THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 2 March 2017

स्वरचिन्हे ओळख


🎯 स्वरचिन्हे ओळख 🎯

या टप्प्यात खालील प्रकारे स्वरचिन्ह ओळख करुन घ्यावी.1⃣ प्रथम एक लक्षात घ्यावे की स्वरचिन्हे या फक्त खुणा आहेत. तसेच त्यांना काना, मात्रा, वेलांटी असे न सांगता 'आ,ए, ई' असे स्वरचिन्हयुक्त शब्द संबोधावेत.

उदा- 'शाळा' या शब्दातील दोन्ही अक्षरे 'कानायुक्त शब्द' आहेत, असे न संबोधता त्यांना 'आ' युक्त शब्द असे संबोधावे

.2⃣ 'अक्षरओळख' या टप्प्यात किमान 10-12 अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक अक्षरांचा सरावासोबतच आपला पुढील टप्पा "स्वरचिन्ह ओळख" सुरु करावा. हळूहळू स्वरचिन्हासह वाचनात मुले शिल्लक अक्षरे वाचन करण्यास शिकतात
.3⃣ स्वरचिन्हाचा सराव घेताना मुलाला जे स्वरचिन्ह सोपे वाटेल किंवा आवडेल ते अगोदर घ्यावे.

उदा- एका मुलास 'ए' स्वरचिन्हयुक्त शब्द वाचण्यास सोपे वाटतात तर त्याच प्रकारच्या शब्दपट्यांचे वाचन घ्यावे.परंतु या ठिकाणी कधीही 'क' वर मात्रा 'के' असे वाचन करुन घेऊ नये.पुर्ण शब्दाचे वाचन घ्यावे.उदा- केक, केर, केस, इ.

4⃣ एकाच स्वरचिन्हाचे चांगले दृढीकरण होईपर्यंत सराव घ्यावा. त्यासाठी पुढील उपक्रम राबविता येतात.
👉आकाराद्वारे स्वरचिन्ह लक्षात रहावे म्हणून त्या स्वरचिन्हाचे शब्द वर्तमानपत्र, इतर पुस्तके, उजळणी पुस्तके यातून कट करुन आणणे/ संग्रह करणे.त्यांच्या वाचनाचा सराव घेणे.
👉 समान स्वरचिन्ह असणारा दुसरा शब्द शोधणे व त्याचे वाचनउदा- 'चार' शब्दातील 'चा' या स्वरचिन्हाचा दुसरा शब्द [चाक, चातक, इ.] शोधणे व त्याचे वाचन
👉सारख्याच स्वरचिन्हयुक्त अक्षरांनी सुरुवात होणाऱ्याशब्दांची माळ तयार करणे. जास्तीत जास्त मोठी शब्दमाळ बनविण्यास प्रोत्साहन द्यावे.

👉 नंतर दोन गटात/मुलांमध्ये स्वरचिन्हयुक्त शब्दांच्या भेंड्या घ्याव्यात.उदा- कार - रास - साप - पाढा - ढाल इ. असे.[यामुळे मुळाक्षर व स्वरचिन्हयुक्तयुक्त अक्षर यांच्या उच्चारातील भेद हळूहळू मुलांच्या लक्षात येण्यास मदत होते.

👉 शब्दबँक - या बँकेत मुले दिलेल्या स्वरचिन्हयुक्त शब्दांचा संग्रह करतात.उदा- 'आ' युक्त शब्दांचा संग्रह.यात इतर स्वरचिन्हासह असणारी आ युक्त शब्दही जमा करु द्यावीत.

उदा- मामी, मुलगा, कांदा, इ.यातील शक्य तितक्या शब्दांचे वाचन करण्यास प्रोत्साहन द्यावे. येत नसल्यास त्याला त्याचा वेळ द्यावा.अशी शब्दे जमा करण्यासाठी वर्तमानपत्रे, जूनी पुस्तके इ.चा उपयोग करावा. मुलांना अशी शब्द जमा करुन ठेवण्यासाठी रिकामी खोके उपलब्ध करुन त्यावर त्या मुलाचे नाव टाकून वर्गात ठेवण्यास जागा द्यावी. हे खोके म्हणजे त्याची शब्दबँक.5⃣ आवडत्या स्वरचिन्हयुक्त शब्दाचे वाचन करु लागल्यावर त्यासोबतच मुले इतर स्वरचिन्हयुक्त शब्दाचे वाचन करु लागतात. त्यांना सोप्या वाटणाऱ्या स्वरचिन्हाचे वाचन हळूहळू करु द्यावे.6⃣ या टप्प्यावर बहुतेक मुले सरावाने सर्व मुळाक्षरांचेवाचन करु लागतात.त्यांना आता मुळाक्षरांचे प्रत्यक्ष  लेखन करु द्यावे. त्यासाठी शक्यतो पाटी किंवा दुरेघी वहीचा उपयोग चांगला. मुळाक्षरे क्रमाने न घेता ती उलटसुलट वेगवेगळ्या क्रमाने घ्यावीत म्हणजे लवकर दृढीकरण होते.7⃣ या टप्यात कोठेही बाराखडीचा [क, का, कि, की, कु... ज्ञौ, ज्ञं, ज्ञः अशी] परिचय करुन देऊ नये. व त्याचे असे वाचनही घेऊ नये.8⃣ या टप्प्यात मुलांना शब्दासह विशेषण इ. लावून वाक्यांश बनविण्यासाठी प्रोत्साहित करावे.उदा- ससा-  पांढरा ससा, गुबगुबीत ससा, छोटा ससा, मऊ ससा, इ. असे जास्तीत जास्त वाक्यांश बनविण्यास प्रोत्साहित करावे.9⃣ स्वरचिन्हयुक्त चार-पाच शब्दांचे दृढीकरण झाल्यानंतर हळूहळू 'जोडशब्दाचे वाचन' सुरु करावे. याची माहिती पुढील लेखमालेत पाहू

.🈸पुढील टप्प्यासाठी इथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment