मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मात्र आपल्याच राज्यात आपण आपल्या मराठी भाषेला पदोपदी ठार करीत आहेत. बहुतांश वेळा आपण गांभीर्याने विचार न करता भाषेचा वापर करीत असतो, त्यामुळे भाषेची पुरती वाट लागून जाते. ज्यांना भाषेच्या प्रत्येक शब्दांत असलेल्या सौंदर्य आणि सामर्थ्यांची जाणीव नसते, त्यांना वाक्यरचनेशी किंवा शब्दाशी काही देणे-घेणे नसते. अशा लोकांच्या भाषेमूळे मराठी भाषा रसातळाला जात आहे, म्हणणे चूकीचे ठरणार नाही. आज प्रत्येकजण आपल्या पाल्यांना मराठीच्या शाळेत शिकविण्या ऐवजी इंग्रजी मिशनरीच्या शाळेत शिकविण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलणा-यांची संख्या सर्वात जास्त आहे. इंग्रजी लिहिता-बोलता आली तर आपले मूल जगाच्या स्पधेत टिकू शकतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील इंग्रजी सोपी वाटावी म्हणून त्याला K.G. पासून इंग्रजीचे धडे शिकविण्यास प्रारंभ केल्या जाते. सध्या पालकांचा असा एक भ्रम झाला आहे. की, प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले की त्याला पुढील शिक्षण काही कठीण वाटत नाही.परंतु वास्तव काही अलट आहे.मातृ भाषेतून शिक्षण घेतल्यामूळे मुलांची संकल्पना अधिक स्पष्ट होतात. त्यास घोकंपटटी किंवा वारंवार अभ्यास करावे लागत नाही. विषयाची संकल्पना मुलांना कळाली तर ते अगदी बिनधास्त पणे व्यक्त करू शकतात आणि त्यासाठी मातृभाषेतील टापटीपपणा आणि होमवर्क पूर्ण करण्याची पध्दत एवढे दोनच बाबी कोटेकोरपणे पाळले जातात. शिकविणारी तज्ञमंडळी उपलब्ध नसल्यामूळे थातूर मातूर शिकविले जाते याकडे मात्र साफ दुर्लक्ष केल्या जाते. पालकांकडून भरपूर पमाणात फिस च्या स्वरूपात पैसा उकळणे आणि त्या बदल्यात मात्र त्या मुलांना काहीच मिळत नाही. हे वास्तव चित्र आहे. याउलट एखादी इंग्रजी शाळा असू शकते जे की पालक व विद्यार्थ्यांच्या सर्व आशा पूर्ण करू शकेल. मात्र याबाबीमूळे मुलांवर अपण अन्याय करीत नाही का ? याबाबीचा विचार कोणताही पालक करतांना आढळून येत नाही. या बाबतीत समाजातील काही शिक्षणतंज्ञ किंवा जाणकार लोकांनी पालकांचे योग्य मार्गदर्शन करून त्यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबविणे गरजेचे आहे. इंग्रजी माध्यमात शिकणा-या मराठी मुलाची भाषा जर ऐकायला मिळाली तर त्याची फारच कीव येते कारण त्यांना मराठी शब्दांचे अर्थ नीट कळत नाहीच शिवाय अक्षरांचे लेखन सुध्दा नियमानुसार करीत नाहीत.
