१९७१ हिमाचल प्रदेश नवे राज्य, भारत-पाक युद्ध, बांगलादेशचा जन्म
१९७२ सिमला करार, सी राजगोपालाचारी यांचे निधन
१९७३ म्हैसूर राज्याचे कर्नाटक असे नामकरण
१९७४ भारताद्वारा अणुचाचणी, फकरुद्दीन अली अहमद भारताचे पाचवे राष्ट्रपती, सिक्किम भारताचे सहकारी राज्य बनले.
१९७५ भारताद्वारा ’आर्यभट्ट’ उपग्रह प्रक्षेपित, सिक्किम भारताचे २२ वे राज्य, भारतात आणीबाणी घोषित
१९७६ भारत आणि चीनमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित
१९७७ सहाव्या निवडणुका, जनता पक्षाला लोकसभेत बहुमत, निलम संजीव रेड्डी भारताचे सहावे राष्ट्रपती
१९७९ मोरारजी देसाई यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, चरण सिंग नवे पंतप्रधान, चरणसिंगांचा राजीनामा (२० ऑगस्ट), सहावी लोकसभा बरखास्त
१९८० सातव्या लोकसभा निवडणुका, कॉंग्रेस आय सत्तेत, इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, संजय गांधीचा विमान अपघातात मृत्यू, भारताने रोहिणी उपग्रह असणारे एसएलव्ही-३ ए यान अवकाशात सोडले.
१९८२ आशियातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला (२ मार्च), आचार्ज जे बी कृपलानींचे निधन (१९ मार्च), इनसॅट १अ अवकाशात, ग्यानी झैल सिंग भारताचे राष्ट्रपती (१५ जुलै), गुजरातच्या चक्रीवादळात सुमारे ५०० लोक मृत्यूमुखी (५ नोव्हें), आचार्य विनोबा भावे यांचे निधन (१५ नोव्हें), ९व्या आशियाई खेळांचे उद्घाटन (१९ नोव्हें)
१९८३ दिल्लीमध्ये चोगमची बैठक
१९८४ पंजाबमध्ये ऑपरेशन ब्ल्यूस्टार, राकेश शर्मा अंतराळात, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधी पंतप्रधान
१९८५ राजीव-लोंगोवाल करारावर स्वाक्ष-या, संत लोंगोवाल यांची पंजाबमध्ये हत्या, आसाम करार, ७वी पंचवार्षिक योजना सुरू
१९८६ मिझोराम करार
१९८७ आर. वेंकटरमन नवे राष्ट्रपती, शंकर दयाळ शर्मा नवे उपराष्ट्रपती, बोफोर्स तोफा आणि फेयरफॅक्स घोटाळे
१९८९ अयोध्येमध्ये राम शिलान्यास पूजा, भारताचे पहिले आयआरबीएम अग्नी याचे ओरिसामधून यशस्वी प्रक्षेपण (२२ मे), त्रिशूल क्षेपणास्त्राची चाचणी (५ जून), पृथ्वीचे दुस-यांदा यशस्वी प्रक्षेपण (२७ सप्टें), राजीव गांधींची निवडणुकीत हार आणि राजीनामा (२९ नोव्हें), जवाहर रोजगार योजना सुरु (२९ नोव्हें), राष्ट्रीय आघाडीचे नेते व्ही. पी. सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी (२ डिसें), ९ लोकसभा अस्तित्वात
१९९० शेवटचे आयपीकेएफ मायदेशी परत (२५ मार्च), इंडियन एअरलाईन्सच्या ए-३२० विमानाला अपघात (१४ फेब्रु.) जनता दलामध्ये फूट, भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला, अडवाणींची रथयात्रा सुरु आणि अटक, मंडल आयोग लागू करण्याची व्ही पी सिंगांची घोषणा, अयोध्येत राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादावरुन हिंसा
१९९१ आखाती युद्ध सुरु (१७ जाने), राजीव गांधींची हत्या (२१ मे), १० वी लोकसभा अस्तित्वात (२० जून), पी व्ही नरसिंहराव नवे पंतप्रधान
१९९२ भारताचे इस्त्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित (२९ जाने), भारत रत्न आणि ऑस्करविजेते सत्यजित रे यांचे निधन (२३ एप्रिल), एस डी शर्मा नवे राष्ट्रपती (२५ जुलै), पहिली स्वदेशी बांधलेली पाणबुडी आयएनएस शक्तीचे जलावतरण (७ फेब्रु)
१९९३ वटहुकुमाद्वारे अयोध्येची ६७.३३ एकर जमीन ताब्यात (७ जाने), भाजप रॅलीमध्ये सुरक्षिततेचा प्रचंड अभाव, मुंबईत बॉम्बस्फोटात ३०० जण ठार, इन्सॅट २बी पूर्णपणे कार्यान्वित, महाराष्ट्रात भूकंप
१९९४ सरकारची नागरी विमानवाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी संपुष्टात, गॅट करारावर वादंग, प्लेगची साथ, सुस्मिता सेन मिस युनिव्हर्स, ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड
१९९५ मायावती उत्तर प्रदेशच्या पहिल्या दलित मुख्यमंत्री, महाराष्ट्रात आणि गुजरातेत भाजपचे सरकार, कर्नाटकमध्ये जनता दल आणि ओरिसामध्ये कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (टी) ची स्थापना, मायावती सरकार पडल्यानंतर उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू, इनसॅट २सी आणि आयआरएसआय सीचे प्रक्षेपण
१९९६ हवाला प्रकरणामध्ये अनेक केंद्रीय मंत्री आणि विरोधी नेते अडकले, पीएसएलव्ही डी ३ चे आयआरएसआय सीसह २१ मार्च रोजी प्रक्षेपण, एप्रिलमध्ये ११ व्या लोकसभा निवडणुका, भाजपा १२७ जागा मिळवून भारतातील सर्वात मोठा पक्ष.
