THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 9 March 2017

चला ब्लॉग बनवू

चला ब्लॉग बनवू

How To Creat New Blog...
   
            ब्‍लॉग हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....
नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....
१. स्‍वत: चा Gmail  ID
2. नेट कनेक्‍शन
          वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल.
सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.
Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...

blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल जसे.....



वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा.
Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल.  किंवा blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्‍लॉग तयार होईल. जसे....



तुम्‍ही तयार केलेला ब्‍लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्‍याच्‍या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्‍यावर क्लिक करा ब्‍लॉग पोस्‍टींगचा विंडो उघडेल जसे....



 वरील ब्‍लॉग पोस्‍टच्‍या विंडोमध्‍ये प्रामुख्‍याने दोन गोष्‍टी महत्‍त्‍वाचे आहेत Post समोरील चौकोनात ब्‍लॉगचा Title लिहा खाली मोठा स्‍पेस दिसेल त्‍यामध्‍ये तुमचा विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्‍स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्‍यानंतर उजव्‍या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा तुमचा लेख ब्‍लॉगवर प्रकाशित होईल तेही कोणत्‍याही प्रकाशकाशिवाय...

No comments:

Post a Comment