THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday 17 March 2017

आमचे उपक्रम

आमचे उपक्रम


]
____________________________
मित्रांनो
🏻
“गुणवत्ता शोध व संवर्धन” च्या राज्यस्तरीय समूहात, प्राईम टाईम मध्ये विषयांकीत बाबीवर अतिशय मनमोहक व उपयुक्त चर्चा झाली
————————–
विषय :-
मी अनुभवलेला माझ्या
वर्गातील यशस्वी उपक्रम
————————–
सदर चर्चेत सहभागी होणा-या या शिक्षक
बंधू भगिनींना ज्या उपक्रमांतून गुणवत्ता
साध्य करण्यात सर्वाधिक यश मिळाले
त्या एकमेव उपक्रमाबाबत ग्रुपला
माहीती सांगायची होती
अवघ्या एका तासाच्या कालावधीत निर्धारित करण्यात आलेल्या वेळात एकाहून एक सरस असे उपक्रम समोर आलेत. जे स्वानुभवातून यशस्वी झालेले होते. सदर चर्चेत महाराष्ट्रातील कानाकोप-यातून असलेल्या बहूतांश जिल्ह्यातील मित्रांनी सहभाग नोंदविला

चर्चा अतिशय छान व हर्षोल्लासीत करणारी ठरली. नविन सदस्यांना “गुणवत्ता शोध व संवर्धन” च्या माध्यमातून आपले उपक्रम योग्य ठिकाणी मांडल्याने सार्थक झाल्याचे अनुभव कथन केले.
या मित्रांनी शेयर केलेले उपक्रम जर आपणही उपयोगात आणण्यास इच्छुक असाल, तर आपल्या साठी सदर उपक्रमांचे संकलन
———————————————
“गुणवत्ता शोध व संवर्धन” च्या ब्लॉग पेजवर वर सदैव ठेवत आहोत.
🏻
वर्ग 1 ला
विषयभाषा
मी अनुभवलेला माझ्या वर्गातील यशस्वी उपक्रम
मुलांमध्ये प्रश्न निर्मिती कौशल्य विकसित करने
या उपक्रमासाठी मुलांना गोलात बसवून कोणताही विषय न देता प्रत्येक मुलाला एक
प्रश्न विचारण्याची संधी द्यावी
प्रश्नांची उत्तरे इतर मुले देतील
उपयुक्तता
एकाच प्रश्नाची अनेक उत्तरे मिळतात
मुलांच्या कल्पना शक्तिला वाव मिळतो
अनेक उत्तरातून एकसंघ विचारमाला तयार होते
मुलांमध्ये एखाद्याचे उत्तर चुकल्यास चर्चेचे वातावरण तयार होते
उदा. आंबा कसा असतो?
या प्रश्नाची अनेक उत्तरे मिळतील
फायदे
मुलांमध्ये सभाधीटपणा
भाषिक विकास होतो
नेतृत्वाची संधी मिळते
मूल कोणालाही प्रश्न विचारू शकते
वेगळा विचार करण्यास चालना
मिळते
वर्गानुसार काठिन्य पातळी वाढ विता येते


कपडे वाटप
—————
मी सर्व मुलांना त्यांच्याकडे असणारे चांगले पण न वापरता तसेच शिल्लक असणारे कपडे आणायला सांगितले. व प्रदर्शन भरवले. ज्या मुलांना कपडे नव्हते त्यांना ते वाटले.


Daily Presently Word
विद्यार्थी हजेरी घेताना yes sir येवजी मी डेली एक english word (स्पेलिंग व् उच्चार)सांगायला सांगितले
दररोज हसत खेळत मुले शब्द सांगू लागली दररोज किमान25 ते 30 शब्द होतात
उपक्रमाची यशस्वीता
शब्दसंग्रह वाढला
निकोप स्पर्धा लागली


व्हिडीओ निर्मिती
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून अप्रगत मुलांच्या पालकांच्या मोबाईल मधे दिले विशेष करून काना वेलांटी उकार मात्रा हे व्हिडिओ जास्त प्रमाणात तयार केले
हस्ताक्षर सुधारन्या साठी “अक्षर माझे मोती”हा उपक्रम सुरु केला व दर महिन्याला पेन पेंसिल वही असे उत्तेजनार्थ बक्षिस सुरु केले


