कबड्डी
कबड्डी
कबड्डी हा मुळात दक्षिण आशियातला व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
मैदाने
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.
खो-खो
खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.
[१]खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च् खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. दक्षिण आशियातल्या दोन पारंपारीक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कब्बड्डी.[२] दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.[३
इतिहास
खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. ह्या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडुंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.
- अर्जुन पुरस्कार
- एकलव्य पुरस्कार (पुरुषांसाठी)
- राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिंलांसाठी)
- अभिमन्यू पुरस्कार (१८ वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी)
- जानकी पुरस्कार (१६ वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी)
खेळाचे नियम
खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.
खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरु झाल्यावर पाठलाग करण्याऱ्या संघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडुंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडुवर खालील बंधने असतात.
- एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)
- तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही
पळ्ण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडुंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.
- पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस tond करून बसलेल्या खेळाडुंनाच तो खो देउ शकतो
- खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणाऱ्या खेळाडुच्या पाठीवर थाप मारुन 'खो' असा आवाज करतो.
- खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.
- ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.
वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरु रहाते.
बचाव करणाऱ्या खेळाडुवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो
- पकडणाऱ्या खेळाडुने (बचाव करणाऱ्या खेळाडुस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर
- बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास
- बचाव करणारा खेळाडुने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास
बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडुंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.
बाद केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्यासंघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो.
खो-खोच्या स्पर्धा[संपादन]
भारतामध्ये खो-खोच्या खालील स्पर्धा आयोजित केल्या जातात
- राष्ट्रीय स्पर्धा
- राष्ट्रीय कुमार स्पर्धा
- राष्ट्रीय निम्नस्तरीय कुमार स्पर्धा
- आंतरशालेय (उच्च्माध्यमिक) स्पर्धा
- आंतरशालेय (माध्यमिक) स्पर्धा
- आंतरशालेय प्राथमिक स्पर्धा
लंगडी
लंगडी
लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ आहे.- क्रिडांगण
- लांबी- १२.१९ मीटर, रूंदी- १२.१९ मीटर, कर्ण- १७.२४ मीटर
- खेळाडू
- दोन संघाचे प्रत्येकी १२ खेळाडू असतात.
- खेळणारे ९ राखीव ३ खेळाडू असतात.
- वेळ
- प्रत्येकी ५ ते ७ मिनीटांचे ४ डाव.
- दोन वेळा लंगडी व पळती.
- नियम
- लंगडी घालणाराने खेळणारास(पळणारा) बाद केल्यास लंगडी घालणारा संघास १ गुण दिला जातो.
- फक्त हातानेच गडी बाद करावा लागतो.
- लंगडी घालणाराचा हात अथवा वर धरलेला पाय जमिनीस टेकल्यास लंगडी घालणारा बाद.
- बाद झालेला लंगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्याशिवाय पुढच्या खेळाडूने प्रवेश करु नये.
- पळतीचे सर्व गडी बाद झाले तरी वेळ शिल्लक असेल तर पुन्हा बाद झाल्याच्या क्रमाने पळतीचे खेळाडू पळतील.
- धावणाराला लंगडी घालणाराने स्पर्श केला तसेच धावणारा मैदानाबाहेर गेला तर तो बाद होतो.
- जास्त गुण मिळविणारा संघ विजयी.
- राष्ट्रीय महिला स्पर्धा
- आंतर्विद्यापीठ स्पर्धा
बास्केटबॉल
![]() | |
| सर्वोच्च संघटना | फिबा |
|---|---|
| सुरवात | १८९१, स्प्रिंगफिल्ड, अमेरिका |
| माहिती | |
| कॉन्टॅक्ट | कॉन्टॅक्ट |
| संघ सदस्य | १३ ते १५ (५ मैदानात) |
| मिश्र | Single |
| वर्गीकरण | इंडोर किंवा आउटडोअर |
| साधन | बास्केटबॉल |
| ऑलिंपिक | १९३६ |
बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकून अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.[१]
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच (४५.७ সেमी) असतो व जाळी १० फूट (३.०५ मी) उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंट लाईन[मराठी शब्द सुचवा] च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला पास[मराठी शब्द सुचवा] करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा बाउंस[मराठी शब्द सुचवा] केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.
नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरिक कॉन्टॅक्ट[मराठी शब्द सुचवा] साठी पेनाल्टी लावल्या जाते.
बास्केटबॉल मध्ये सहसा वापरले जाणारे शब्द शूटींग, पासिंग अणि ड्रिब्लिंग आहेत. सहसा संघातील सर्वात उंच खेळाडू सेंटर, स्मॉल फोरवर्ड किंवा पॉवर फॉरवर्ड मध्ये खेळतो व सर्वात छोटा खेळाडू किंवा चेंडू सक्षमपणे हाताळणारे खेळाडू पॉईंट गार्ड असतात.
