THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 30 March 2017

तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्र

१. जेजुरी
पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे
महाराष्ट्राचे कुलदैवत असून ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने हे
सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या
ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता
जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे.
तरी तेही आता तीन
शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने
मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने १,२५,०००
चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या
पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे
घातले, असाही उल्लेख सापडतो.
देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे
२०० पायर्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे
म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. ‘नवलाख पायरीचा (नऊ
लाख पायर्या) डोंगर’ असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले
जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या
देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा,
मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती
देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू
जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार
उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच
धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली
ठेवणार्या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत
आहे. दसर्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे
भरते.तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे
दर्शनासाठी गर्दी करतात.
छत्रपती शिवाजी महाराज
यांची या देवळातच आपले वडील
शहाजीराजे यांच्याशी भेट झाली
होती असा उल्लेख इतिहासात आढळतो. बरेच दिवस
मोहीमांवर असल्याने दोघे परस्परांस भेटले नव्हते. त्यामुळे
त्यांच्या या भेटीला व स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
जेजुरीच्या मंदिराचे उत्कृष्ट कोरीव काम
जरूर पाहण्याजोगे आहे. आसपासही जुन्या वास्तू पाहायला
मिळतात. जेजुरी हा शिवकाळातील दक्षिणेकडचा
एक मोठा किल्ला होता.
‘यळकोट यळकोट जयमल्हार’ असा जयघोष करत देवाच्या
भेटीला भक्तगण, दर्शनार्थी येतात. दर्शनाला
येताना लोक भंडारा (हळद) उधळतात व श्रद्धेने कपाळाला लावतात. लग्न
झाल्यानंतर वधु-वरांनी जोडीने खंडोबाचे दर्शन
घेण्याची परंपरा आहे. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून येथे
नवविवाहीत जोडपी दर्शनासाठी
येतात. जेजुरी पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर
असून, अष्टविनायकाचे स्थान मोरगाव जेजुरीपासून अवघ्या १५
कि. मी. अंतरावर आहे.
 भाग ३.

🙏 आळंदी
⛳⛳⛳⛳

पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर आळंदी
हे लहानसे गाव आहे. इंद्रायणी नदीच्या
काठावर असलेले संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन
समाधीचे हे ठिकाण! यामुळेच आळंदीला
तीर्थक्षेत्राचे महत्त्व आले आहे. आषाढ महिन्यात संत
ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून
पंढरपूरला जाते. त्यात असंख्य वारकरी सामील
होतात. आळंदी ते पंढरपूर हे अंतर (सुमारे २०५ कि.
मी.) भाविक विठू माउलीच्या नामाचा गजर करत,
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत, चालत पार
करतात.
आळंदी गावात संजीवन
समाधीसह, मुक्ताईचे मंदिर, विठोबा-रखुमाई मंदिर व
कृष्णमंदिरही पाहण्याजोगे आहे. आळंदी येथे
अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी
जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास
संजीवन समाधी म्हटले जाते.
कीर्तन-प्रवचन-वेदाभ्यास यासाठीचे
महाविद्यालय येथे आहे. संस्कृत व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास तेथे
अविरत सुरू असतो.

💎💎💎💎💎💎💎💎💎        
भाग  २.

🙏 पंढरपूर
 🔔🔔🔔🔔

माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या
तिरी,
माझी बहीण चंद्रभागा, करीत असे
पाप भंगा।।
किंवा
जन्मासी येऊनी पहा रे पंढरी।।
किंवा
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी।।
अशा भावपूर्ण शब्दांत पंढरपूरचे वर्णन अनेक संतांनी केले
आहे.
पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या
तीरावर वसलेले महाराष्ट्रातील प्रमुख
तीर्थक्षेत्र आहे.
पंढरपूर म्हटले की डोळ्यासामेर येते विठ्ठलाचे
सावळे, सुंदर, मनोहर रूप. पंढरपूरला दक्षिणेतील
काशी असेही म्हटले जाते. एवढे मोठे पावित्र्य
या तीर्थक्षेत्राला आहे. महाराष्ट्राला अनेक संतांचा वारसा
लाभला आहे. या संतांच्या शिकवणीतूनच
महाराष्ट्राची संस्कृती अधिक परिपूर्ण
झाली आहे. या सर्व संतांचे आराध्य दैवत म्हणजे हा
पंढरपूरचा पांडुरंग आणि त्यांचे माहेरघर म्हणजे पंढरी
होय.
येथील विठ्ठलाच्या
मूर्तीविषयी अशी कथा
सांगितली जाते की, प्रत्यक्ष
श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप घेऊन येथे प्रकटला. दानवांच्या
लढाईत श्रीकृष्णाला मुचकुंद राजाने बरीच मदत
केली. ते बघून श्रीकृष्णाने त्याला वर मागावयास
सांगितला. तेव्हा राजा म्हणाला तुझे हेच रूप कायम माझ्या डोळ्यासमोर
असेच उभे राहू दे. तेव्हा श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप घेऊन
पंढरपूर येथे आपल्या भक्ताच्या भेटीला आले व राजा मुचकुंद
यांनी भक्त पुंडलिकाच्या रूपात दुसरा जन्म घेतला.
पंढरपूर येथील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे
पांडुरंगाचे व रुक्मिणीचे वेगळे मंदिर आहे. पांडुरंगाचे मंदिर
म्हणजे शिल्पकलेचाही एक उत्तम नमुना आहे.
पंढरपूरला चार मुख्य यात्रा असतात. १) आषाढी २)
कार्तिकी ३) माघी ४) चैत्री.
यापैकी आषाढी एकादशीला
महाराष्ट्रातून असंख्य भाविक, अनेक संतांच्या पालख्या घेऊन
पायी चालत-वारीने-या पांडुरंगाच्या
भेटीला येतात.
केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आंध‘,
तामीळनाडू या राज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर
या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.पंढरपूर ते सोलापूर हे अंतर ६७ कि.
मी. आहे. तर पंढरपूर ते पुणे हे अंतर २१७ कि.
मी. आहे. येथे भक्तांसाठी राहण्याच्या
सोयीसाठी अनेक आश्रम, धर्मशाळा उपलब्ध
आहेत.
   