पालक वर्ग नेहमी शेजा-यांशीच तुलना करत असतात. संत तुकाराम महाराज यांनी शेजा-यावर प्रेम करा असा संदेश दिला आहे. मात्र ही मंडळी शेजा-यांशी नेहमी तुलनात्मक दृष्टीने पाहतात. शेजा-याचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकत असेल आणि रेन रेन कम अगेन म्हणत असेल तर आपले मूल सुध्दा असे गीत म्हणावे असे त्यांना वाटते परंतू त्या इंग्रजीच्या मुलांना रेन रेन कम अगेन चा अर्थ कळत नाही तो फक्त यांत्रिक पध्दतीने गात असतो परंतू आपला मराठी शाळेतील मुलगा ‘ येरे येरे पावसा ’म्हणताना त्याच्या चेह-यावरचे भाव स्पष्ट दिसतात. कारण त्याचा अर्थ त्याला कळालेला असतो. लहान वयात जी भावना, संकल्पना स्पष्ट होते ती आयूष्यभर सोबत राहते तसेच संकल्पना समजून घेण्यासाठी मातृभाषा कधीच ओझे वाटत नाही इंग्रजी सारखी. इकडे मराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांची स्थिती खुपच चांगली आहे, असेही छाती ठोकून सांगता येत नाही. कारण येथील मुलांची स्थिती सुध्दा मराठीच्या बाबतीत फारच वाईट आहे. मराठी भाषेला नीट समजून न घेता दरवर्षी एका नवीन वर्गाची पायरी चढत शाळेच्या बाहेर पडलेला जेव्हा समाजात व्यवहार करण्यास प्रारंभ करतो निरक्षर व्यक्तीपेक्षा साक्षर व्यक्तीच मराठी भाषेला पदोपदी मारत असतांना आढळून येतो.
मात्र (मातृ) देवो भव, कार अपघातांत त्यांचा अंत्य (अंत) झाला, पाणी हे द्रव्य (द्रव) आहे. आज शिक्षक दीन (दिन) आहे, सचिनचा कर्म (क्रम) सौरभ नंतर येतो इत्यादी वाक्याचे बारीक निरीक्षण केल्यास कंसातील शब्दामुळे वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो मात्र भाषेचे ज्ञान नसलेले किंवा अर्धवट ज्ञानी मंडळी एक प्रकारे भाषेचे चिरफाड करून वाक्याचे अनर्थ करून टाकतात. हे म्हणजे कसे आहे, गाडी नीट चालवता येत नसलेल्या व्यक्तीच्या हातात गाडी देऊन अपघात करून घेण्यासारखे नाही का ? ज्याप्रकारे गाडी चालवण्यासाठी परवानाची गरज भासते अगदी त्याच प्रकारे भाषेची मांडणी करणा-या व्यक्तीला विशेष ज्ञान असल्याचा परवाना आवश्यक नाही काय ?
लहानपणा पासून मुलांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देवून त्यांच्यात वारंवार सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी प्रत्येक पालकांनी घेणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतांना मुलांना मराठीच्या जास्तीत जास्त शब्दाची तोंड ओळख कशी होईल ? याचे नियोजन प्रत्येक भाषा विषय शिकविणा-या शिक्षकांनी केले पाहिजे. शब्द पाहिले, ऐकले आणि लिहिले तरच त्याच्या कायम स्मरणात राहील. मराठी शब्दांच्या बाबतीत अगदी प्राथमिक शिक्षणाच्या पाया पासून श्रवण भाषण,वाचन आणि लेखन या (LSRW) चार टप्यानुसार चालते आणि शिक्षकांचे सुक्षम निरीक्षण असेल तर मुलांमध्ये भाषेचे फार कमी चुका होतील. परंतु विशेष करून येथेच दुर्लक्ष केल्या जाते आणि भविष्यात याच मुलांच्या हातून भाषेची चिरफाड होतांना दिसून येते. मराठी भाषा फार सोपी वाटत असेल तरी या विषयात अनुत्तीर्ण होणा-यांची संख्या फार मोठी आहे. कारण स्वत:च्या भाषेत या मुलांना वर्णन करता येत नाही. त्यांना वेळेवर पर्यायी अर्थ पूर्ण शब्द