THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 16 March 2017

८ मार्च स्त्री दिन


८ मार्च -ह्या दिवसाला स्त्री दिन म्हणतात..
पण का? एकच दिवस स्त्री दिन का म्हणून पाळायचा? जसा शेतकरी बैल पोळा साजरा करतो, बैलाला सजवून, त्याच्या कडून काम न करुन घेता, त्याला सजवून, त्याला पुरणपोळी खाउ घालुन त्याचे आभार मानतो आणि मग दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा औताला किंवा बैल गाडीला जुंपून. बरं ज्या बैलाचे इतके कौतुक केले जाते , त्याच बैलाला म्हातारा झाला की मग सरळ कसायला विकायला पण तोच शेतकरी कमी करित नाही.  … तसंच काहीसं वाटतं हे…

तुम्हाला कदाचित माझे  विचार अतिरेकी वाटत असतील, पण मला जे वाटतं , जे पटतं ते मी लिहीतो. कदाचित बऱ्याच  वाचकांना आवडणार पण नाही माझे विचार पण…………………….! .स्त्री च्या आयुष्याचे कित्ती तरी वेगवेगळे पैलु आहेत , पण  त्यांचा विचार न करता, केवळ, मातृ रूपालाच सगळीकडे प्रणाम केला  जातो. स्त्री म्हंटलं , की, जिजामाता, किंवा तत्सम मातृ रुपच पूजले जाते  असे का? ह्या एकाच रुपा शिवाय स्त्री दुसऱ्या कुठल्याही रुपात का अपील होत नाही?

एखादा पुरुष आपल्या आई बद्दल अगदी भर भरुन बोलेले, पण तेच जेंव्हा बायकोची वेळ येते तेंव्हा मात्र एकही चांगला गुण बोलतांना त्याची जीभ का अडखळते? (स्त्री च्या समोर बरं कां, तिच्या मागे तुम्ही भलेही कितीही तारीफ करित असाल, पण तिच्या समोर तुम्ही कधीही चांगले बोलणार नाही )( मी इन्क्लुडॆड)?)

मी इथे लिहितांना स्वतःशी पुर्ण प्रामाणिक राहुन लिहिण्याचे ठरवले आहे. त्यामुळे स्वतःच्या चुका पण मोकळेपणाने कबूल करतोय. मी किती चांगला आणि धुतल्या तांदुळा सारखा आहे हे इथे दाखवायचा प्रयत्न केलेला नाही.माझ्या बद्दल पण मी जसा आहे तसा कव्हर केलंय!

टीव्ही वरचे कार्यक्रम -सगळ्यामधे स्त्रियांची उभी केलेली प्रतिमा.. ही एक तर आक्रस्ताळी, किंवा खूप प्रेमळ अशीच असते. नॉर्मल स्त्रिया कधीच दाखवल्या जात नाहीत. बालिका बधु सारखे सिरियल्स ज्या मधे बाल विवाहित ८ वर्षाची मुलगी आणि तिच्या संसारात रोमान्स शोधणाऱ्या पण स्त्रियाच असतात.. !बालिका बधु या विषयावर आधी पण लिहिलंय..

बरेचसे मॅरिड लोकं  पण असतील वाचणारे, तेंव्हा,स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा की बायकोला मी तुझ्यावर प्रेम करतो, किंवा, मला तु खुप आवडतेस, किंवा, तुला किती त्रास होतो गं, नोकरी करुन घर सांभाळतांना? असं व म्हंटलं आहे   (दिवसा (!) आणि काही स्वार्थ नसतांना)……

जरी तुम्ही आणि मी  हे सगळं रिअलाइझ करतो तरीही, आपण ह्या गोष्टी  बोलून दाखवण्याची कंजूषी का करतो?

घरामधे लहान  मूल असेल तर पहिल्या मुलाच्या वेळेस वडील पण तितक्याच प्रेमाने रात्र जागून काढतात, पण दुसऱ्या इशू च्या वेळेस तिला एकटीलाच रात्रीचा दिवस करावा लागतो.. … हे खरं आहे.. माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालंय… उद्या ऑफिस आहे म्हणून मी सरळ हॉल मधे झोपायला जायचो..  आणि बायको मुलीला सांभाळत रात्र काढायची कशी बशी..

No comments:

Post a Comment