THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 30 March 2017

गाभाघटक

गाभाघटक

शैक्ष.मुल्य.गाभाघटक
शैक्ष.मुल्य.गाभाघटक
१) भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास २) संविधानिक जबाबदा-या ३) सामाजिक
अडसरांचे निर्मुलन ४) भारताचा सामाईक
सांस्कृतिक वारसा ५) स्त्री-पुरुष समानता ६) पर्यावरण संरक्षण ७) समता, लोकशाही व
धर्मनिरपेक्षता ८) लहान कुटूंबाचा आदर्श ९) वैज्ञानिक दृष्टीकोन १०) महिला व अन्य दुर्बल
घटकांचे सबलीकरण ११) बुद्धी, भावना व कृती
यांचा समन्वय १२) जागतिकीकरण व
स्थानिकीकरण यांचा मेळ
अ ) राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी
आवश्यक आशय
१) जीवन कौशल्ये २) स्व-ची जाणीव ३) समानानुभूती ४) समस्या निराकरण ५) निर्णयक्षमता ६) परिणामकारक संप्रेषण ७) व्यक्ती-व्यक्तीतील सहसंबंध ८) सर्जनशील
विचार ९) चिकित्सक विचार १०) भावनांचे
समायोजन ११) ताणतणावांचे समायोजन
ब ) ध्येये
१. स्वतःमधील गुणवैशिष्ट्यांमधील माहिती
करून घेण्यास मदत करणे. २. व्यक्तीचा भावनिक,
वैचारिक, सामाजिक विकास होण्यास मदत
करणे. ३. ताणतणावविरहित जीवन जगण्यास
सक्षम करणे. ४. परिसरातील घटकांशी समन्वय
साधून समस्यांवर व अडचणींवर मात करता
येण्यासाठी सक्षम बनविणे. ५. मानवी जीवन
सुखी व समृद्ध होण्यासाठी प्रयत्नशील
राहण्याची जाणीव निर्माण करणे.
क) उद्दिष्टे
विद्यार्थ्यांना –
व्यक्तीमध्ये असलेल्या आंतरिक शक्ती व
गुणवैशिष्ट्यांची जाणीव होण्यास मदत करणे व
त्यानुसार आवश्यक तो बदल घडवून आणण्यास
प्रेरित करणे.
दैनंदिन जीवनात येणा-या अडचणींचा व
समस्यांवर विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य
मार्ग काढण्यास समर्थ करणे.
परिसरातील माहिती, ज्ञान, इतरांचे विचार
इ. व्यवस्थितपणे ग्रहण करून त्यानुसार स्वतःचे मत
बनविण्यास, ते योग्य प्रकारे मांडण्यास आणि
प्रभावी संवाद साधण्यास सक्षम करणे.
परिस्थितीची जाणीव करून घेऊन योग्य
निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
इतरांबद्दल द्वेष, मत्सर, दूषित विचार न ठेवता
त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, समानानुभूती बाळगुन
समाजासाठी हितकारक कृती करण्याची
वृत्ती निर्माण होण्यास समर्थ करणे.
इतरांबद्दल दया, प्रेम, आदर, सद्भावना बाळगून
एकमेकांमधील वैयक्तिक व सामाजिक संबंध
निकोप ठेवण्यास प्रवृत्त करणे.
परिसरातील घटना, कृती प्रसंग इ. बाबत सहजतेने
व विचारपूर्वक निर्णय घेण्याची व ताणतणाव
विरहित आनंदी जीवन जगता येण्याची क्षमता
निर्माण करणे.
आपल्या स्वतःच्या सुखदुःखाच्या प्रसंगात
सहभागी होण्यास प्रवृत्त करणे.
परिसरात घडलेली घटना, कृती कशा प्रकारे
घडते याचा सखोल माहितीच्या आधारे
विचार करून त्यावर तर्क व अनुमान, निष्कर्ष
काढता येण्याची क्षमता विकसित करणे.
एखादी कृती, विचार, पारंपारिक रीतीने
मांडण्याऐवजी त्यात नावीन्य, सोपेपणा, आनंद
निर्माण करून वेगळेपणाने मांडण्यास मदत करणे.

No comments:

Post a Comment