कविता
जन्म घेऊन कित्येक नाते जोडतेस तू
जन्म देऊन कित्येक नाते निर्मितेस तू
नको रडू..’स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ म्हणत तू
शोध घे स्वत:चा ,एक नवीन कहाणी लिही तू
घर आणि करिअर,तारेवरची कसरत करतेय तू
२१ व्या शतकातली सुपरवुमन तू
रक्षण,आरक्षण हे आक्रोश सोड तू
कर्म करत रहा,’फळाला’ पात्र होशील तू
भगिनी भाव जरुर पाळ तू
कणखर हो,स्वत:ची मदत स्वत: हो तू
विधात्याची नवनिर्माणाची कलाकृति तू
एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू
उठ चल,यशाच्या शिखरांची तुला साद..ऐक तू
‘स्त्री’ म्हणून जन्मलीयेस,’व्यक्ती’ म्हणूनही जग तू
— स्वप्ना
No comments:
Post a Comment