हसतखेळत सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार उभे
करून प्रत्येकाने आपापले पूर्ण नाव सांगावे.पुढे पुढील विद्यार्थ्याने मागच्याचे/अगोदरच्या विद्यार्थ्याचे नाव आणि मग आपले नाव सांगावे.
यामुळे सर्वांची ओळख तर होतेच पण सोबत नावांचा संग्रह वाढेल.
याप्रमाणे
पक्षी
फळ
मामाच्या गावाचे नाव
अशा प्रकारे आपण हसतखेळत
शब्दसंपत्ती वाढवू शकतो.
——————————————

——————————————-

विषय मराठी १ ली
लेखन विकास
१.लेखनाचा सराव होणे
२.लेखन कैशल्य विकास करणे
या उपक्रमासाठी संगणकावरून लेखन पुर्व तयारी पासुन रेषांचा सराव अक्षर लेखन सराव पेपर तयार करून नियमित १ तास सराव घेतला नंतर तेच पेपर रंगीत खडूने रंगवून घेतले या वेळी वर्ग रचना गेलाकार करून बसविले
याचा फायदा लेखन करतांना ची भिती निघून गेली ज्यांना जमत नव्हते त्यांना पुन्हा सराव दिला

Sir …
I draw a throphy on my class wall.
I write daily one student name for cleaning (dress ,hair ,nail ,etc…)



वर्ग 6 वा
विषय.. सा शास्त्रे

मी अनुभवलेला माझ्या वर्गातील यशस्वी उपक्रम
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची विभागवार ओळख..
36 विद्यार्थी सहभागी..
प्रत्येक विद्यार्थी एक जिल्हा
त्यापैकी 6 विद्यार्थी गट प्रमुख उदा अमरावती, नागपूर असे प्रशासकीय विभाग
असे सहा गट तयार केले.
विभागवार गट पाडण्यात आले.

चर्चा व प्रश्न निर्मिती ला संधी.
मुलांनी असे प्रश्न स्वत:विचारले जसे
कोणकोणत्या विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
कोकणातील जिल्हे कोणते?
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्य़ात येतो?
अशा प्रश्नांसाठी पुरेशी माहिती पुरवली गेली…
तासिका संपताना प्रत्येक विद्यार्थी आपला जिल्हा, विभाग विशेष ओळख सांगू लागला.
सर्वांना वहीत विभागवार जिल्हे लिहिण्यास सांगून चुकीचे शब्द दुरूस्ती करून देण्यात आले…
खूप मजा आली व ज्ञान संवर्धन करता आले. 🏻🏻
आपला स्नेही,
🏻



दररोज भाषा व गणित विषयातील श्रृतलेखनाचा सराव व त्यावरील चाचण्या घेत असतो.


   …..अमित
कोठारी महागांव
आता मुले पद्म अब्ज कोटी पर्यंत संख्या वाचतात व लिहतात.
आहे ना मॅजीक
काही टिप्स
 सर्व प्रथम एकक दशक शतक या ताघांना सोडायचे नाही या साठी मुलांना सागांयचे की हे तिन भाऊ आहे यांना सोडायचे नाही.
जसे
तिन भाऊ ए द श
0 0 0
मुलांना सांगायचे तिन भावात दोन दाखवा मुले सांगातात
  002
तिन भावात विस दाखवा
  020
तिन भावात दोनशे चार दाखवा
  204
असा सराव घेण्यात यावा या मध्ये तिन भावाला सोडायचे नाही.हजार व दसहजारसाठी नवरा बायको वापरायचे नवरा बायको यांना सोडायचे नाही
जसे
हजारात एक हजार दाखवा
01 वरचे तिन भाऊ 01000
लक्ष साठी तसेच लक्षाचे नवरा बायको यांना सोडायचे नाही
लक्षात बारा लक्ष दाखवा असे सांगितल्यास
12 लक्षाचे नवरा बायको त्या समोर हजाराचे नवरा बायको जोडा 00 नंतर तिन भाऊ 000
12 00 000 बारा लक्ष
 या पुढे असेच नवरा बायको कोटी अब्ज
बघा मुले अब्ज पर्यंत संख्या सहज वाचतात व लिहतात
  बघाल ना प्रयोग करुन
पुन्हा भेटू
? ….


गणित साठी आम्ही मुलांना आठवडे बाजारात घेऊन जातो . वजन माप कळते बेरीज वजाबाकी कळते. ज्या वस्तू भाजी खरेदी केली त्याची बेरीज वजाबाकी.


