THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 30 March 2017

योगासने

योगासने
योगासने
यातील मूळ शब्द योग व आसने. ‘योग’ हा शब्द मूळ
संस्कृत धातू ‘युज्’ म्हणजे जोडणे यापासून तयार
झाला आहे. त्यात अनेक संकेत आहेत. जीवात्मा व
परमात्मा यांचा योग, हा योग
साधण्यासाठी चंचल असलेल्या मनावर विशेष
नियंत्रण आणावे लागते; त्यास योग म्हणतात.
‘चित्तवृत्तींचा निरोध’ अशी योगाची
व्याख्या करतात. चित्तवृत्तींच्या पूर्ण
निग्रहाने सविकल्पक व निर्विकल्पक समाधी
साधता येते. समाधी म्हणजेच योग होय. हे
योग्याचे जीवनध्येय असते. [⟶ योग; योगदर्शन].
योगसाधनेसाठी शरीराची विशिष्ट
प्रकारची स्थिती ठेवणे व त्यात सुख वाटणे
म्हणजे विशेष आसन होय. म्हणून ‘स्थिरसुखं
आसनम्’ (स्थिर व सुखात्मक शरीरस्थिती म्हणजे
आसन) अशी आसनाची व्याख्या योगसूत्रां त
केली आहे. शुद्ध मन नसलेले शरीर, स्थिर बुद्धी
नसलेले शरीर कोणतेही महत्त्वाचे कार्य यशस्वी
करू शकणार नाही, स्वस्थ व व्याधिमुक्त
शरीराशिवाय मनावर नियंत्रण आणता येणार
नाही.
 योगशास्त्रानुसार शरीर शुद्ध करण्याच्या
प्रक्रियेसाठी शरीर ज्या विविध स्थितींमध्ये
ठेवले जाते, त्यांना ‘योगासने’ म्हणतात.
योगाची आठ अंगे सांगितली आहेत ती म्हणजे
यम, नियम, आसन, ⇨ प्राणायाम, प्रत्याहार,
धारणा, ध्यान व ⇨ समाधी होत.
यास ⇨ अष्टांगयोग म्हणजे आठ अंगे असलेला योग
असे म्हणतात. सुखावह स्थिरपणाने (कोणतीही
हालचाल न करता) व शांत चित्ताने एखाद्या
विशिष्ट स्थितीत दीर्घकाल राहता आले,
म्हणजे ते ‘आसन’ साध्य झाले, असे म्हणता येईल. तसेच
कोणत्याही शारीरिक बैठकीत किंवा
स्थितीत सुखावह व यातनाविरहित रीतीने
मनुष्यास नित्याच्या दैनंदिन कार्यात व्यग्र व
एकाग्र राहता येणे, हे आसनांच्या अभ्यासाने
साधले पाहिजे. त्याकरिता एकूण शारीरिक
स्वास्थ्य टिकून राहणे जरूरीचे आहे. शरीरातील
विविध इंद्रिये व संस्था - उदा., श्वसन,
रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन इ. तसेच स्नायूसमूह,
ज्ञानतंतू, मन यांसारखे घटक या सर्वांची
कार्यक्षमता व परस्परसहनियमन यांचा विकास
व्हावा लागतो व तो योगासनांच्या नित्य
सरावातून साधता येतो. योगासनांच्या
विविध स्थितींमुळे–हालचालींमुळे पाठीचा
कणा (मेरुदंड) आणि त्यातील पृष्ठवंशरज्जू अर्थात
मज्जारज्जू–ज्ञानतंतू–मज्जापेशी यांच्यावर
इष्ट परिणाम होतो.
योगासने साधारणपणे वयाच्या दहाव्या
वर्षापासून मुला-मुलींनी करण्यास प्रत्यवाय
नाही. योगासने करण्यासाठी प्रातःकाल
फार चांगला; तथापि सायंकाळीही ती
करण्यास हरकत नाही. योगासनांसाठी
जागा शांत, स्वच्छ, हवेशीर व मनास प्रसन्न
वाटेल अशी असावी. आसने अनशापोटी
शक्यतो करावीत. अथवा पेय घेतल्यास किमान
अर्धा तास तरी जाऊ द्यावा, जेवणानंतर
किमान चार तास जाऊ द्यावेत; मात्र
आसनांनंतर अर्ध्या तासाने जेवण घेण्यास हरकत
नाही. आसने करताना स्वच्छ, हलके, सैलसर व
आवश्यक तेवढेच कपडे घालावेत इ. प्रकारचे नियम
सर्वसामान्यपणे सांगितले जातात. विशिष्ट
प्रकारच्या आजारात, व्याधिग्रस्त व्यक्तींनी,
त्या त्या आजारात अपायकारक ठरणारी
आसने करू नयेत. स्त्रियांनी योगासने करण्यास
काहीच हरकत नाही. मात्र मासिकपाळीच्या
काळात व बाळंतपणात योगासने करू नयेत. आसने
करीत असता श्वसनाची गती नेहमीसारखी
सामान्य असावी. आसने करताना किंवा करून
झाल्यावर श्वासाचा वेग वाढता कामा नये.
घाम येऊ नये व दमल्यासारखे वाटू नये. उलट
योगासने करून झाल्यावर व्यक्तीला शांत,
प्रसन्न, उत्साही व आनंदी वाटले पाहिजे.
योगासनांच्या अभ्यासाच्या प्रारंभी ती
सावकाश व संथ गतीने करावीत. विशिष्ट आसन
साध्य करण्यासाठी शरीराला झटके वा ताण
देऊ नयेत. आसनांची आदर्श स्थिती साधेपर्यत,
विशेषतः लवचिकपणा येईपर्यंत, आसनांच्या
मध्यंतरी अथवा प्रत्येक आसनानंतर थोडी थोडी
विश्रांतीही घ्यावी. प्रत्येक व्यक्तीने
आपल्याला झेपेल, त्याप्रमाणे एकेका
आसनस्थितीचा काल व आवर्तन वाढविणे इष्ट व
आरोग्यदृष्ट्या हिताचे असते.
आसने करण्यास प्रारंभ करण्यापूर्वी शरीर
सामान्यपणे तीन स्थितीमध्ये ठेवावे लागते.
उभ्या म्हणजे दंडस्थितीत; बैठकस्थितीत आणि
पाठीवरील शयनस्थितीत किंवा पोटावरील
विपरीत शयनस्थितीत. विवेचनाच्या सोईच्या
दृष्टीने या तीन वर्गीकरणांनुसार काही
निवडक आसनांचा इथे थोडक्यात परिचय करून
दिलेला आहे. योगासनांवरील वेगवेगळ्या
संदर्भग्रथांतून त्यांची कमीअधीक संख्या व
त्यांनुसार वर्णने आढळून येतात.

No comments:

Post a Comment