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳



🙏     देहू

🌸🌸🌸🌸🌸🌸
पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे
इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव.
वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे एक मोठे संत -
श्री तुकाराम देहू गावी राहत. गाथा आणि अनेक
अभंगांच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला
भेटतात. श्री संत तुकाराम महाराज हे श्री
विठोबाचे नि:स्सिम भक्त. त्यामुळे प्रत्येक आषाढी
एकादशीला संत ज्ञानेश्र्वर महाराजांप्रमाणेच तुकाराम
महाराजांचीही पालखी पंढरपूरला
जात असते.
संत तुकाराम महराजांचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे.
फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकारामबीज) येथे
मोठी यात्रा भरते. त्याच दिवशी तुकाराम
महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले असे मानतात. विठ्ठल
मंदिर, जुने शिवमंदिर, इंद्रायणीचा डोह ही
देहूतील बघण्यासारखी ठिकाणे आहेत. जवळच
रामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर येथे कोरीव
लेणीही आहेत. संत तुकाराम महाराज
चिंतनासाठी, साधनेसाठी भंडारा डोंगरावर जात असत.
प्रत्येक गुरुवारी व एकादशीच्या
दिवशी मंदिरात कीर्तन होते. सध्या दिसणारे मंदिर
इ. स. १७२३ मध्ये संत तुकारामांचा सर्वात लहान मुलगा नारायणबाबा
यांनी बांधून घेतले अशी नोंद आढळते.
   
     ✅✅✅✅✅✅✅✅
🙏भाग ५

🔔🔔🔔🔔

     🙏 शेगांव
✴✴

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळचे हे ठिकाण संत
गजानन महाराज यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले आहे. शेगावमध्ये इ. स.
१८७८ साली गजानन महाराजांना प्रथम बंकटलाल आणि दामोदर
यांनी पाहिले. ते समर्थ रामदासांचे अवतार मानले जातात.
योगशास्त्र, वेदशास्त्रात ते पारंगत होते. तपश्चर्या केलेली
असल्याने त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या.
प्राणी, पक्ष्यांची भाषा त्यांना समजत असे.
लोकांचे वैयक्तिक, प्रापंचिक प्रश्र्न सोडवत सोडवत त्यांनी
लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. ‘गण गण गणात बोते’ हा
त्यांनी दिलेला मंत्र होय.
लोकमान्य टिळक, अण्णासाहेब पटवर्धन, दादासाहेब खापर्डे
असे अनेक नामवंत त्यांचे भक्त होते. अंगावर कपडे
नाहीत, कुठेही मिळेल ते अन्न घेणे,
कुठेही आडवे होऊन झोपून जाणे,
कोणतीही वस्तू संग्रही न ठेवणे
अशा कृती करणारे ते अवालिया सत्पुरुष होते. पंढरपूरच्या
पांडुरंगासमोर १९१० मध्ये त्यांनी हे जग सोडण्याचा निर्णन
भक्तांना सांगितला. त्यापूर्वी १९०८ मध्ये त्यांनीच
भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असे सांगितले होते.
भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला.
१९१० मध्ये त्यांनी समाधी घेण्याची
तारीख - वार - दिवस भक्तांना सांगितला,
समाधीची जागाही निश्र्चित करून
दाखवली. दिनांक ८ सप्टेंबर, १९१० मध्ये भाद्रपद शुद्ध
पंचमीला, गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप
घेतला.
विदर्भातील अनेक पंडित, गुरू, आचार्य
त्यांची भेट घेत. ते विष्णूचे अवतारही मानले
जातात. म्हणूनच ‘विदर्भाचे पंढरपूर शेगाव’ असे याचे वर्णन करतात
भक्तांना मार्गदर्शन करणे, योग्य मार्ग दाखवणे,
आशीर्वाद देणे आणि स्वत: सातत्याने फक्त साधना करणे
अशी त्यांची दैनंदिनी असे. गुरुवार
हा वार असंख्य भाविकांचा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा
दिवस ठरून गेला आहे. शेगावमधील श्री राममंदिर
देखील चैत्र महिन्यात रामनवमी
दिवशी, ऋषी पंचमी
दिवशी भक्तांनी गजबलेले असते. शेगावच्या संत
गजानन महाराज स्मारक संस्थानच्या प्रयत्नांमुळे तिथे बर्याच शैक्षणिक
संस्था सुरू झाल्या आहेत. दर्शनाला येणार्या
भाविकांसाठीही येथे अनेक सुविधा उपलब्ध
आहेत.