आठवत नाहीत किंवा खरा शब्द कसा आहे? हे ही लक्षात येत नाही. भाषेनुसार सन 1960 साली मराठी राज्याची निर्मिती झाली. परंतू गेल्या पन्नास वर्षात मराठीचा व्हावा तेवढा विकास झाला नाही. कारण या समस्येकडे कुणीच गांर्भीर्याने लक्ष देत नाहीत. यासाठी समाजातील प्रत्येक घटक तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे मराठीची प्रगती व्हावी, त्याचा विकास व्हावा,त्याची चीरफाड होवू नये असे वाटत असले तर प्रत्येकाने आज जागे होणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेतून विशेष करून मराठी भाषा शिकविणा-या शिक्षकांनी याविषयी गांभीर्याने दक्षता घेवून मुलांच्या भाषिक कौशल्याचा विकास करावा. इयत्ता पहिली व दुसरीमध्ये अनुलेखन ,तिसरी व चौथ्या वर्गात शुध्दलेखन आणि पाचवी ते आठव्या वर्गापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना शुध्द लेखन योग्य प्रकारे करता यावे असा किमान उद्देश डोळ्या समोर ठेवून कार्य केल्यास मुलांत वारंवार होणा-या चूका नक्कीच टाळता येतात. बहुतांश वेळा मुलांची श्रवण प्रक्रिया योग्य प्रकारे विकसीत न झाल्यामुळे समान आवाजाच्या शब्दात मुले घोळ करतात जसे खाक-काक, मखर–मकर , खेळ-केळ ,भार–बार, घार–गार , झरा–जरा ,झाग–जाग,धार–दार ,भाई–बाई , साफ–साप,फळ-पळ, संग-संत,बंध-बंद, फर–पर ,खल-कल, भाग–बाग, साथ–सात , पथ–पत,कोश-कोष , इत्यादी शब्द ज्यांची ध्वनी जवळपास सारखी वाटते आणि शब्दाचा अर्थ बदलतो. यानंरत मराठीत असेही काही शब्द आहेत ज्यांच्या -हस्व व दीर्घ इकार व उकार मुळे वाक्याचा अर्थच बदलून जातो. जसे की, आदी–आदि, आयत- आयात, आर्त–आर्द, स्त्री-इस्त्री, कोश–कोष, दिन–दीन, नियत-नीयत, केशर–केसर, पास–पाश, पिक–पीक, बहु–बहू, लक्ष-लक्ष्य, विष–वीस ,चालक-चालाक, इ. अशा बारीक सारीक बाबींकडे विषय शिक्षकांनी लक्ष दिल्यास मुलांच्या मराठी लेखनात नक्कीच सुधारणा होवू शकेल.
मराठी भाषेचा विकास व्हावा व प्रगती व्हावी असे मनातून वाटत असले तर प्रत्येकांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. शालेय वयात इंग्रजी शब्दार्थ पाठांतर करीत असल्याचे आपणा सर्वांना आजही आठवते. मात्र मराठी शब्दार्थ पाठांतर आपण करतो कां? अर्थातच याचे उत्तर नाही असेच येते. इंग्रजी शब्दाची जास्तीत जास्त ओळख व्हावी म्हणून ऑक्सफर्डची डिक्शनरी प्रत्येकजण एकदा तरी हाताळलेला असतो. मात्र मराठीची शब्दासंपत्ती वाढवी म्हणून निदान मराठी विश्वकोषाचे खंड हे दूरचीच गोष्ट आहे निदान वसंत आबाजी डहाके यांचा शालेय मराठी शब्दकोशाचा शंभरामागे एखादा मराठी व्यक्ती हाताळतो. मराठी भाषेसाठी ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यास्तव प्रत्येकाने आपली शब्दसंपत्ती कशी वाढविता येईल याचा जरूर विचार करावा. यासाठी मुलांना लहानपणा पासून विविध प्रकारचे मराठी शब्दकोडे सोडविण्याचा छंद कसा लागेल याकडे विशेष लक्ष द्यावे. वारंवार कोडे सोडविल्यामुळे खेळत खेळत मराठी भाषेच्या अनेक शब्दांची व त्याच्या अर्थाची ओळख होते. मराठी भाषेच्या विकासासाठी व भाषेची चिरफाड टाळण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे

No comments:
Post a Comment