THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday 12 September 2018

इमानदारीच्या बदल्यात मृत्यू आलेले जिगरबाज सरकारी अधिकारी_

*_😔इमानदारीच्या बदल्यात मृत्यू आलेले जिगरबाज सरकारी अधिकारी_*

*_

_आपल्या देशात सुरुवातीपासूनच एका नोकरीची खूप क्रेझ आहे, ती म्हणजे सिव्हील सर्विसेसची. या नोकरीमध्ये दर्जा, प्रसिद्धी आणि ताकद या तिन्ही गोष्टींचा योग्य प्रकारे ताळमेळ आहे, परंतु या शक्तींबरोबरच काही कर्तव्ये सुद्धा वाट्यास येतात. राज्य आणि जिल्ह्यातील लोकांना त्यांचा हक्क आणि सुविधा मिळवून देणे ही सिव्हील सर्विसेमधील IAS आणि IPS अधिकाऱ्यांची महत्त्वाची कर्तव्ये आहेत. देशामध्ये कित्येक अधिकारी असे आहेत, ज्यांनी ही कर्तव्ये बजावताना प्रामाणिकपणाने सगळ्यांची मने जिंकली आहेत, पण त्यापैकी काही अधिकाऱ्यांना आपल्या प्रामाणिकपणासाठी जीवाची किंमत मोजावी लागली. आज आपण अश्याच काही अधिकाऱ्यांविषयी जाणून घेऊया ज्यांनी सिव्हील सर्विसेस मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना शेवटच्या श्वासापर्यंत जीवाची बाजी लावत निष्ठेने काम केले._

*_सत्येंद्र दुबे_*
National Highway Authorityचे सत्येंद्र दुबे प्रोजेक्ट मॅनेजर होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी कित्येक माफियांच्या विरोधात मोहीम सुरु केली होती. गया मध्ये नियुक्त असलेले सत्येंद्र आपल्या प्रामाणिकपणासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. कित्येक प्रकल्पातील घोटाळ्यांचा खुलासा त्यांनी तेव्हाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या समोर केला होता. काही माफियांनी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु त्यांनी लाच घेतली नाही. त्यांच्या याच प्रामाणिकपणामुळे बिथरलेल्या माफियांनी २७ नोव्हेंबर २००३ मध्ये सत्येंद्र दुबे यांची गोळी मारून हत्या केली.

*_शानमुगम मंजुनाथ_*
इंडिअन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सेल्स मॅनेजरच्या पदावर काम करणाऱ्या शानमुगम यांची हत्या उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरीमध्ये करण्यात आली होती, कारण होते एका पेट्रोलपंप मालकाकडून करण्यात येणाऱ्या घोटाळ्याला त्यांनी जगासमोर उघड केले होते. १९ नोव्हेंबर २००५ ला शानमुगम यांना घेरून मोनू मित्तल नावाच्या पेट्रोल पंपच्या मालकाने गोळी मारली होती. त्यांची हत्या करणाऱ्यांना कोर्टाने शिक्षा दिली, परंतु देशाच्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत झाला.

*_यशवंत सोनावणे_*
अतिरिक्त जिल्हाधिकारीच्या पदावर नाशिक मध्ये काम करत असलेले यशवंत सोनावणे आपल्या ड्रायवर आणि जुनियर सहकाऱ्यासोबत एका मिटींगला जात होते, तेव्हा त्यांनी एका धाब्यावर काही पेट्रोल टँकना बेकायदेशीर हालचाली करताना पाहिले. त्यांनी गाडी थांबवली आणि ते रोखण्यासाठी पुढे सरसावले. परंतु त्या माफियांनी मिळून यशवंत यांना त्याच जागेवर जिवंत जाळले.

*_नरेंद्र कुमार सिंह_*
बिहार कॅडरच्या शूर अधिकाऱ्यांपैकी एक नरेंद्र कुमार होते. त्यांची हत्या मध्यप्रदेशच्या भूमाफियांनी केली होती. ड्युटीवर असताना त्यांनी पाहिले की, एक ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे दगड घेऊन जात आहे. त्यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रॅक्टर चालवणाऱ्या मनोज गुर्जरने ट्रॅक्टरची गती वाढवली आणि ट्रॅक्टर थेट नरेंद्र कुमार यांच्या अंगावर घातला, त्यातच या धाडसी अधिकाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले

*_आर. विनील कृष्ण_*
या IAS अधिकाऱ्याची हत्या उडीसाच्या नक्षलवाद्यांनी केली होती. हे नक्षलवादी उडीसाच्या दुर्गम भागांमध्ये केलेल्या विजेच्या पुरवठ्याने नाराज होते. आर. विनील यांच्या सांगण्यावरूनच या भागांमध्ये वीज पुरवठा करण्यात आला होता. ज्या दिवशी सिलीगुमा नावाच्या गावात वीज पुरवठा झाला, त्याच दिवशी नक्षलवाद्यांनी गोळ्या मारून आर. विनील  यांची हत्या केली.

*_नीरज सिंह_*
नीरज सिंह यांना कोणत्याही माफियाने किंवा नक्षलवाद्यांनी मारले नाही. त्यांची हत्या जवळपास १५० लोकांनी केली, यामध्ये बायका व मुले सुद्धा सामील होते. कारण हे होते की, त्या गावातील लोक पेट्रोल मध्ये रॉकेल मिक्स करून विकत असत आणि हीच फसवेगिरी थांबवण्यासाठी नीरज सिंह यांनी तिथे धाड मारली होती. जेव्हा तेथील काही दुकानातून नमुने घेण्यासाठी ते परत जात होते तेव्हा त्यांच्यावर संपूर्ण गावाने एक साथ हल्ला चढवला आणि त्यांना जिवंत जाळले.

*_डि.के.रविकुमार_*
रवी कुमार यांचे प्रेत त्यांच्याच घरात पंख्याला लटकताना दिसले. पोलिसांनी पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे घोषित केले. परंतु तिथे कोणत्याही प्रकारची चिठ्ठी आढळली नाही. सांगितले जाते की, त्यांची हत्या वाळू माफियांद्वारे केली गेली होती आणि त्याला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कितीतरी रियल इस्टेट माफिया आणि वाळू माफियांवर लगाम लावला होता आणि हीच इमानदारी त्यांच्या मृत्यूचे कारण ठरली.

💥*

No comments:

Post a Comment