    💎💎💎💎💎💎💎💎💎  
भाग ६

🙏🙏

शिर्डी

 🌺🌺🌺
 १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डी येथे थोर संत
श्री साईबाबा अनेक वर्षे राहिले. येथे राहूनच
त्यांनी भक्तगणांना भक्तिमार्गाविषयी आपल्या
कृतीतून मार्गदर्शन केले. श्रद्धा व सबुरी
अशी दोन सुत्रे जगण्यासाठी देणार्या
श्री साईबाबांनी २० व्या शतकाच्या
सुरुवातीला शिर्डी येथे समाधी
घेतली. पुढील काळात येथे प्रशस्त मंदिर
बांधण्यात आले व श्री साईबाबांच्या
मूर्तीची स्थापनाही करण्यात
आली.१९२२ साली हे मंदिर बांधले आहे. गेल्या
काही वर्षात भाविकांची संख्या वाढते आहे.
शिर्डी संस्थानात भाविकांसाठी निवास, भोजन, प्रसाद
अशा सोयी केल्या आहेत. उत्कृष्ट व्यवस्था
होण्यासाठी अनेक इमारती बांधल्या आहेत.
इटालीयन संगमरवरातील श्री
साईबाबांची सुंदर, विशाल मूर्ती हे भाविकांचे
श्रद्धास्थान आहे. तसेच संगमरवरातील
समाधीस्थानही अतिशय पवित्र, देखणे आहे.
नागपूरच्या गोपाळराव बुटींनी
मुरलीधराच्या मंदिरासाठी शिर्डीत
बांधकाम करून घेतले. परंतु साईबाबाच तेथील
मुरलीधर झाले असे म्हटले जाते.
शिर्डीमध्ये बालयोग्याच्या रूपात पोहोचलेले साईबाबा
जेथे राहत, त्याला द्वारकामाई म्हणतात.ते ज्या कडुनिंबाच्या
झाडाखाली प्रथम दिसले त्याला गुरुस्थान असे नाव आहे. ज्या
ठिकाणी ते झोपत, त्या स्थानाला चावडी म्हटले
जाते. श्री साईबाबांनी दररोज पाणी
घालून तयार केलेली बाग लेंडीबाग म्हणून जतन
केली आहे. तिथे कडूनिंबाच्या झाडाखाली बाबा रोज
विश्रांती घेत असत. मंदिराच्या परिसरातच श्री
साईबाबा ज्यावर नेहमी बसत, ती
शिळाही दर्शनासाठी ठेवलेली आहे.
श्रीसाईबाबा ज्या वस्तू दररोज वापरत, त्या व्यवस्थित
ठेवून एक संग्रहालय केले आहे. साईबाबांचा पाण्याचा डबा, पादूका, जाते,
हुक्कादाणी, कफनी, खडावा या वस्तू पाहण्यास
मिळतात. त्यांचे दुर्मीळ फोटोही इथे पाहायला
मिळतात.
मुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि.
मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ
शिर्डी हे ठिकाण आहे. मनमाड जंक्शनपासून फक्त ६०
कि. मी. वर शिर्डी आहे. त्यामुळे रेल्वेने येथे
सहज पोहोचता येते. जगभरातून लाखो लोक श्री साईबाबांच्या
दर्शनासाठी येथे येतात.

       💡💡💡💡💡💡💡💡💡
: भाग ९.

मांढरदेवी
♦♦♦

साताऱ्यातील वाईजवळ मांढरदेवी हे
ठिकाण आहे. वाईपासून २५ कि. मी. अंतरावर
टेकडीवर देवीचे देऊळ आहे. काळूबाई असे
येथील देवीचे नाव असून, येथील
काळुबाईची यात्रा प्रसिद्ध आहे.
पुण्यापासून सुमारे २०० कि. मी. अंतरावरचे हे ठिकाण
१२०० मी. उंच टेकडीवर आहे. अरुंद वाटा
असलेली चढण चढत जाऊन देवीचे दर्शन
घ्यावे लागते.शाकंभरी पौष पौर्णिमेला दरवर्षी
हजारो भक्त येथे दर्शनाला येतात. मांगिरबाबांच्या देवळाशी
नारळ फोडून, काळूबाईचे दर्शन घेणे आणि दीपमाळेत तेल
घालणे अशा परंपरेसह भाविक दर्शन घेतात
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
   
🙏भाग ८.
💎💎


अक्कलकोट
🙏🙏🙏

सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. स्वामी
समर्थ महाराजांचे हे समाधी देवस्थान सोलापूरपासून फक्त
४५ कि. मी. अंतरावर असून असंख्य श्रद्धावानांचे पवित्र
ठिकाण आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नाथ
पंथीय घोर तप करणारे स्वामी. त्यांनी
वेगवेगळे जन्म घेतले आणि ते समाधी घेऊन
आजही वेगळ्या रूपात आहेत, असे भाविक मानतात.
समाधी स्थळ, शिवपुरी आश्रम ही
येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.
शिवपुरी आश्रमात सातत्याने अग्नी तेवत
ठेवण्याचे शास्त्र - अग्निहोत्र- जतन केले आहे.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
]भाग ७.