————————–
विषय :-
मी अनुभवलेला माझ्या
वर्गातील यशस्वी उपक्रम
————————–

उपक्रमाचे नाव : – दिनांकाचा शिक्का

वर्ग :- पहिला
————————————————
विषय
Marathi English Math
***********************************
घटक :– ग्रूहपाठ ;स्वाध्याय व अभ्यास तपासणे
  कृती
वार्षिक नियोजनानुसार पाठ टाचण व त्यानुसार प्रत्यक्ष वर्ग अध्यापन व त्यावर आधारित स्वाध्याय अभ्यास व गृहपाठ देउन विद्यार्थीमित्रांच्या वहीमध्ये त्या दिवशी शाळेत आल्याबरोबर वही तपासून त्यावर शिक्का मारणे ह्यामुळें पाल्याने दिवसभर शाळेत कोनता घटक शिकला त्यात त्याला काही अडचणी आल्या का ते पालकांच्या लक्षात येते व ते पाल्यास अभ्यासासाठी मदत करु शकतात.
हेतु

आपल्या अध्यापन कार्यात पारदर्शकता राहावी
पालकांसोबत सुसंवाद रहावा

विद्यार्थीप्रगतीसाठी सातत्य ठेवता यावे
………………………………………………….
मला झालेला फायदा
पालकांची वर्षभर तक्रार आली नाही
ज्या दिवशी वहीत शिक्का दिसला नाही पालकांचे फोन येतात




Classwise word dictionary from Std 5 to 7
Every student should find the word from his dictionary to English text book and pronounce it as written in dictionary..
Afterwards they should write the Marathi mean in text book with the pencil n in notebook with the pen… This classwork is very useful to read, pronounce n write new words…. Enriches vocabulary


Sir
I use upkaram called
“Daily challenge”
I give 1 word/sentence. Next day who transalte this word in maximum number of languages( urdu, hindi , marathi , etc…)
he/she will be winner of day.


मी घेतलेले उपक्रमापैकी दोन उपक्रम
1)गणित विषयासाठी
इयत्ता पहिली ते तिसरी
प्रथम 9 विद्यार्थी गट केला व 1 ते 9 अंक कार्ड बोर्डवर लिहुन उ प्रत्येकाला एक अंक उचलायला सांगितले प्रत्येकाने एक उचलून तो मोठ्याने वाचायचा मग मी जो अंक सांगेन तोच अंक विद्यार्थी दाखवणार. नंतर दोनअंकी संख्या म्हणजे दोन विद्यार्थी एकत्र नंतर तीन अंकी म्हणजे तीन विद्यार्थी एकत्र
2) इंग्रजी विषयाचे क्रियापदाचे फक्त अ‍ॅक्शन करायचे व विद्यार्थी तो शब्द ओळखायचा


माझा उपक्रम
पहाट नवी, दिवस नवा
नवा शब्द मला रोजच हवा
——————————–
वर्ग :- २ रा
विषय :- सर्व
कृती :-
१. दररोज वर्गात आल्या बरोबर, भिंतीजवळ ठेवलेल्या फलकवर आपला रकाना शोधणे, तो रोल नंबर वर असेल
२. नविन कोणताही एक शब्द त्या रकान्यात लिहणे
३. ब्रेक मध्ये परस्परांनी लिहलेले शब्द परस्परांना दाखवणे व अर्थ सांगणे (अनौपचारिक पणे)
४. सायंकाळी त्या शब्दांपैकी जो शब्द नाही समजला किंवा चुकला असे वाटले त्यावर गोल करुन ठेवणे
५. शाळा संपण्यापुर्वी चर्चा करुन दुरुस्ती करुन घेणे
हेतू :-:
नविन शब्द ओळख, शब्द संपत्तित वाढ , शोधकवृत्ती, चिकीत्सकवृत्ती जोपासना, अवांतर वाचनाची पूर्वतयारी व आवड निर्माण करणे


वर्ग ५ ते ७ च्या मराठी विषयासाठी शब्दांचा माईंड मॅप तयार करणे. ह्या उपक्रमात विद्यार्थ्यांचा शब्दसाठा खुप वाढतो. व बुध्दी चा कस लागतो.

