THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 30 March 2017

विज्ञान प्रयोग

विज्ञान प्रयोग

 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग  3 ������
 �� साबन फुगा��
साहित्य-- शॅम्पू साबनाचे तुकडे  कपडे धुवायचे पावडर साखर  पाणी तारेचा तुकडा��
कृती--1)  सर्व प्रथम   शॅम्पू साखर (चिमूटभर) साबन  कापड धुवायचे पावडर  एकत्र करून द्रावण तयार करून घ्या
2) एक सरळ बारीक ताराचा तुकडा घेऊन त्याला एका टोकाला बागंडीसारखा आकार द्या
3) तयार केले ल्या गोलाकार आकाराच्या कडेवर पुन्हा छोटा बारीक तार गुडांळा जेणेकरून गोलाकार आकार खडबडीत होइल
4) आता तुमच्या जवळ वर गोलाकार आकार  व त्याला चिकटून असलेल्या  लांब तार (हॅन्डल)  लाॅलीपाॅप सारखा आकार तयार होइल
5) तारेचे हॅन्डल 45 अंशाने तिरपट करा
6) हॅन्डल द्रावणात बुडवा आता तुम्हाला त्यावर साबनाचा पातळ पडदा तयार झालेला असेल
7) पडद्यावर हळुवार पणे फुकंर मारा साबनाचे फुगे हवेत उडू लागेल
�� टिप -- गोलाकार चौकोनी त्रिकोणी कोणत्याही आकारात बनवू शकतात��


�������� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग4 ����������
����अंतर मोजणारे खेळणे����
���� साहित्य - - एक गोलाकार पृष्ठ किंवा काठ असलेले स्टिल ताट काठी मार्करपेन ��
कृती - - 1 ) ताट किंवा पृष्ठाच्या गोलाकार कडेवर मार्करपेनने सेंटीमिटर च्या खुणा करून घ्या
2 ) आता पृष्ठ किवा ताटाच्या मध्यभागी स्क्रु फिट करून घ्या
3 ) एक लांब काठी घ्या काठीच्या एका टोकावर ताट किवां पुठ्ठा स्क्रुने फ्रिली फिट करा
4 )ताट.आणि काठी यामध्ये थोडे अंतर राहू द्या जेणेकरून ताट गोलाकार फिरू शकेल
��आता तुमचे अंतर मोजणारे खेळणे तयार झाले
���� सुचना-- चाक फिरवतांना सुरवातीला चाक 0 वर ठेवा चाक फिरून पुन्हा 0 वर आले तर 1 राउंड झाला असे अंतर मोजतांना किती राउंड होतात हे पहा व.बेरीज किवां गुणाकार करून अंतर काढा����
���� फायदे--लांबी रुंदी मोजणे
खेळाचे मैदान मोजणे
दारे खिडक्या अंतर मोजणे परीमीती काढणे
प्लाॅट शेती मोजणे
चालतांना अतंर.मोजणे इत्यादी
  


������ विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 5 ������
 ���� गढूळ पाणी शुद्ध बनविणे����
�� साहित्य- लोखंडी किंवा प्लॅस्टिक घमेले छोटा प्याला प्लॅस्टिक पन्नी छोटे दगडगढ चिकटपट्टी (टिक्सोटेप)��
 �� कृती - 1) लोखंडी किंवा प्लॅस्टिक चे घमेले घ्या
2) घमेल्यात गढूळ पाणी ओता
3) एक पेला घ्या  पेलात तिन चार छोटे दगड टाका जेणेकरून पेला घमेल्यात न तरंगता स्थिर उभा राहिल
4) पेल्याची उंची पाण्याच्या उंचीपेक्षा जास्त पण घमेल्यापेक्षा छोटी घ्या
5) घमेल्यावर प्लॅस्टिक ची पन्नी पसरवून चिकटपट्टी ने पक्की चिपकवून घ्या
6) आता कागदावर एक दगड मध्यभागी बरोबर प्याल्याच्या वर येईल अस्यारितीने ठेवा परंतु कागद प्यालाला चिकटायला नको
7) आता कागदाला चारहीबाजूने उतार आला असेल व तो उतार प्यालाच्या वर एकवटलेला असेल
8) घमेले कडक उन्हात ठेवा 2 ते 3 तासात प्यालात सांद्रीभवन पद्धतीने  शुद्ध पाणी जमा होईल
���� फायदे-- विद्यार्थी ना शुद्ध पाण्याचे महत्त्व सागंता येईल
सांद्रीभवन कसे होते हे सागंता येईल
जल है तो जिवन है या वाक्याचे महत्त्व समजावून देता येईल
संकटसमयी जगंलात किवां कोठेही या पद्धतीने पाणी मिळवता येईल
   



������विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 7������
    ����   रबर शिक्का��
 �� साहित्य - - सायकलचा वाया गेलेला रबर ट्युब चा तुकडा किवा कोणताही रबर  लाकडी ठोकळा फेव्हीकाॅल  ��
  �� कृती - - 1) सायकलचा एक जुना वाया गेलेला ट्युबचा छोटासा चार बोटाचा टुकडा घ्या
2 )  ट्युब ला उभा काप द्या आणि उघडा
3 ) आता तुमच्या कडे आहे एक सपाट चौकनी रबरी तुकडा
4 ) त्यावर एक झाड किंवा घर किंवा मोर किंवा इतर कोणत्याही प्रकारची आकृती काढून तो आकार कापा
5 )  एक लाकडी ठोकळा घेऊन रबराचा आकार ठोकळ्यावर फेव्हीकाॅल ने चिकटवा
6 ) इकंपॅडवरून या शिक्क्याचा ठसा घ्या
7 ) कोरा कागदावर तो ठसा उमटवा
8 ) हे साधे स्वस्त रबरी शिक्के बनवून मुलांना सुदंर चित्रे घरच्याघरी बनवता येतात
फायदे--   मुलांचे सर्जन शिलतेला  वाव मिळतो
      


 �������� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 8 �������� हवेच्या दाबाचा अंदाज घेणे����
�� साहित्य - - साधारण आकाराची काचेची बाटली रबर बॅन्ड  स्ट्रा  किंवा कागदाची तयार केलेली पुगंळी पुठ्ठा कागद कात्री फेव्हीकाॅल इत्यादी
�� कृती 1) एक  आकाराने मोठा फुगा कापून रबरी पापुद्रा तयार करून घ्या
2 ) हा.रबरी पापुद्रा बरणीच्या तोडांवर रबर बॅन्ड च्या सहाय्याने फिट्ट बसवून घ्या जेणेकरून हवा आतबाहेर जाणार नाही
3) एक कागदी पुगंळी किंवा स्ट्रा किंवा रिकामी बाॅल पेन ची रिफील सुद्धा चालेल रबर बॅन्ड च्या मध्यभागी चिकटपट्टी ने चिकटवा
4) एका पुठ्ठ्यावर कागद चिकटवून काचेच्या बरणीसमोर उभा ठेवा
5) कागदी पुगंळी किंवा स्ट्रा  कागदा समोर जेथे येईल तेथे खुण करा अस्याच खुणा खाली आणि वर सुद्धा अदांजे करा म्हणजे हवेचा दाब कमी किवां जास्त झाला याचा अंदाज येईल
6) हवेचा दाब वाढला की रबर आत येईल व कागदी पुगंळी वर उचलली जाईल आणि हवेचा दाब कमी झाला की बरणीवरील रबर.वर येईल व कागदी पुगंळी किंवा स्ट्रा खाली जाईल
���� फायदे - बॅरोमीटर बद्दल माहिती देता येईल
तापमान वारा त्रुतू इत्यादी मुळे  हवेचा दाब नेहमी बदलत राहतो अंदाज घेण्यासाठी हे साधन वापरता येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


���� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 9������
�� साहित्य - -माती रबर फेव्हीकाॅल रंगीत कागद��
 कृती. . खडे नसलेली माती मळून घ्या
2 ) साधारण तहा 2ते 3 सेमीचे व्यास असलेले मातीचे चेडूं बनवा
3 ) चेडूं उन्हात वाळू घाला
4 ) चेडूं वर फेव्हीकाॅल च्या सहाय्याने रबर फिट्ट बांधा
5 ) रंगीत कागदाचा तुकडा घ्या त्याला फुलाचा किंवा इतर कोणत्याही प्रकारची आकृती काढून तो आकार कापा
6 ) आता तो आकार चेडूं वर चिपकवा
7) आता चेडूं टेबलावर ठेउन चिमटीत धरा व टेबलावर गोल गोल फिरवा रबराला पिळ बसेल
8) रबर स्थिर धरला तर पिळ सुटता सुटता चेंडू गोल गोल फिरेल
�� फायदे-- मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळून स्वनिर्मितीचा आनंद मिळेल
व विद्यार्थी ना स्थितीज व गतीज उर्जा समजावून सागंता येईल
          


 �������� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 11������
प्रत्येक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थी ची वजन उंची मोजणे अनिवार्य आहे त्याचसाठी हे उपकरण बनवायचे आहे
�� साहित्य - - लाकडी चौकोनी पेटी स्कुटी किवां स्कुटरचा ट्युब  गेलेली बारीक ट्युब लाईट नळी तिचे दोन्ही टोके मोकळे करा   पेट्रोल नळी��
�� कृती - - 1 ) एक स्कुटीची ट्युब बसेल अशी लाकडी पेटी चौकोनी झाकणासहीत बनवून घ्या झाकणाला ट्युब चा व्हाॅल्व वर निघेल यापद्धतीने एक गोलाकार छिद्र पाडून घ्या
2) ट्युब पेटीमध्ये ठेवा ट्युब चा व्हाॅल्व लाकडी झाकणाच्या छिद्रावाटे वर काढा व त्याला साधारण अर्धा मिटर पेट्रोल नळी एरलडाईट किंवा एम सील द्वारे  फिट बसवा
3) आता पेट्रोल नळीचे दुसरे टोक ट्युब लाइट चे एका टोकाला एमसील द्वारे फिट करा  व दुसरे टोक  पाणी टाकण्यासाठी मोकळे ठेवा
4) आता एक 10×100 सेमी
असी लाकडी फळी किवां पृष्ठ घ्या त्यावर पाढंरे कागद चिकटवून घ्या व ही ट्यूबलाईट ताराच्या सहाय्याने फिट्ट बाधूंन घ्या व ही पट्टी एका भिंतीवर अडकवून ठेवा
    आता माॅडेल तयार झाले आहे
5) एका बकेट मध्ये पानी घेऊन त्यात थोडी निळ मिसळून ठेवा व ग्लास च्या सहाय्याने उघड्या टोकातून
पाणी टाका पाणी जोपर्यंत लाकडी फळीवर एक दोन सेमी पर्यंत वर चढत नाही तोपर्यंत पाणी टाका
6) आता लाकडी फळीवर जिथपर्यंत पाणी चढले आहे तेथे 0 मार्क करा नतंर 1 किलो वजन खाली चौकोनी पेटीवर ठेवा पाणी थोडे वर चढेल तेथे एक किलो अशी खुण करा  0 ते 1 जेवढे अतंर पाणी चढले आहे तेवढे अंतराच्या खुणा पट्टीवर करून घ्या
   लक्षात येण्यासाठी 5 किलो  10  किलो  15  किलो
असा खुणा जाड स्केचपेनने  करा   व त्याच  पट्टी वर  जमिनीपासून  उंची मोजणे साठी  सेमी च्या खुणा करून घ्या
7) आता प्रत्येक विद्यार्थीना पेटीवर चढायला सागां त्याचे वजन मोजा  नतंर त्याला जमीनीवर उभा करू न तेथेच त्याची उंची मोजा
8) वजन व उंची  एकदम  मिळते
9) अस्या प्रकारचे वजनकाटे वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात परंतु हा सर्वात किफायतशीर पाणी टाकणे व काढणे   यासाठी सोपा आहे
�� या उपकरणात पास्कलचा नियम वापरल्या गेला आहे
        

���� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 16 ����
���� बहुपर्यायी शेती����
�� साहित्य-- कुलरचे पाणी ठेवतात तो टप   4/5  लाकडी पट्टी   जिवंत कोबंडी  अंडे    धातूची जाळी
�� कृती-- प्रथम टप मध्ये माती पसरवून घ्या  अर्धा भागात शेत तयार करण्यासाठी मोहरी किवां इतर धान्य टाका
�� लाकडी गोट पट्टी(हार्डवेअर मध्ये मिळते)
चे 1.5 किंवा 2 फुटाचे  चार भाग तयार करा
�� एरलडाईट किंवा खिळ्याने 4 पट्ट्या खांब म्हणुन उभे करा
��   आता हार्डवेअर मध्ये मिळणार्‍या धातूची जाळी घ्या तिचे खाबांत जेवढे अंतर घेतले तेवढ्याच आकाराने सहा भाग कापून घ्या
�� एक भाग चार भागावर आडवा टाका व 4 भाग भिंतीं
म्हणून  उभे करा व तारेने घट्ट बाधूंन घ्या
�� राहीलेल्या एका भागाचे छत तयार करा�� हे कोबंडी चे खुराडे तयार झाले त्याला भिंतीचा एक भाग उघडून दार तयार करा
�� आता आपण उचांवर मचांग बाधतो त्याप्रमाणे  कोबंडी चे घर तयार होईल
��चार खाबांखाली एक आकाराचा प्लॅस्टिक ट्रे (शेततळे) मध्ये पाणी घेऊन जिवंत मासोळीचे पिल्ले टाका( खेळणी तील मासोळी टाकली तरी चालेल)
��आता कोबंडी व अंडे खुराड्यात ठेवून द्या
��  पेट्रोल नळी घेऊन हिरव्या शेती प्रर्यंत पाईपलाईन टाका
�� तुमचा प्रोजेक्ट तयार झालि
������ उद्देश-- आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेती व्यवसाय वर घर चालविणे  कठीण झाले आहे हा प्रोजेक्ट राबविला तर त्याला पुरक व्यवसाय मिळून त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होवू शकते
��  कोबंडी ची विष्ठा पाण्यात पडेल व पाणी सेंद्रिय खत युक्त होईल हेच पाणी शेतीला जाउन पिक चागंले येईल व सोबत कोबंडी अंडे व मासोळी याचेही उत्पादन मिळेल
�� आजकाल गार्डन रेस्टॉरन्ट ची पद्धत.आहो
शेतकरी ने जर काही गाई शेतात ठेवल्या व काही छोट्या झोपडय़ा शेतात तयार केले तर व फुलझाडे व पालेभाज्या. काही फळांचे झाडे लावली तर सर्वच शेत गार्डन रेस्टॉरन्ट होवून जाईल
�� लोक आवर्जून पिकनिक ला येवून भाजी भाकरी अंडे नाॅनव्हेज  फळे फुले याचा आस्वाद घेतील
��व शेतकरी आत्महत्या मुक्त होईल
प्रतीकृती मध्ये आपल्या ला याचे संक्षिप्त रूप कल्पकतेने दाखविता.येइल व सोबत आकर्षक चार्ट व काही स्लोगन बनवा��������
  .  सुधीर बोरेकर 9420714903 गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती


���� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 18 ����
�� समुद्रावर पसरलेले तेल गोळा करण्याचे यंत्र��
���� साहित्य -- लाकडी जहाज 12 व्होल्ट बॅटरी एक बेकार सीडी  मोठी परात किंवा कूलर ट्रे
�� पार्श्वभुमी--  बर्‍याच वेळी तेल वाहून नेणारे जहाज अपघाताने फुटतात व सर्व पाण्यावर तेलाचा तवंग पसरतो या तवंगामुळे पर्यावरणाला हानी तर पोहोचतेच शिवाय जलचर सुद्धा मरतात व मौल्यवान तेल सुद्धा नष्ट होते  या तेलाच्या तवंगावर साबनाचा फवारा मारला तर  हा तवंग काही दूर लोटला जातो पण तवंग नष्ट होत नाही   काही दिवसांनी  तवंगामध्ये  सुक्ष्म जिव तयार होउन ते खावुन टाकतात  तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो
���� कृती-- 1 ) एक लाकडी प्लायवूड चे जहाज बनवा     एक  बेकार झाले ली सिडी घ्या  तिच्या गोलाकार भागावर   वायरचे बारीक बारीक तुकडे  काही अतंरावर चिपकवा जेणेकरून सिडी गोल फिरतांना पाणी वर फेकेल  सिडीला मध्यभागी एक बारीक छिद्र पाडा
2) जहाज परातीतील पाण्यात उभे करून पाण्यात किती बुडते याचा अंदाज घ्या
जहाजाला  एक डीसी मोटर(चक्र गोल फिरवणारी) आतील बाजूने अशी फिट करा की   मोटरचा दांडा जहाजाबाहेर निघेल
3) सिडीला छिद्र पाडले ला भाग मोटरवर फेव्हीस्टीक लावून फिट करा ज्यामुळे चाक फिरताना बाहेर येणार नाही
4) सिडीवर एक जाड प्लॅस्टिक ची पट्टी अर्धगोलाकार करून चिपकवा जेणेकरून सिडी ने वर फेकलेले पाणी त्याला अडून खाली ओघळेल  हे तेलयुक्त पाणी  एका डबीत पकडा किवा ती डबी तेथेच चिपकवून घ्या
5) या डबीत तेल आणि पाणी असेल  या  पाण्याला काही काळ स्थिर ठेवले तर  विलगीकरण पद्धतीने तेल आणि पाणी वेगळे दिसुन येतील
�� अस्या प्रकारे आपण वाया गेलेले तेल सुद्धा काही प्रमाणात परत मिळवू शकतो व पर्यावरणाचे रक्षण होईल
���� टिप-- जहाजाला खालील भागाने जलावरोधक करा  कलर मारा जेणेकरून पाणी आत शिरणार नाही
     जहाजावर ऑइल कलेक्टीग टॅक म्हणुन काही प्लॅस्टिक च्या डब्या ठेवा
   जहाजाला  परीस्थिती अनुरूप सजवा
�� परातील पाणी म्हणजे समुद्र अशी कल्पना करा व त्यात काळे  असे जळलेले थोडे ऑईल टाका
         


�������� विज्ञान खेळणी / प्रयोग भाग 19��������
�� बहुपयोगी चूल��
�� साहित्य - - माती ताब्यांच्या पाईप  रिकामी प्लॅस्टिक भरणी  रबरी पाईप
�� कृती -  माती  गाळून घ्या व पाण्याने चागंली मळून गोळा तयार करून घ्या
2) गोळ्या ला चुलीचा आकार देत असतांना त्यामध्ये एक ताब्यांच्या पाईप फिरवून पाईपचे दोन्ही टोके चुलीच्या दोन्ही टोकाकडून थोडे बाहेर काढा
3) चुलीपासून काही अंतरावर  एका स्टूलवर  प्लॅस्टिक भरणी  नळ फिट करून ठेवा
4) नळाला रबरी पाईप लावा व हा रबरी पाईप चुलीतील एक टोकावर असलेल्या  ताब्यांच्या पाईप ला जोडा  व दुसरे टोक  पाणी बाहेर येण्यासाठी उघडे ठेवा
�� प्रयोगाची कार्यवाही-  बरणीतले पाणी चुलीतील ताब्यांच्या पाईप मध्ये येईल चुल पेटल्यानतंर  माती गरम होते व सोबत च ताब्यांच्या पाईप सुद्धा गरम होते व मिळणारे पाणी सुद्धा गरमच मिळेल
���� अश्याप्रकारे  अन्नसुद्धा शिजेल व  तेवढ्याच उर्जेत पाणीसुद्धा गरम होईल
�� गरम पाणी घरगुती कामे  आंघोळ  पाणी निर्जंतुक करून पिण्यासाठी वापरता येईल
   टिप -- चुल पेटविणे ही कृती मोठ्या व्यक्ती नेच करावी

No comments:

Post a Comment