🙏🙏

सुवर्णमंदिर (नांदेड)

 🌺🌺🌺
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हा
जिल्हा. एका बाजूने आंध्रप्रदेश या राज्याच्या सीमेलगतचा
आहे. नांदेड येथील गुरूद्वारा शीख लोकांचे
अमृतसरसारखेच पवित्र ठिकाण मानले जाते. १७०८ साली
तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब’ हे ठिकाण
गोदावरी नदीच्या किनार्यावर नांदेडमध्ये स्थापित
झाले. शिखांचे दहावे गुरू - गुरूगोविंद सिंह त्याठिकाणी कारभार
पाहत असत. परंतु पुढे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेच हे
ठिकाण. त्यांच्या स्मरणार्थ येथे गुरूद्वारा उभारण्यात आला. ग्रंथसाहिब हा
धर्मग्रंथ हाच आपला गुरू असे गुरूगोविंद सिंग यांनी येथे
सांगीतले.
१८३० मध्ये पंजाब मधील कारागीर
बोलवून सध्याचे तख्त साहिब हे ठिकाण महाराजा रणजीत
सिंग यांनी बांधून घेतले. त्यात ‘बंगा मॉ भागोजी’ हे
मोठ्या मोठ्या ऐतिहासिक शस्त्रांचे संग्रहालय आहे. दुसरे महत्त्वाचे
पवित्र ठिकाण म्हणजे शीख धर्मीयांचा ‘गुरू
ग्रंथसाहेब’ या ग्रंथाचे वाचन, पठण केले जाते ती जागा.
दोन्हीही ठिकाणे त्याच आवारात आहेत.
♦💎♦💎♦💎♦💎♦
     
🙏]भाग १०.
🙏

श्री क्षेत्र गणपतीपुळे
 🚩🚩🚩

रत्नागिरी जिल्ह्यातील
समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची
स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र
किनारी असलेल्या देवळाच्या
पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू
गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट
झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा
गणपती’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो.
हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत.
त्यापैकी पुळ्याच्या गणपती ही
पश्र्चिमद्वार देवता मानतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव
अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी
घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप
बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी
नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे
यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी
अप्पांनी नगारखान्याची व्यवस्था
केली. माधवराव पेशवे व रमाबाईंनी
दगडी धर्मशाळा बांधली आहे. - अशा अनेक
नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.
या गावातील स्थानिक लोक घरोघरी स्वतंत्र
गणपती बसवत नाहीत. सर्व जण एकत्र
येऊन स्वयंभू गणेशाची पूजाअर्चा करून गणेशोत्सव साजरा
करतात.
ज्या डोंगराला श्रीगणेश मानले जाते त्याला प्रदक्षिणा
घालण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात. दरवर्षी २
ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात
सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात.
अगदी समुद्र किनार्यावरच हे मंदिर असल्यामुळे लाटांचा
घनगंभीर आवाज, अथांग सागर, नजरेच्या टप्प्यात न मावणारा
किनारा, अतिशय सुबक, रेखीव असे मंदिर आणि स्वयंभू
श्रीगणेश असा विलक्षण अनुभव येथे मिळतो. संपूर्ण
डोंगराला प्रदक्षिणा घालताना सागराची रूपे, कोकणातला निसर्ग
अनुभवता येतो.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
 भाग११.
 🙏🙏

हरिहरेश्र्वर (रायगड)

🚩🚩🚩🚩🚩
हरिहरेश्र्वर येथील शंकराच्या मंदिराला कोकणात
विशेष स्थान आहे. या ठिकाणी शिवलिंग असून
श्री गणपती आणि
मारुतीचेही मंदिर त्याच आवारात आहे. या
ठिकाणाशी संबंधित एक पौराणिक कथा स्कंद पुराणात सापडते.
मुबंई-गोवा महामार्गावरील माणगावपासून ५३ कि.
मी. वर श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्र्वर हे
ठिकाण आहे. कोकणी पद्धतीच्या कौलारू
छपरामुळे हे मंदिर वेगळे उठून दिसते. समुद्र, खाडी, जांभा
दगड, वाळू यामुळे फारसे भक्कम नसलेलीही
बांधकामे अजूनही टिकून आहेत. कारण पेशवेकाळात अनेक
मंदिरांचा,तीर्थक्षेत्रांचा जिर्णोद्धार करण्याची
पद्धत होती.
श्री हरिहरेश्र्वराच्या मंदिरात एक विहीर
आहे. ती स्वत: ब्रम्हदेवाने खणली असे
भाविक मानतात. २० फूट उंचीच्या दोन दगडी
दीपमाळा या मंदिरात आहेत. हरिहरेश्र्वराच्या देवळात
ब्रम्हा, विष्णू, महेश आणि पार्वतीच्या प्रतिमा आहेत.
महादेवाच्या प्रत्येक ठिकाणी नंदी
असतोच. तसेच काळभैरवाचेही विशेष महत्त्व महादेवाच्या
मंदिरात असते. दैत्यांपासून मुक्ती देणारा म्हणजे
श्री कालभैरव असे मानतात. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात
भाविक काळभैरवाचेही दर्शन घेतात.
एका बाजूने सावित्री नदी, तर
दुसरीकडे अथांग सागर असा हा परिसर.काही
लोक लघुपरिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालतात.त्याला पाऊण तास लागतो.
टेकड्या चढणे - उतरणे, काळेभोर खडक ओलांडणे, पाण्यातून जाणे, लाटा
पहाणे, अवघड वाट चालणे अशी मजा घेता येते.
श्रीमंत पेशवे यांच्या घराण्याचे हरिहरेश्र्वर हे कुलदैवत
होते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराला भेट
देऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. तसेच छत्रपती
संभाजी महाराजही येऊन
गेल्याचेही उल्लेख आढळतात. असे हे हरिहरेश्र्वर-
तीर्थक्षेत्र आहे आणि निसर्गरम्य ठिकाणही
आहे.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
       
