विद्यार्थी संसदउपक्रमाची मांदियाळी लेखमाला
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔅
अंक- ६ / भाग-१
🔅ज्ञानरचनावादामध्येशालेय मंत्रिमंडळाचे स्थान🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
🌞 रचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शिक्षक - विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण खुपच व्यस्त आहे. आपल्या अनेक वाड्या - वस्त्यांमधील शिक्षकांना 3-4 वर्ग सांभाळत प्रशासनाचा गाडि हाकावा लागतो. अशा वेळी "विद्यार्थी संसद / शाळा मंत्रीमंडळ " महत्त्वाची भूमिका बजावते. याचे काही प्रातिनिधीक फायदेपाहूयात.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
👇🏻👇🏻⌛रचनावादी उपक्रमासाठी वेळेचे नियोजन⌛ज्ञानरचनावाद शाळेत अंमलात आणताना आपणास खुप अडचणी येतात. सर्वात मुख्य अडचण म्हणजे वेळेची! आपण रचनावादासाठी इतर साहित्य, उपक्रम नियोजन यात गुंतून जातो व मुलांना रचनावादी बनविण्यासाठी वेळ कमी पडतो. सोबत हे सर्व उपक्रम आपल्या पाठ्यक्रमाचा भाग नसल्याने आपणास पाठ्यक्रमही पुर्ण करण्याची कसरत करावी लागते. त्यातच जर शाळेमध्ये विविध माहितीचे टप्पे किंवा अहवाल आले कि मग आपण पुरते हताश होतो. व यामूळे कधी - कधी आपला भ्रमनिराश पण होतो.यावर उपाय म्हणून व आपणास विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात "शाळा मंत्रीमंडळ" खुप उपयोगी येते.
✨: 🐣 मुलांच्या कल्पकतेला वाव 🐣
मी बरेच वेळी असे पाहिले आहे की "ज्ञानरचनावाद" म्हटले की शिक्षक स्वतःच्या कल्पक बुध्दीला ताण देऊन विविध रेडीमेड उपक्रम मुलांसमोर ठेवतात व मुले ते पुर्ण करण्यात गुंतून जातात!मात्र यात मुलांच्या सृजनशिलतेला आव्हान देणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम विद्यार्थ्यांनीच स्वतः तयार करावेत नव्हे त्यांनीच पुढाकार घेऊन राबवावेत अशी अपेक्षा असते. व शिक्षक यात केवळ एका निरीक्षकाची भूमिका बजावतात! आणि यासाठी "शाळा मंत्रिमंडळ" एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते.🐬 मुलांच्या सुप्त गुणांचा विकासासाठी सर्वोत्तम 🐬मुलांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी आपण वेगवेगळे स्वतंत्र उपक्रम राबवतो. परंतु "शाळा मंत्रिमंडळ" हे यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यातून खालील गुणांचा विकास होतो.1. निर्णय क्षमता2. सहकार्याची भावना3. पुढाकार घेऊन कार्य करणे.4. जबाबदारीची जाणीव5. 'स्व' चा विकास6. नेतृत्व गुण7. कार्यक्रम नियोजन8. वक्तृत्व कौशल्य9. परस्पर सहसंबंध10. दुसऱ्याच्या मताचा आदरइ.
🎈शिक्षकावरील कामाचा ताण हलका
🎈शाळा मंत्रिमंडळ स्वतः पुढाकार घेऊन विविध उपक्रमाचे आयोजन करते, त्यामुळे शिक्षकांना इतर कामांसाठी वेळ मिळतो! व हे इतर कामे वेळेत पुर्ण केल्याने शिक्षकांची मानसिक तणावातून मुक्ती होऊन ते पूर्ण क्षमतेने अध्ययन -अध्यापनात झोकून देऊ शकतात!!!☀ इतर उपक्रमांची सहजतेने अंमलबजावणी
☀आपण जे दैनंदिन उपक्रम राबवतो, त्याची अंमलबजावणी शाळा मंत्रीमंडळावर सोपविल्यास आपणास इतर उपक्रमासाठी व पाठ्यक्रमासाठी वेळ मिळतो.
💧 यासह अनेक फायदे अपणास शाळा मंत्रीमंडळ करुन देते. फक्त त्याचे नियोजन व अंमलबजावणी व्यवस्थित करावी लागते.

No comments:
Post a Comment