठी |
भलताच आलाय पुळका
फेरीवाल्याभोवती आज
जमलाय एकच घोळका
लो ५०, ५० मे
असा गळा काढत होता
गिरगया, गिरगया, गिरगया
अशी ऐट झाडत होता
कुतूहल म्हणून जरा
मीही देउन आलो दस्तक
भैयाच्या हातात पाहिलं
चक्क मराठीचं पुस्तक
कहा करी साब अब
हमका सिखना पडी
नाही आलं वाचायला
तर कशी चालेल गाडी
टेक्सीवाला भैया आता
होणार आहे ग्लोबल
त्याच्या माथी पडलंय
इथल्या मराठीचं लेबल
मराठी मराठी म्हणत
सगळ्यांनाच चढतो चेव
इंग्रजाळलेल्या तोंडात
मराठीचा फुटतो पेव
५०, ५० रुपयाला
पुस्तके बघा विकतात
हिंदी इंग्रजीच्या झाडावर
मराठीची फळे पिकतात
मराठीच्या नावानं अजून
किती झोळी भरणार
सरकार आल्यावर मग
थोबाडं काळी करणार
बाजार मांडलाय सारा
त्यात मराठीच पोळते
५०, ५० रुपयाला मग
मराठीचे पुस्तक मिळते
|| माय मराठी |
शब्द तुझे ग दूध मजला, अक्षरे ती साय ग. ||ध्रु||
भाग्यवंत तो कृष्ण मी तव, लाभल्या दोन माय त्या,
जन्म घेताच जोडिली तुजसव, नाळ यशोदे माय ग.
चिखल मी तर माय तुझ्याविन, न अस्तित्व न आकार मज,
कुंभाराचे हात तुझे ग, घडलो पक्के मडके मग. ||ध्रु||
अलंकारांचा साज मोठा, छंदांना ही नाही तोटा,
तरीही शालीन माय माझी, भाषेंच्या दरबारात.
तुझ्या हात ची सर नाही, त्या पिझ्झा-बर्गर ला.
कितीही खाव तरी म्हनाव, अजुन थोड वाड ग. ||ध्रु||
शब्द न्हवे हे शस्त्र दिधले, जपन्यास मम अस्तित्व हे.
नाहीतर हा देह माझा, केवळ पोकळ वासा ग.
मी न उरेन माय विसरून तुजला, मग कसला अभिमान मज.
तुझ्याच चरनी सदैव राहो, या तुझ्या लेकरास ग. ||ध्रु||
भाग्यवंत तो कृष्ण मी तव, लाभल्या दोन माय त्या,
जन्म घेताच जोडिली तुजसव, नाळ यशोदे माय ग.
चिखल मी तर माय तुझ्याविन, न अस्तित्व न आकार मज,
कुंभाराचे हात तुझे ग, घडलो पक्के मडके मग. ||ध्रु||
अलंकारांचा साज मोठा, छंदांना ही नाही तोटा,
तरीही शालीन माय माझी, भाषेंच्या दरबारात.
तुझ्या हात ची सर नाही, त्या पिझ्झा-बर्गर ला.
कितीही खाव तरी म्हनाव, अजुन थोड वाड ग. ||ध्रु||
शब्द न्हवे हे शस्त्र दिधले, जपन्यास मम अस्तित्व हे.
नाहीतर हा देह माझा, केवळ पोकळ वासा ग.
मी न उरेन माय विसरून तुजला, मग कसला अभिमान मज.
तुझ्याच चरनी सदैव राहो, या तुझ्या लेकरास ग. ||ध्रु||
No comments:
Post a Comment