 भाग १२.


श्रीवर्धन
🌹🌹🌷🌷

श्रीवर्धन हे कोकणातील रायगड
जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून
तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य
पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
श्रीवर्धन या नावाविषयी कथा
सांगितली जाते. गावातील
लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात
एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे
आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’ म्हटले जाते.. त्या
‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे
‘श्रीवर्धन’. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस
तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस
असलेल्या खाडीत हे गाव आखीव-
रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे
पेशव्यांचे मूळ गाव आहे.
अशा या निसर्गाने, समुद्राने नटलेल्या ऐतिहासिक गावात अनेक
प्राचीन मंदिरे आहेत. त्यांची थोडक्यात
माहिती पुढीलप्रमाणे -
१) कुसुमादेवी मंदिर (श्रीवर्धन)-
 कुसुमादेवी ही
श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे. हे मंदिर
गावापासून लांब, डोंगरात, झाडांच्या हिरव्या छायेत वसलेले आहे. मंदिर
कौलारू असून भोवती मोठे पटांगण आहे. येथे चतुर्भुज
महासरस्वती, अष्टभुजा महालक्ष्मी आणि
चतुर्भुज महाकाली या तीनही
शक्ती एकत्र येऊन ‘महाकुसुमादेवी’ हे स्थान
निर्माण झाले आहे. या सर्व मूर्ती काळ्या
पाषाणातील असून प्रत्येकीची
उंची सुमारे दीड-दोन फूट आहे. कुसुम
म्हणजे फूल. जंगलातील फुलांच्या सहवासातील
देवता म्हणून याचे नाव ‘कुसुमादेवी’ असावे. हे स्थान
पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते.
२)लक्ष्मीनारायण मंदिर (श्रीवर्धन)- या
मंदिरातील विष्णूची मूर्ती म्हणजे
सुंदर शिल्पाकृती आहे. या मूर्तीची
उंची दोन फूट असून ही काळ्या पाषाणात
कोरलेली दक्षिण भारतीय
शैलीची आहे. रेखीव व
प्रमाणबद्ध अशी ही मूर्ती
शिलाहार काळातील असावी. मूर्तीच्या
उजव्या पायाशी गरुड तर डाव्या पायाशी
लक्ष्मी आहे. प्रभावळीत दोन्ही
बाजूस दशावतार कोरलेले आहेत. विष्णूसोबत लक्ष्मीपण
आहे. त्यामुळे याला लक्ष्मी नारायण म्हटले जाते.
३) सोमजाई मंदिर (श्रीवर्धन)- हे स्थान
प्राचीन आहे. अगस्ती
मुनींनी सोमजाईची स्थापना
केली असे मानले जाते. त्याचा जिर्णोद्धार
पेशव्यांनी केलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर
कोरीव काम केलेले आहे. मूळ मंदिरास कोकणी
पद्धतीने कौलारू छपराने आच्छादलेले आहे. सोमजाई
देवी शाळीग्राम स्वरूपातील असून
शिव, भवानी, नंदी, वासुकी या चार
शक्ती मिळून सोमजाई नावाने प्रसिद्ध आहेत. सोमजाई व
हरिहरेश्र्वराचे दर्शन एकाच दिवशी घेतल्यास
दक्षिणकाशी पूर्ण केल्याचे पुण्य मिळते असे मानतात.
४) पेशवे मंदिर (श्रीवर्धन)- पेशव्यांचे हे मूळ गाव
असल्यामुळे त्यांच्याच वास्तुत हे पेशवे मंदिर आहे. याच
ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्र्वनाथ
पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परीधान
केलेला पूर्णाकृती सुंदर पुतळा आहे. उपरोक्त मंदिरांसह
श्रीवर्धन येथे श्रीराममंदिर, आरवी
-नारायण मंदिर, देवखोल -कुसुमेश्र्वर मंदिर, वाकळघर-
गंगादेवी हीदेखील गावापासून
थोडी लांब असलेली प्रेक्षणीय
श्रद्धास्थाने आहेत. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली,
लाकडी खांबांवर सुंदर नक्षीकाम
असलेली, निसर्गाच्या कुशीतील,
प्रसन्न शांततेतील ही सर्व मंदिरे इतिहास
कथन करतात, तसेच सर्व पर्यटकांना निश्र्चितच खुणावतात.