१९९७ १५ ऑगस्ट, भारताचा ५० वा स्वातंत्र्यदिन
१९९८ मदर टेरेसा यांचा मृत्यू, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान, भारताची दुसरी अणुचाचणी (पोखरण २)
१९९९ २४ डिसे, १९९९ रोजी इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचे दहशतवाद्यांकडुन अपहरण, विमान कंदहार, अफगणिस्तानला नेले. प्रवाशांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तीन दहशतवाद्यांना सोडले, जून १९९९ मध्ये पाकिस्तानने भारतीय वैमानिक फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेत यांना आठ दिवसांच्या अटकेनंतर सोडले, जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांचा मुकाबला करण्यासाठी ऑपरेशन विजयची सुरुवात, भारताचा विजय.
२००० तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची मार्च २००० मध्ये भारतभेट. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड या तीन राज्यांची निर्मिती. भारताच्या लोकसंख्येने १ अब्जाचा आकडा ओलांडला.
२००१ जुलै २००१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आग्रा शिखर परिषद, जाने २००१ मध्ये गुजरातमध्ये भीषण भूकंप, मार्च २००१ मध्ये तहलका डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या व्हिडियो टेप्समधून सैन्यदलातील शस्त्रास्त्रांच्या व्यवहारातील भ्रष्टाचार आणि लष्करी अधिकारी, नेते, मंत्री यांचा भेसूर चेहरा उघड, स्वातंत्र्यानंतरची भारताची ६वी जनगणना मार्च २००१ मध्ये समाप्त, भारतीय उर्जा क्षेत्रातून एनरॉनची माघार, जीएसएलव्हीचे एप्रिल २००१ मध्ये आणि पीएसएलसी सी३ चे ऑक्टोबर २००१ मध्ये यशस्वी प्रक्षेपण.
२००२ ७१ वर्षीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ अवुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड, २७ फेब्रुवारी, २००७ रोजी भारतातील भयानक अशी गोध्राची दंगल, एप्रिलमध्ये राष्ट्रीय जल धोरणाची घोषणा. मुख्य हेतू: जास्तीत जास्त आणि पर्यावरणस्नेही वापराकरता पाणीस्त्रोतांचे एकात्मिकीकरण आणि विकास करणे.
२००३ भारतात स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडची आणि न्यूक्लिअर कमांड ऑथोरिटीची स्थापना, एअर मार्शल तेजा मोहन अस्थाना एसएफसीचे पहिले कमांडर–इन-चीफ, बहुपयोगी इन्सॅट ३अ फ्रेंच गयानाच्या कुओरौमधून यशस्वीरित्या प्रक्षेपित, प्रतिष्ठित गुन्हेगारी शोधण्यासाठी जूनमध्ये सीबीआयच्या आर्थिक गुप्तहेर शाखेची स्थापना, भारताच्या इन्सॅट ३ई उपग्रहाचे फ्रेंच गयानाच्या कुओरौमधून युरोपिअन यानाद्वारे प्रक्षेपण (डिसें)
२००४ निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व सहका-यांकडून भाजपाचा पराभव, परिस्थिती अनुकूल असतानाही कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा पंतप्रधान बनण्यास नकार, कॉंग्रेस आणि सहक-यांचे केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन.
|
No comments:
Post a Comment