THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 27 March 2017

सरल: स्टूडंट ट्रांसफर

सरल: स्टूडंट ट्रांसफर
स्टूडंट ट्रांसफर रिक्वेस्ट कशी करावी?

*सरल महत्वाचे* : 
*(student पोर्टल विशेष)*
*दिनांक : 20/07/2016*

१) *DUPLICATE student विषयी* : student पोर्टल मध्ये सर्वप्रथम DUPLICATE विद्यार्थी शोधण्याचे काम चालू करावे.सध्या WITHIN SCHOOL DUPLICATE विद्यार्थी शोधण्याची आणि delete करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी HM ने आपले login करून फक्त DUPLICATE student tab वर क्लिक करावे.आणि जर आपल्या शाळेत विद्यार्थ्याची DUPLICATE म्हणजेच एकापेक्षा अधिक नोंद झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांची लिस्ट दिसेल त्यापैकी योग्य नोंद ठेऊन उरलेल्या नोंदी delete करावयाच्या आहेत याची नोंद घ्यावी.ज्या शाळेत विद्यार्थ्यांची DUPLICATE नोंद झालेली नाही आहे अशा शाळेच्या बाबतीत विद्यार्थ्यांची लिस्ट दिसून येणार नाही.यानंतर लवकरच WITHIN BLOCK आणि WITHIN DIST. मध्ये DUPLICATE विद्यार्थी BEO आणि EO यांच्या login मधून शोधण्याचे आणि delete करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या ठिकाणी एक लक्षात घ्यावे की विद्यार्थी TRANSFER करण्यापूर्वी आपणास DUPLICATE student हे delete करावयाचे आहे.कोणत्याही परिस्थितीत शाळेत DUPLICATE विद्यार्थी नोंद राहणार नाही ही मुख्यध्यापकाची जबाबदारी आहे

*TRANSFER student विषयी* :

१) विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची REQUEST ही नविन शाळेच्या मुख्यध्यापकाने जुन्या शाळेच्या मुख्यध्यापकाला पाठवायची आहे.ही REQUEST पाठवत असताना आपण योग्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि योग्य शाळेलाच पाठवत आहोत का याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे.बऱ्याचदा चुकीच्या मुलाची REQUEST पाठवली गेली आणि ती REQUEST चुकून कनफर्म झाल्याचे सुध्द्धा दिसून येते.तेंव्हा REQUEST  विचारपूर्वक पाठवावी ही विनंती.एकदा REQUEST पाठवली गेली की तो विद्यार्थी कन्फर्म अथवा reject होईपर्यंत इतर शाळेला REQUEST  लिस्ट मध्ये दिसत नाही याची नोंद घ्यावी.

२) विद्यार्थी REQUEST  केल्यावर सदर REQUEST ही जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाला कन्फर्म करण्यासाठी जाते.तेंव्हा सर्वप्रथम ही REQUEST कन्फर्म करण्यापूर्वी मुख्याध्यापकाने सदर REQUEST ही ज्या शाळेत मुल शिकायला गेले आहे त्याच शाळेची आहे किंवा नाही हे आलेल्या दाखला मागणी रजिस्टर वरून तपासून मगच REQUEST कन्फर्म करावी.अन्यथा चुकीच्या शाळेतून REQUEST आली असेल तर घाईत कन्फर्म होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अशा चुका बर्याच शाळेच्या मुख्याध्यापकाकडून होत आहे.जेंव्हा REQUEST कन्फर्म होते त्यानंतर अशा मुलाना पुंन्हां return करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आहे.अशा चुकून कनफर्म झालेल्या केस मध्ये काय करावे हा प्रश्न आहे.अशा वेळी चुकीच्या शाळेला विद्यार्थी कन्फर्म झाला असेल तर त्या नव्या शाळेने म्हणजे ज्यांनी REQUEST केली होती अशा शाळेने तो विद्यार्थी १२३ असा कोणताही रजिस्टर नंबर आणि कोणतीतरी शाळेत प्रवेश तारीख आणि इयत्ता भरून विद्यार्थी update करून घ्यावा.आणि आता जुन्या म्हणजेच त्या विद्यार्थ्याच्या मुळ शाळेत ज्या शाळेत तो सध्या शिकत आहे अशा शाळेने पुन्हा या शाळेला नव्याने ट्रान्स्फर student साठीची REQUEST पाठवावी.आणि विद्यार्थी परत आपल्या शाळेत ट्रान्स्फर करून घ्यावा.