पालकां च्या विविध खेळा च्या स्पर्धा घेतल्या बक्षिसे दिली . सर्व पालक भावूक झाले बालपणी च्या आठवणी जागृत केल्या बद्दल त्यांनी आभार मानले


मराठी विषयासाठी माईंडमॅप
सर्व प्रथम एक अक्षर घेऊन त्या अक्षराचे काना नसलेले शब्द पहिल्यां सर्कल मध्ये त्यानंतर काना त्यानंतर पहिली वेलांटी असे वाढवत जायचे ते काना व दोन मात्रा पर्यंत


उपक्रमाचे नाव : – दैनिक गृहपाठ नोंद रजिस्टर
वर्ग :- पहिला ————————————————
विषय
Marathi English Math
***********************************
घटक :-गृहपाठाची नोंद ठेवणे
कृती
वार्षिक नियोजनानुसार पाठ टाचण व त्यानुसार प्रत्यक्ष वर्ग अध्यापन व त्यावर आधारित गृहपाठ देउन त्याची नोंद वहीमध्ये करणे
हेतु
विद्यार्थी मित्रांना सर्व घट्कांचा भरपूर सराव व्हावा
स्वतःला सिन्हावलोकन करता यावे
पालकांना पुरावा देता यावा
………………………………………………….
मला झालेला फायदा
अध्यापनात सातत्य राहिले
90% मुले प्रगत झाली
मुलांसाठी अजून काय करता येइल ह्याची दिशा मिळाली



आम्ही पाढे पाठांतरासाठी दिनांक तो पाढा हा उपक्रम घेतला,व दररोज म्हणून घेतले,सर्वच शिक्षकांनी मेहनत घेतली,अवघ्या एकाच महिन्यात पहिली वगळता 70℅मुलांना 30 पर्यंत पाढे पाठ झाले


Sir ….
my next upkram name is
” Khubsurat Hath”(beautiful hand)
this Activity only for group lader in constructivism. Who achive in target (lesson) for apragat students.


जि. प. शाळा गावपोड शिवणी. ता. घाटंजी जि. यवतमाळ वर्ग: १ला,षय: भाषा
समस्या: विद्यार्थ्यांची मात्रुभाषा कोलामी असल्यामुळे शाळेत आल्यावर मराठी कळत नाही…..
कारण: १००% कोलाम वस्ती त्यामुळे कुटुंबात व वस्तीत कोलामीच बोलली जाते..
उपक्रमाचे नाव: (कोलामी)बोली भाषेकडुन (मराठी)प्रमाण भाषेकडे.
हेतु: विद्यार्थ्यांनां त्यांच्या बोलीभाषेवरुन प्रमाण भाषेवर नेने..
उपक्रमाची कार्यवाही:
सर्वात आगोदर मोठे विद्यार्थ्याच्या मदतीने बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह केला..
विद्यार्थ्याकडुनच चित्र दाखवुन क्रुती करुन त्यांच्या बोलीभाषेतील शब्द काढुन घेतली..
त्यांनां त्याच्याच बोलीभाषेत सुरवातीला बोलु दिले. बोलीभाषेतील पारंपारीक गीते, गोष्टी त्याच्याकडुनच काढुन घेतली यामुळे विद्यार्थी शाळेत रमला..
विद्यार्थ्यांशी त्यांच्या बोलीभाषेत संवाद साधन्यासाठी आम्ही बोलीभाषेतील वाक्यरचना, व्याकरण समजुन घेन्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्याना प्राथमिक सुचना त्यांच्या बोलीभाषेतुन दिल्या.
प्राथमिक संवाद त्यांच्या बोलीभाषेतुन साधण्याचा प्रयत्न केला त्यामुळे विद्यार्थी आमच्या जवळ आली.
विद्यार्थांशी खुप सा-या अनौपचारीक गप्पा केल्या त्यामुळे न बोलनारी मुले बोलायला लागली..
चित्र दाखविले विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव त्यांच्या बोलीभाषेत सांगीतले आम्ही तेच मराठी व इंग्रजी मधे सांगीतले.
  क्रुती केली तीला त्यांच्या बोलीभाषेत काय म्हनतात ते त्यांनी सांगीतले आम्ही तेच मराठी व इंग्रजीत सांगीतले..
एखादी अमुर्त संकल्पना समजावण्यासाठी वेगवेगळे प्रयाेग केले समजेपर्यंत वेळ दिला..
विद्यार्थी हळुहळु प्रमाण भाषा समजायला लागले.
आज १/२ वर्गातील विद्यार्थ्याने बोलीभाषेत बोलले ३/४ वर्गातील विद्यार्थी मराठी मधे छान भाषांतर करतात.
आता वर्ग ३/४/५ चे विद्यार्थी मराठी समजतात, वाचतात, लिहतात व मराठीतील अभ्यासक्रम आनंदाने शिकतात.
हाच उपक्रम शिक्षणाच्या वारीमधे स्टॉल क्र. ४८ वर मांडन्याची संधी आमच्या शाळेला मिळली होती🏻🏻


