THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 30 March 2017

उपक्रम

उपक्रम

🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
उपक्रम :  " गळ टाकूया मासे पकडूया "

कृती :
👉 प्रथम पातळ कार्डशिट वर माश्याच्या प्रतिमेचे सारखे २ कटआउट तयार करणे.
👉दोघांच्या मध्ये ब्लेड टाकून फेव्हीकालने ते चिटकवणे...
👉 एक लोहचुंबकला दोरा बांधणे..
👉 फरशीवर शब्द,संख्या लेखन करणे.
👉   त्यावर माश्याच्या तयार केलेल्या प्रतिमा ठेवणे.
👉एका विद्यार्थीलादोरा बांधलेला लोहचुंबक देणे.
👉 एक-एक विद्यार्थीला मासा गळाला लागल्यानंतर त्याखालील शब्द,संख्या वाचायला लावणे.
👉 अचूकपणे शब्द,संख्या वाचल्यावर सर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉 १० मासे गळाला लागल्यावर दूस-या विद्यार्थ्याला संधी देणे  .
🌷🌷🌷🌷🌷🌷👇👇
उपक्रमांची यशास्विता.....
 खेळातून ज्ञानाची निर्मिती होते..
👉 विद्यार्थी स्वतः एकएक मासा गळाला लावून शब्द,अंक,संख्या वाचन करेल.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
👉 एक विद्यार्थी शब्द,अंक,संख्या वाचन करत असेल तेव्हा ते इतरांना वहीत लेखन करायला सांगितल्यास लेखनाचा सराव करता येईल.
👉 अक्षर,शब्द,संख्या यांचे  संबोध विशेष खेळाच्या अनुभवातुन कायम होतील


No comments:

Post a Comment