= भाग १३.
🔴🔴
दिवेआगर
👑
अनेक ऐतिहासिक संदर्भांवरून हे गाव बरेच प्राचीन
असल्याचे समजते. शिलाहार घराण्याची इ. स. ८०० ते १२६५
अशी सुमारे ४५० वर्षांची राजवट या भागावर
होती. समुद्रमार्गे व्यापार चाले. त्यातूनच अरबी
चाच्यांनी गाव लुटले, मंदिर उद्ध्वस्त केले
असेही उल्लेख सापडतात. भट आणि बापट
भावंडांनी दिवेआगरचा कायापालट सिद्दीच्या
परवानगीने केला. मोडी लिपीत
त्याविषयीची कागदपत्रे बापटांच्या वारसदाराकडे
आजही ठेवलेली आहेत.
दिवेआगर गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री
सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे
संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची
पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा
देवीची पितळी मूर्ती
आहे. मराठी भाषेतील अतिशय
प्राचीन असा (भाषेच्या अगदी
सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा इ.स.
१०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या
दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान
आहे.
श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि.
मी. आहे. पण म्हसळामार्गे ते १५६ कि. मी.
आहे. रस्ता चांगला आहे. रेल्वेने यायचे असेल तर माणगाव स्टेशनवर
उतरून खाजगी वाहन घेऊन रस्त्याने दिवेआगरला पोहोचता
येते.
🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻🚣🏻
🙏 भाग १४.

🐢

श्री क्षेत्र कनकेश्र्वर
🙏🙏

अलिबाग - रेवस रस्त्यावर अलिबागपासून १२ कि.
मी. अंतरावर कनकेश्र्वर फाटा लागतो. टेकडीवर
कनकेश्र्वर हे शिव मंदिर आहे. या टेकडीला
कनकडोंगरी नावाने ओळखतात. भगवान
परशुरामांनी ती निर्माण केली
अशी श्रद्धा आहे. ७०० ते ७५० पायर्यांचा इ. स. १७६४
मध्ये बांधलेला रस्ता टेकडी चढण्यासाठी आहे.
येथील श्री कनकेश्र्वरांच्या शिवलिंगातून सतत
जलप्रवाह सुरू असतो. टेकडीवरील घनदाट
जंगल, पवित्र शांतता यांमुळे पर्यटकांना व भाविकांना एक सुंदर अनुभव या
ठिकाणी मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राजनीतीचे स्वरूप स्पष्ट करणारा ‘आज्ञापत्र’
हा ग्रंथ लिहिणारे रामचंद्र अमात्य हे कनकेश्र्वराला वास्तव्य करून
होते. त्यांनी राजकारण संन्यास घेतला होता असे सांगतात.
कनकेश्र्वरला श्रीसिद्धिविनायक
मंदिरही आहे. १७९८ मध्ये ते बांधले, कराडच्या लंबोदर
स्वामींनी. बडोद्याच्या
मैराळस्वामींनी गणेशाची
मूर्ती दिली असून त्या
मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात केली
आहे.
🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢🐢
भाग १५.

⚡⚡
श्री कनकादित्य मंदिर, कशेळी

✳✳✳✳
रत्नागिरी - आडीवरे - पूर्णगड या
रस्त्यावरच कशेळी आहे. इ. स. १२९३ मध्ये
अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला.
प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या
ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा
सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी
कुणकुण लागल्याने पुजार्याने दक्षिणेकडे जाणार्या एका व्यापार्याच्या
गलबतावर मूर्ती चढवल्या. काही
मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत
कशेळीजवळ समुद्रकिनार्याजवळ अडकले. त्याने
त्यातील एक मूर्ती गुहेत आणून
ठेवली. नंतर जहाज पुढे गेले. गुहेतील
ही मूर्ती लोकांनी किनार्यावरून गावात
आणली. तेथे हे मंदिर उभे केले. तेच येथील
कनकादित्य मंदिर होय.
मंदिरात सुबक कोरीव काम आहे.
लाकडी प्रतिमा आहेत. कनकादित्याची काळ्या
पाषाणाची मूर्ती आहे, चांदीचा रथ
उत्सवाच्या वेळी पाहायला मिळतो. मंदिरात माघ शुद्ध
सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी असा पाच दिवस
रथसप्तमी उत्सव असतो.
किनार्यावरील कड्यावर सुमारे १५ फूट
उंचीवर, ४०० चौ. फुटांची नैसर्गिक गुहा आहे
- तिथेच कनकादित्याची मूर्ती
सापडली. या मंदिरात ८५० वर्षांपूर्वीचा एक
ताम‘पट आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे.
 🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
 
