ज्ञानरचनावाद राबवताना...
ज्ञानरचनावाद राबवताना.....
आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला दिसून येतो
सर्वात प्रथम रचनावाद म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे रचनावाद म्हणजे अस काही मोठ्ठ शास्त्र नाही की जे आपणाला वापरता येणारच नाही.रचनावादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेल्यास असे म्हणता येईल
✒बालकांना फुलण्यासाठी, आत्मविष्कारासाठी अनुकूल,पूरक परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय.
किंवा याहून सोपे
✒रचनावाद म्हणजे--कृतिशील स्वयंअध्ययन
यात सर्वात प्रथम स्वयंअध्ययन म्हणजे मुलं आपलं आपण शिकणार,ते त्याच स्वतः शिकणार शिक्षकाने फक्त शिकण्यास मदत करणे
आणि कृतिशील म्हणजे--
आता या कृतीशीलतेमध्ये
1)शारीरिक कृती
2)साधनं वापरून करावयाची कृती
3)वैचारिक पातळीवर जाण्यासाठी करावी लागणारी कृती
यांचा समावेश करता येईल
जर आपणाला या दोन गोष्टी समजल्या तर आपण रचनावाद चांगल्या प्रकारे राबवू शकतो असे मला वाटत
प्रत्येक शिक्षकाने सर्वात प्रथम हे जाणले पाहिजे कि आपण जे शिक्षण देणार आहोत ते आपल्या वर्गातील मुलांच्या भावी काळासाठी असावं
आज आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे उद्या देशाचे नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांना योग्य असे व भावी काळासाठी किफायतशीर असेच शिक्षण दिले पाहिजे.
आज शिकणाऱ्या मुलांना त्यांचे पुढील भावी जीवन जगण्यासाठी व त्याच्या भावी काळासाठी फायद्याचं ठरणार शिक्षण आपण दिले पाहीजे
वर्गामध्ये अध्यापन करत असताना
एक सुलभक म्हणून शिक्षकाने मुलांच्या भावी काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत
त्याच बरोबर भावी काळातील गरजांचा विचार करणे गरजेचे असते
सध्याच्या वेगाने बदलत्या काळामध्ये टिकायचे असेल तर आज आपण दिलेले ज्ञान हे उद्याच्या पिढीच्या कामाला येणार असावं
आता सर्वात महत्वाच्या आणि मेंन मुद्द्याकडे आपण पाहूया
वर्गामध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवत असताना शिक्षकाने खालील गोष्टींचा विचार करावा.
🔷काय द्यायचं ?
🔷कसं द्यायचं ?
🔷किती द्यायचं ?
🔷गरजा नुसार त्यांना काय हवंय ?
रचनावाद प्रभावीपणे राबविण्यासाठी पुर्वज्ञान जागृत करुन त्याची सांगड नवीन ज्ञानाशी घडवून कृती केली पाहिजे.
आशयानुरुप कृती मुलांना दिल्यास मुले कृतीत रमतात..चुकतात..पुन्हा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळवतात त्यामुळे हे ज्ञान घोकंपट्टीयुक्त नसते.ते ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.रचनावादात मुल स्वतः विचार करतं.कृती करतं..व नवीन ज्ञानाची निर्मीती करते.
उदा...जैवविविधतेसाठी आपण
🐂🐟🐅🐄🐪🐫🐘 वेगवेगळे प्राणी व त्यातील फरक
एकच प्राणी व त्यातील फरक
उदा.मासा...🐋🐳🐬🐡🐟🐠
माशांची एकच जात व त्यातील फरक...यात आकार...रंग..इ.
बाबतची विविधता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे किंवा प्रत्यक्ष वस्तू दाखवून मुले त्यातील साम्य भेद निरीक्षणाने रचनावादात अभ्यासतात.
तसेच विविध संकल्पना समजण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन,त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण करून त्यांची उत्तरे त्यांनाच शोधण्यास प्रवृत्त करणे.
परंतु आजकाल फरशीवर आकृत्या काढल्या म्हणजे शाळेत रचनावादी शिक्षण दिलं जातं असा गोड गैरसमज आमच्या शिक्षक आणि अधिकारी यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो.
परंतु रचनावादी शिक्षणामध्ये मुलाकडे असणाऱ्या ज्ञानाची सांगड घालायची असते ,मुल आपलं आपण शिकत असत
उदा--मुलांना मापन येत असते
मूल शाळेत येण्याअगोदरच विविध वस्तू ,नाणी -नोटा ,अंतर याचे मापन करत असते,गणितातील बेरीज शिकवत असताना त्याला एकक दशक संकल्पना स्पष्ट झाल्या की ते बेरीज अगदी सफाईदार पणे करते.
वर्गात मुलांना संपूर्ण स्वातंत्र दिले तर मुले चुकत चुकत शिकत असतात आणि वारंवार कृती केल्यामुळे मुलाने आत्मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकणारे असते
भाषा विषयाचा विचार करायला गेल्यास-------
मुलांना कोणतीही एक भाषा परिपूर्ण आली पाहिजे कारण मुलांचं 8 ते 10 वय हे भाषा शिकण्याचा काळ असतो असे मानसशास्त्र म्हणते आणि मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ही विचार करण्याची क्षमता विकसित करीत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे त्याला वेगवेगळ्या विषयावर कल्पना करायला चालना दिली पाहिजे मग तो विषय कोणताही असो.
उदा- दगडांचा पाऊस पडला तर....
आता तुम्ही म्हणाल हा असला कसला विषय ????
पण मुलांना कल्पना करू द्या
कारण मुलांच्या कल्पना ह्या रबरासारख्या असतात. जेवढ्या ताणाव्या तेवढ्या ताणल्या जातात.यामुळे त्याच्या भावविश्वाचा शोध घेता येतो,त्याच्या मनातील कल्पना समजण्यास मदत होते..
आपल्या वर्गामध्ये प्रभावी ज्ञानरचनावाद राबवत असतांना जर आपण मुलांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या कृती करू दिल्या पाहिजेत जेणेकरून मुल आपलं आपण शिकेल व व आपले अध्यापन ही रचनावादी होईल.

No comments:
Post a Comment