३)कधी कधी विद्यार्थी ट्रान्स्फर REQUEST पाठवताना जुन्या शाळेत विद्यार्थी दिसत नाही अशा वेळेला male,female,शेजारच्या वर्गामध्ये असे सर्च चे option वापरून शोधून पहावा.एवढे करूनही विद्यार्थी दिसून येत नसेल तर सदर विद्यार्थी शाळेत मागील वर्षी online माहिती मध्ये नोंदवला गेला नाही असे समजून जेंव्हा नविन विद्यार्थी add करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल तेंव्हा तो विद्यार्थी add करून घ्यावा.

४) कधी कधी विद्यार्थी ट्रान्स्फर REQUEST पाठवताना जुन्या शाळेत विद्यार्थी दिसत नाही परंतु मागील वर्षी त्या शाळेने त्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहे असे म्हणणे आहे आणि त्यांनी खरोखर ती भरलेली देखील आहे असे असताना काय करावे ही समस्या येत असेल तर हे लक्षात घ्या की मागील वर्षी *मायग्रेशन* tab चा वापर करून असे विद्यार्थी मायग्रेट झाले असल्याची शक्यता आहे.तरी अशा केस मध्ये पुढील सुचना येईपर्यंत वाट पहावी.आणि जेंव्हा असे विद्यार्थी दिसून येतील तेंव्हा नविन शाळेने REQUEST पाठवावी.त्या वेळी तशा सुचना देण्यात येतील याची नोंद घ्यावी,अन्यथा नविन विद्याथी add करण्याची सुविधा आपणास दिल्यानंतर आपणास सदर विद्यार्थी add करण्याचा पर्याय उपलब्ध असेलच.

५) विद्यार्थी ट्रान्स्फर करताना असे लक्षात आले की सदर विद्यार्थ्याची माहिती मध्ये काही चुका आहेत अशा वेळी काय करावे.तर अशा वेळे सदर विद्यार्थी माहिती थोडीफार चूक असली तरी तो विद्यार्थी ट्रान्स्फर करून घ्यावा आणि नंतर सेकंड फेज मध्ये ती सर्व माहिती दुरुस्थ करण्याची सुविधा आपणास उपलब्ध करून दिली जाणार आहे त्या वेळी असे विद्यार्थी दुरुस्थ करून घ्यावे ही विनंती.

६) विद्यार्थी ट्रान्स्फर करताना विद्यार्थ्यांची इयत्ताची नोंद चुकली आहे म्हणजेच विद्यार्थी भलत्याच इयत्तेत दिसून येत आहे किंवा इतर माहिती चुकली आहे अशा वेळी काय करावे.तर अशा चुका दुरुस्थ करण्यासाठी आपणास २ दिवसात इयत्ता व इतर बाबी update करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,तेंव्हा त्वरीत सदर इयत्ता व इतर माहिती दुरुस्थ करून घ्यावी.

७) इयत्ता १ ते ८ वीच्या मुलांचे system द्वारे ऑटो प्रमोशन करण्यात आलेले आहे अशा वेळी ज्या शाळेने विद्यार्थी ऑटो प्रमोशन होण्याचा आधी ट्रान्स्फर केलेले आहेत असे सर्व विद्यार्थी चुकून *दोन वर्ग* पुढे गेल्याचे दिसून येत आहे अशा मुलांना पुन्हा एक वर्ग मागे आणावे लागणार आहे परंतु तशी सुविधा देण्यात आलेली नाही आहे अशा मुलांच्या बाबतीत अशा चुका दुरुस्थ करण्यासाठी आपणास २ दिवसात इयत्ता update करण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,तेंव्हा त्वरीत सदर इयत्ता दुरुस्थ करून घ्याव्यात.

८)या ठिकाणी हे लक्षात घ्या की विध्यार्थी माहिती मध्ये ज्या काय चुका झालेल्या असतील त्या चुका आपणास लवकरच दुरुस्थ करता येणार आहे.तशी सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.

९)काही शाळेने जुन्या शाळेस विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची REQUEST पाठवली होती,तसेच जुन्या शाळेने ही REQUEST कन्फर्म देखील केली परंतु कन्फर्म होऊन आल्यावर त्या विद्यार्थ्यांना नविन मुख्याध्यापकाने update केले नाही  आणी त्याच काळात ऑटो प्रमोशन प्रक्रिया system द्वारे झाली त्यामुळे असे update न झालेले विद्यार्थी सदर शाळेच्या updation च्या लिस्ट मध्ये दिसत नाही आहे.अथवा ती लिस्ट open होत नाही आहे.अशा वेळी काय करावे याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी कृपया *havelieducation.blogspot.in*  या ब्लॉग ला भेट द्या तेथे सविस्तर सांगण्यात आलेले आहे.