माझा उपक्रम
माझा शब्कोश
मुलांना एक मुळाक्षर देऊन त्या पासुन सुरू होणारे शब्द नियोजित वेळेत लिहण्यास सांगणे.
अशाप्रकारे वेगवेगळे अक्षर देऊन शब्द लिहून घेणे त्या करीता पुस्तकाचा , चित्र तक्ता यांचा आधार घेणे.
तसेच समान अक्षराने शेवट होणारे शब्द शोधण्यासाठी सांगणे व लिहून घेणे .
सर्व लिखीत शब्दांचे बुकलेट तयार करणे.
अशाप्रकारे माझा शब्दकोश तयार करवून घेणे.
फायदा
शब्दसंपत्तीत वाढ
वाचन लेखन सराव
वेळेचा उपयोग
कृती तून आनंद व शोधवृत्ती वाढ
स्वयंअध्ययन


वग॔ -1ला
विषय -भाषा
लेखन कौशल्य
उपक्रमाचे नाव –
धुळपाटी
माती व मुलांचे नाते तसे जिवाभावाचेच!
कधी मातीत खेऴू तर कधी माती आईच्या चोरून खाउ हा त्यांचा आवडता विषय !
माझी मुले धुळपाटीवर अक्षरे गिरवायला लागली अगदी तललीन होवून!
अन काय आशचय॔ अ नकाढणारा मुलगा ज्ञ काढायला लागला .


मॅजिक बॉक्स तयार करण्यासाठी पुट्ठ्याचा बॉक्स( कार्टून) घेऊन त्याला समोरून in वरील बाजूनेout खालील बाजूने कट करून घ्यायचे. in/out चा जो आकार त्या आकाराच्या कपड्याच्या डब्ब्याच्यापट्ट्या कापून घेऊन त्या आतील बाजूने ) )🏻अश्या फिक्स करून घ्यायच्या झाला magic box तयार.नंतर यासाठी शब्दांचे कार्ड तयार करायचे.उदा.वि× शब्द जसे समोरील बाजूने शुभ× अशुभ( मागील बाजूने) तयार झालेले कार्ड वरील बाजूने शुभ टाकले तर खालील बाजूने अशुभ येईल.अशाप्रकारे आपण गणित,इंग्रजी,भाषा विषयांची विविध कार्ड तयार करू शकतो.


स्वच्छ माझे दात
दररोज शाळा सुटण्यापूर्वी सर्व
विद्यार्थ्याचे टूथब्रश व पेस्टचा
वापर करून दात घासून घेतले
जातात.
 फायदे
🏼प्रत्येक जण दात घासतो.
🏽घरीपण हिच सवय लागली.
🏼टुथब्रश वर टाचणीने मुलांची
नावे लिहली आहेत.त्यामुळे
मिक्स होत नाही.
🏽 स्वच्छतेची मूलभूत सवय
लागली.
——————————————

——————————————-
मी राबविलेल्या उपक्रमाचे नाव आहे Telling word and its category while giving attendance. या उपक्रमामध्ये हजेरी घेतांना दररोज एका नविन अल्फाबेटपासुन सुरू होणारे शब्द सांगायचे व त्या शब्दाचे वर्गीकरण करायला लावणे. उदा.सांगितलेला शब्द orange असेल तर what is orange? असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर orange is fruit.असे असेल. याप्रमाणे what is duck ? ans duck is bird. what is nose? ans nose is a part of body. what is pen ? ans pen is writing thing. what is earring? ans earring is ornament. what is leaf ? ans leaf is a part of tree. what is train ? ans train is vehicle. याप्रमाणे प्रश्न विचारणे.जर एखादा शब्द वर्णन करता आला नाही तर त्याला other word असे संबोधणे.



उपक्रमाचे नाव : – पुरक पुस्तके वापरणे
वर्ग :- पहिला
————————————————
विषय
Marathi English Math
***********************************
घटक : विषयानुसार पुरक पुस्तकांचा
कृती
विद्यार्थी १००% प्रगत करण्यासाठी भाषा गणित ईंग्रजी चित्रकला ह्या विषयासाठी पालकांना विश्वासात घेउन अकरा पुस्तके पालकांनी स्वयंस्फूर्तिने घेतली
हेतु
मुलांना आनंददायी अध्यापन
१००% क्षमता विकसित करणे
मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लावणे
………………………………………………….
मला झालेला फायदा
मुले प्रगत झाली
मुले अभ्यासमग्न झाली


आपण सर्वांना अधिकाधिक माहीती देण्यासाठी केलेली छोटी-सी धडपड कशी वाटली हे कळवाल या अपेक्षेसह रजा घेतो.
धन्यवाद !
आपला मित्र

No comments:

Post a Comment