: भाग १६

✨🌟💫
.नरसोबाची वाडी- कोल्हापूर
🌹🌹🌹🌹🌹
 हें क्षेत्र पंचगंगा व
कृष्णा नदी या दोन नद्यांच्या संगमावर वसलें आहे. मिरज-
कोल्हापूर रेल्वे फांट्यावरच्या शिरोळ स्टेशनावर उतरून या
ठिकाणीं जातां येतें. स्टेशनपासून वाडी ९ मैल आहे. मोटार
व टांगे मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून लोक ज्यांना
दत्तात्रेयाचा प्रथमावतार समजतात ते येथें झाले असें
म्हणतात. या क्षेत्रास कुरुंदवाड संस्थान लागून आहे. येथील
दत्ताच्या पादुकांची सेवा करण्याकरितां हजारो लोक
येतात. भूतबाधा व कुष्ठरोग जातो अशा समजुतीनें बरेच
सेवेकरी येथें नेहमीं राहातातहि. गुरुचरित्रांत या क्षेत्राचें
बरेंच वर्णन केलें आहे. देवस्थानाला चांगलें उत्पन्न असून त्यांतून
गुरुद्वादशीला (आश्विन व।। १२) अन्नदान केलें जातें. दरवर्षी
एकंदर एक लाख यात्रा तरी या ठिकाणीं येत
⬆⬇⬆⬆⬇⬆⬆⬇⬆े.
 भाग १७

💎💎💎

.तुळजापूर

🌷🌷🌷🌷
हे गावं 'बालाघाट' रांगांच्या
कड्या कपारीवर वसलेले आहे. तुळजा भवानी
मातेचे हे स्थान आहे तसेच साडेतीन पीठांपैकी
आद्य पीठाचे स्थान आहे . ह्या देवीला
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असे म्हटले जाते
.
छत्रपती शिवाजी महाराजांना
प्रत्यक्षपणे दर्शन देऊन त्यांना स्वराज्य
स्थापनेसाठी भवानी तालावर दिली होती.
असे मानले जाते व तसेच त्यांची कुलदेवताही
आहे. त्याच प्रमाणे तुळजापूरातील घाट
शिळा वरचे तुकाई देवीचे मंदिर ,अरण्य गोवर्धन
मठ,कालभैरव मंदिर हे तुळजापूरचे महत्त्व
वाढवतात . देवीच्या दर्शनाला येणाऱ्या
भक्तांसाठी व पर्यटकांसाठी येथे पर्यटक
निवास,धर्मशाळा तसेच खाजगी विश्रामगृहे
देखील आहेत .
मार्ग : - सोलापूर पासून ४५ किमी अंतरावर
तुळजापूर आहे . उत्तर आणि पूर्व कडून लातूर
किवा नागपूर मार्गे सोलापूरहून तुळजापूर
पोहोचू शकता. रेल्वे आणि बसेस सेवा उपलब्ध
आहे .
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
\ भाग  १८
🌀🌀

.🙏 श्री क्षेत्र माहूर गड
🌎🌏🌍

नांदेडपासून 140 कि. मी. अंतरावर असलेले
महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे
श्रीक्षेत्र माहुर. महाराष्ट्रातील
देवीच्या साडेतीन पिठापैकी माहूर हे
एक मुख्य पीठ आहे. हे श्री
रेणुकादेवी जगदंबेचे ठिकाण आहे. समुद्र
सपाटीपासून 2 हजार 600 फूट उंचीवर असलेल्या
दोन शिखरांच्या टोकावर श्री दत्तात्रय आणि
रेणुकादेवीचे स्थान आहे.
येथील पर्वत रांगेत काही जैन
लेणीही आढळतात. माहूर किल्ल्याचे प्रवेशव्दार
हत्ती दरवाजा म्हणून ओळखले जाते.
किल्ल्याभोवती धन बुरूज, निशानी बुरूज आणि
महाकाय बुरुज आहेत. किल्ल्यावर ब्रम्हतिर्थ नावाने ओळखले जाणारे मोठे
जलाशय आहे. या किल्ल्याला पैनगंगा खोर्यावर नियंत्रण
करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक
पार्श्वभूमी असलेला राजगड किल्ला जवळच्या पाच
किलोमीटर परिसरात विस्तीर्ण पसरलेला आढळतो.
किल्ल्याची भक्कम तटबंदी आजही
पाहायला मिळते. माहूरला सोनपीर दर्गादेखील
आहे. माहूरभोवती दाट वन असून त्यात वन्य
प्राणी आढळतात. गडाच्या परिसरात माता अनुसूया आणि
परशुरामाचेही मंदीर आहे.
दरवर्षी नवरात्रात व दत्त जयंतीला येथे
मोठी यात्रा भरते. वार्षिक महोत्सवासाठी येथे सर्व
धर्म व पंथाचे लोक मोठ्या संख्येने येतात. दररोज हजारो भाविकांची
येथे वर्दळ असते. पावसाळ्यात गडाभोवतीचा हिरवागार परिसर
पर्यटकांना आकर्षित करतो. येथील दत्तशिखर आणि देवदेवेश्वर
हे महानुभवांचे प्रसिध्द स्थळ आहेत. अभिरुषीतिर्थ,
काजलतिर्थ, मातृतिर्थ आणि रामतिर्थ ही इतर पवित्र स्थळे या
परिसरात आहेत. गडावरील मध्ययुगीन ऐतिहासिक
स्थानामध्ये राणी महल, खुदाबंदखान दर्गा, मस्जिद आणि दिवाण-
ए-खास सभागृह आहे. फरीद शाही दर्गा आणि
गडावरील धबधब्यालादेखील मध्ययुगीन
ऐतिहासिक वारसा आहे.
माहूर ही गोंडांच्या आदिवासी राज्याची
राजधानी होती. पुराणकाळातील
परशुरामाच्या कथा या भागात प्रचलित आहेत.
ऋषीमुनींची तपोभूमी
म्हणूनही माहूरचे प्राचीन काळापासून महत्त्व
आहे. अत्यंत प्राचीन काळापासून येथे मानवी
वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. सातव्या
शतकातील वाकाटकांच्या काळातील पांडवलेण्यांचे
सौंदर्यही येथे पाहावयास मिळते. येथील गुंफा मोठ्या
आकाराच्या आहेत.
पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण माहूरगडावर पाहायला
मिळते. येथील धार्मिक पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक
पर्यटनालाही महत्त्व येत आहे.
अभ्यासकांच्यादृष्टीने हा परिसर महत्त्वाचा आहे. गडावर
देवीचे दर्शन घेतांना विड्याचा प्रसाद आणि सोबत गावात मिळणार्या
पुरणपोळीच्या नैवेद्याची चवही येणाऱ्या
भाविकांसाठी विशेष अशीच असते. धार्मिक आणि
ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी माहूरला एकदा
तरी जायलाच हवे.