१०)काही शाळेच्या बाबतीत अशा समस्या आहेत की त्यांच्या शाळेतील मुले ही ऑटो  प्रमोशन झालेली नाही आहे,ती मागील वर्षीच्याच वर्गात दिसत आहे .तरी अशा मुख्याध्यापकांनी हे लक्षात घ्यावे की विद्यार्थी नोंद करताना अथवा online अपलोड करताना आपल्या चुका झाल्या असतील अन्यथा system कडून ऑटो update मध्ये आपली शाळा राहणार नाही.तरी अशा शाळांनी अशा चुका दुरुस्थ करण्यासाठी आपणास २ दिवसात इयत्ता update करण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे,तेंव्हा अशा ऑटो प्रमोशन न झालेल्या शाळांनी त्वरीत सदर इयत्ता दुरुस्थ करून घ्याव्यात.

११)जुन्या शाळेने नविन शाळेकडून आलेली REQUEST ७ दिवसात कन्फर्म केली नाही तर ती REQUEST *गटशिक्षणाधिकारी* login ला कन्फर्म अथवा reject करण्यासाठी automatic पाठवली जाते.या केस मध्ये विध्यार्थी माहिती चेक करून REQUEST कन्फर्म अथवा reject करणे हे काम खूप क्लिष्ट होऊन बसले आहे.अशा वेळी मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्या login ला हजारोने REQUEST आल्या आहेत.आता मात्र यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाने कन्फर्म करायला हव्या होत्या परंतु ट्रेनिंग उशिरा झाले असेल अथवा माहिती नसल्याने अथवा दुर्लक्ष झाले असेल या आणि अन्य कारणामुळे request कन्फर्म केल्या नसेल त्या सर्व REQUEST पुन्हा कन्फर्म करण्यासाठी REQUEST return ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या मध्ये गटशिक्षणाधिकारी हे आपल्या कार्यक्षेत्रातील cluster निहाय आलेल्या REQUEST return करू शकणार आहे.विशेष म्हणजे या REQUEST कन्फर्म,reject अथवा return करताना एकाच वेळी अनेक *(बल्क)* REQUEST कन्फर्म,reject अथवा return करता येण्याची सुविधा काल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.

१२)इयत्ता ९ ते १२ पर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्यांचे pramotion हे system द्वारे न होता *manually* करावयाचे आहे याची नोंद घ्यावी.हे करत असताना एखाद्या विद्यार्थ्याला आपण प्रमोट केले की तो विद्यार्थी पुन्हा त्या लिस्ट मध्ये दुसऱ्या वेळी दिसून येत नाही.त्यानंतर आपण प्रमोट करताना आपण चुकलो आहोत असे लक्षात आले तर  *undo pramotion* च्या tab चा वापर करून आपण सदर विद्यार्थांना पुन्हा प्रक्रिया करण्यासाठी उपलब्ध करून घेऊ शकतात.तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

१३) काही शाळा या वर्षी सुरु झालेल्या आहेत अशा शाळांना अद्याप udise number उपलब्ध नसल्याने या शाळेत गेलेले विद्यार्थी सध्या ट्रान्स्फर होऊ शकणार नाही अथवा त्या नविन शाळा सदर शाळांना REQUEST पाठवू शकणार नाही.तरी अशा शाळांना सूचित करण्यात येते की अशा शाळांनी सध्या काळजी करू नये.लवकरच आपल्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.पुढील सुचना मिळेपर्यंत आपण वाट पहावी ही विनंती.

१४) इयत्ता ९ ते १२ वीच्या प्रत्येक शाळेने आपल्या शेवटच्या वर्गाचे देखील pramotion करावयाचे आहे.समजा आपल्याकडे १० वीचा शेवटचा वर्ग असेल तर अशा शाळांनी आपल्या १० वीचे विद्यार्थी हे ११ वीच्या *आभासी* वर्गात जे system द्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत अशा वर्गात प्रमोट करावयाचे आहे.

१५)परराज्यात शिकण्यासाठी गेलेले विद्यार्ही,मयत विद्यार्थी तसेच शाळा सोडून गेलेले विद्यार्थी *(इयत्ता ९ वी ते १२ वी च्या बाबतीत )* या विद्यार्थ्यांची नावे system मधून कशी काढावयाची अथवा या बाबतीत काय कारायचे याबाबत लवकरच आपणास नव्याने सुचना देण्यात येणार आहे.तोपर्यंत अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळजी करू नये.

१६)परराज्यातून आलेले विद्यार्थीअथवा मागील वर्षी student पोर्टल ला नोंद न केले गेलेले विद्यार्थी *second फेज* मध्ये add करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

17) समजा एखादा विद्यार्थी A शाळेतून मागील वर्षी online नोंद झाल्यानंतर B शाळेत शिकायला गेला आहे आणि आता तोच विद्यार्थी पुन्हा A शाळेत शिकायला परत आलेला आहे *(readmition)* तर अशा केस मध्ये काय करावे ही समस्या बर्याच मुख्याध्यापकांना येत आहे.असा वेळी त्या विद्यार्थ्यास B शाळेत ट्रान्स्फर करून पुन्हा A शाळेत ट्रान्स्फर करायची गरज नाही आहे.second फेज मध्ये इयत्ता व इतर माहिती update करायची सुविधा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची दाखल तारीख आणि दाखल इयत्ता व जनरल रजिस्टर नंबर update करून घ्यावेत.

