THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 10 March 2017

" स्वच्छ विद्यालय , स्वच्छ महाराष्ट्र" घोषवाक्ये,

" स्वच्छ विद्यालय , स्वच्छ महाराष्ट्र" घोषवाक्ये,




1) स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात.
2) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू.
3) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा.
4) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.
5) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराई पसरण्याला.
6) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
7) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने.
8) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र.
9) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता.
10) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
11) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
12) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू .
13) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.
14) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते.
15) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति.
16) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलयं कोण.
17) जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात.
18) नखे कापा बोटाची , नाही होणार व्याधि पोटाची.
19) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ
    सृष्टि.
20) संडास बांधा घरोघरी ,
      आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
21) सांडपाण्याला आळा ,
      रोगाराई टाळा.
22) स्वच्छ सुंदर परिसर ,
        जीवन निरोगी निरंतर.
23) स्वच्छ शाळा करा हातांनी ,
             सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
24) स्वच्छ सुंदर परिसरातनुच ,
    सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.
25) गावकरी मिळुन एक काम करू,
          शौचालयाचा वापर करू.
26) शौचालय असेल जेथे ,
          खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
27) संडास बांधण्या नाही म्हणू नये,
      शौचाला लोटा घेऊन जाऊ नये.
28) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,
         शोष खड्याचा करुया वापर.
29) कचरा कुंडिचा वापर करू ,
         ल सुंदर परिसर निर्माण करू.

No comments:

Post a Comment