💎💎💎💎💎💎💎💎💎
 भाग १९

💐💐💐

🙏 श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी
 ⚡

वाडी रत्नागिरी येथील
श्री ज्योतिबादेवस्थान महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणून प्रसिध्द
आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट
उंचीवरील या ज्योतिबा डोंगराचा परिसर हा
निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात तसेच भोतिक
व ऐहिक ऎश्वर्यात मोलाची भर घालणाऱ्या या
तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वागीण
विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे.
वाडी रत्नागिरी या नावाने परिचित असलेले जोतिबा
देवस्थान हे कोल्हापूरच्या वायव्येस साडेसतरा कि. मी. वर
आहे.
  सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे.
त्याच्यापुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेलेला दिसतो, तोच
ज्योतिबाचा डोंगर ! या डोंगरावर प्राचीन काळापासून प्रसिध्द असलेले
हे ज्योतिबाबाचे पुरातन मंदिर आहे.
श्री ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे.
ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वाचा मिळून एक
तेज:पुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या
नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून
झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश ! वायू, तेज, आप
(पाणी) आकाश व पृथ्वी या
पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच
वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा !

🌀🌏🌀🌏🌀🌏🌀🌏🌀


   भाग २०
⛳⛳

मोरगांव

🔔🔔🔔
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा
मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर
असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया
गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला
होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान
आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘
सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती
श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात
स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक
प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री
मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या
मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम
प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील
बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे
पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर
बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून
अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या
तीनही ठिकाणांपासून मोरगांवला
जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची
सोय आहे.
 

[11/01 7:00 pm] Arunkumar: भाग २१
⛳⛳💎

थेऊर
🙏🙏💐


अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री
चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या
कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण
आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला
चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या
घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे
खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे
यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले.
यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची
समाधीदेखील या ठिकाणी आहे.
मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या
माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे
कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे- सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून
पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून
बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच
ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी
स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

भाग २२
🙏🙏
सिद्धटेक

✴✴✴
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा
अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे
भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू
स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा
आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून
मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून
त्याभोवती चंद्र-सूर्य- गरुड यांच्या प्रतिमा आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण
असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून
२३ कि. मी. अंतरावर आहे.
✅✅✅✅✅✅✅✅✅

भाग  २३

🔴🔴🔴

रांजणगाव
🙏💎

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या
गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे
महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर
मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी
की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी
काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या
शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व
पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला.
शेवटी एक वेळ अशी आली
की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून
त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?)
महागणपती’ असेही म्हटले जाते.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे
महागणपतीचे रूप आहे. श्री
महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन
आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार
केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे
यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण
केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला
लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या
शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात
आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी
श्रींची मूर्ती आहे.
    💦💦💦💦💦💦💦💦
 

भाग  २४

🐚🐚🐚🐚🐚
ओझर
🌷🌷🌸🌸


अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा
गणपती आहे. येथील
श्रींची मूर्ती लांब रूंद असून
अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत
गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले
जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे.
अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला
श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या
गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही
गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी -बांधकाम असून,
मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी
नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत
स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू
चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा
जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी
धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर
तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि.
मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर
आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद
येथील आशिया खंडातील सर्वात मोठी
इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला
हादेखील जवळच आहे

🎡🎡🎡🎡🎡🎡🎡🎡🎡

भाग २५
💐💐💐
लेण्याद्री
🙏🙏

अष्टविनायकापैकी सहावा गणपती
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर
तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि
कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर
श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे.
श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून
ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर
परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम
केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता.
मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह ,
हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७
कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि.
मी. अंतरावर हे ठिकाण आहे.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

No comments:

Post a Comment