१८) समजा एखादा विद्यार्थी A शाळेतून मागील वर्षी online नोंद झाल्यानंतर B शाळेत शिकायला गेला आहे आणि आता नंतर पुन्हा तो C शाळेत शिकायला गेला आहे.तर ट्रान्स्फर कसे करावे.या परिस्थितीत B शाळेने A शाळेकडून विद्यार्थी ट्रान्स्फर करून घ्यावा आणि नंतर C  शाळेने तोच विद्यार्थी B शाळेकडून ट्रान्स्फर करून घ्यावा.या केस मध्ये तीनही मुख्याध्यापकाने सहकार्याची भूमिका पार पाडून विद्यार्थी माहिती लवकरात लवकर ट्रान्स्फर होईल असे पहावे.

19) काही पालक असे म्हणत असतात की आमच्या मुलाची प्रगती आम्हाला कमी वाटते तेंव्हा आमच्या मुलास या वर्षी नापास करा आणि याच वर्गात बसवा.अशा वेळी हे लक्षात घ्या की rte नुसार आपणास कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करता येणार नाही.ऑनलाइन सिस्टिम मध्ये देखील तो विद्यार्थी  तुम्हाला मागील वर्गात दाखवता येणार नाही हे लक्षात घ्यावे.अशा वेळी पालकांना समजावे की या वर्षी त्याची आम्ही प्रगती विशेष लक्ष घालून करून घेऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालकांचे मतपरिवर्तन करावे ही विनंती. पालकाच्या आग्रहास्तव कोणत्याही विद्यार्थ्यास त्याच वर्गात ठेवता येणार नाही याची नोंद घ्यावी.

२०)ज्या शाळा बंद पडल्या आहेत अशा शाळेचे विद्यार्थी ट्रान्स्फर करण्याची जबाबदारी त्या तालुक्याच्या *गटशिक्षणाधिकारी* यांची असेल याची नोंद घ्यावी.

२१) कोणत्याही MEDIUM चा विद्यार्थी हा कोणत्याही medium मध्ये प्रवेश घेऊ शकेल आणि  ट्रान्स्फर होऊ शकेल.विद्यार्थी update करताना तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

22)student पोर्टल एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शाळांना ओपन करून डोके असल्याने user ची संख्या अधिक झालेली आहे यामुळे कधी कधी student पोर्टल ला user ची संख्या वाढल्याने site स्लो होण्याचा अनुभव सर्वाना येत आहे तरी अशा वेळी थोडा संयम ठेवून काम करावे तसेच आपले काम संपल्यावर logout करायला विसरू नये.आपण logout केल्याने सिस्टिमवर आलेला लोड एका user ने कमी होण्यास मदत मिळेल याची नोंद घ्यावी.

23) ज्या शाळेत नवीन वर्ग अथवा तुकडी निर्माण झालेली आहे अशा शाळांना तो नवीन वर्ग आणि तुकडी add करण्याची सुविधा master या ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यासंदर्भात अधिक माहिती आमच्या havelieducation.Blogspot.in  ब्लॉग ला भेट द्या.

24) मागील शैक्षणिक वर्षांमध्ये भरलेली 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याची  माहिती सिस्टिम द्वारे ऑटो अपडेट केलेली आहे.म्हणजेच आता मागील वर्षी माहिती भरलेला विद्यार्थी आपणास जर 1 ली ला असेल तर तो आता 2 री ला दिसून येणार आहे.याचाच अर्थ असा की स्टुडंट ट्रान्सफर करताना आतापर्यंत आपण एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या वर्गात ट्रान्सफर request करण्यासाठी  शोधत होतो ते आता मागच्या वर्गात न शोधता चालू वर्षीच्या वर्गात शोधावे लागणार आहे याची नोंद घ्यावी.परंतु इयत्ता 9 वीच्या पुढील मुलांचे प्रमोशन हे मॅन्युअली करावे लागणार आहे.अशा शाळेत विद्यार्थी ट्रान्सफर request करताना पुढील शाळेने प्रमोशन केले असेल तर चालू वर्गात त्या विद्यार्थ्याला शोधावे अन्यथा मागील वर्षीच्या इयत्तेमध्ये त्या मुलाला शोधावे लागेल ही बाब लक्षात ठेवावी.

No comments:

Post a Comment