इतिहास[संपादन]
बास्केटबॉल, नेटबॉल, डॉजबॉल, व्हालीबॉल, आणि लॅक्रोसे केवळ हेच चेंडूचे खेळ आहे ज्यांचा शोध नॉर्थ अमेरिकेत लागल्याचे मानले जाते.
डिसेंबर १८९१ मध्ये डॉ. जेम्स नैस्मिथ,[२] कॅनडात जन्मलेल्या शारीरीक शिक्षण देणार्या शिक्षकाने [३] (वायएमसीए) (सद्य, स्प्रिंगफिल्ड कॉलेज) पावसाळी दिवसात विद्यार्थ्यांना तंदरूस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल खेळाचे प्रथम नियम व खेळण्याची पद्धती लिहिली.
नियम[संपादन]
‘इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन’ च्या नियमांनुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमांनुसार होत असले, तरी कित्येक देशांत पुरुषांच्या नियमांत काही फेरफार करून स्त्रिया हा खेळ खेळतात. बास्केटबॉलचा सामना प्रत्येकी वीस मिनिटांच्या दोन भागांमध्ये खेळला जातो. मध्यंतरी दहा मिनिटांची विश्रांती असते. खेळाच्या प्रारंभी दोन्ही संघांचे मध्यवर्ती खेळाडू (सेंटर) मध्यवर्तुळात एकमेकांकडे व आपापल्या टोपलीकडे तोंड करून, डावा हात मागे ठेवून उभे राहतात. पंच मध्यभागी येऊन त्यांच्यामध्ये साधारण २ ते २.५ मी. (७ - ८ फुट) उंच हवेत चेंडू उडवितो. तो हवेत पूर्णपणे उंच गेल्यावरच खेळाडूस त्यास स्पर्शण्याची वा हाताने मारण्याची परवानगी असते. आरंभाप्रमाणेच दहा मिनिटांच्या मध्यंतरानंतर तसेच तांत्रिक नियमभंग होऊन मुक्तफेक केल्यानंतरही ही क्रिया केली जाते. प्रत्येक संघात पाच खेळाडू असतात. त्यांची स्थाने ठरलेली असतात. क्रमांक एक व दोनचे खेळाडू बचावाचे वा रक्षणाचे कार्य करतात, त्यांना अनुक्रमे ‘लेफ्ट गार्ड’ (डावीकडील रक्षक) व ‘राइट गार्ड’ (उजवीकडील रक्षक) म्हणतात. प्रतिपक्षाला आपल्या टोपलीत चेंडू टाकू न देणे व अशा रीतीने गोल होऊ न देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होय. क्रमांक तीन, चार व पाच या खेळाडूंना अनुक्रमे ‘लेफ्ट फॉरवर्ड’ (डावा आघाडी), ‘सेंटर’ (मध्यवर्ती) व ‘राइट फॉरवर्ड’ (उजवी आघाडी) अशी नावे आहेत. हे खेळाडू चढाई करतात. यांखेरीज प्रत्येक संघाला बदली खेळाडू खेळवता येतात. खेळामध्ये पाच वेळा खेळाडूंची बदली करता येते. रक्षकांनी बचाव करताना हाती आलेला चेंडू आघाडीपैकी जो खेळाडू मोकळा असेल, त्याच्याकडे फेकावयाचा असतो. चढाई करणारांनी चेंडू आपल्या ताब्यात घेऊन तो आपापसांत फेकावयाचा व प्रतिपक्षाच्या प्रांगणात जाऊन त्याच्या हद्दीतील टोपलीत तो वरून खाली टाकावयाचा असतो. वस्तुतः प्रत्येक खेळाडूसच बचावाचे व चढाईचे कार्य करावे लागते. हा खेळ अत्यंत गतिमान असल्याने प्रत्येक खेळाडू दक्ष व चपळ असावा लागतो व त्यास सतत धावपळ करावी लागते. खेळाच्या नियमांनुसार खेळाडूंना चेंडू हातात घेऊन एका पावलापेक्षा जास्त पुढे, मागे वा बाजूला जाता येत नाही. चेंडू जमिनीवर एका हाताने आपटून टप पाडीतच त्याला जाता येते, अथवा आपल्या जागेवरूनच त्याला आपल्या संघातील दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू फेकता येतो. चेंडू घेऊन पळत सुटणे, तसेच चेंडू पायाने मारणे वा गुद्दा मारणे हे निषिद्ध मानले जाते. प्रतिपक्षी खेळाडूस धरून ठेवल्यास, ढकलल्यास, अडखळून पाडल्यास ते वर्तन व्यक्तिगत नियमभंगाच्या (पर्सनल फाउल) सदरात येते व त्याचा फायदा प्रतिपक्षास मिळतो. ज्याच्या विरुद्ध असा नियमभंग घडला असेल त्या खेळाडूस मुक्तफेकीच्या रेषेपासून (फ्री थ्रो लाइन) प्रतिपक्षाच्या टोपलीत सरळ चेंडूफेक करण्याची संधी मिळते. खेळाडूंना धक्काबुक्की करण्याव्यतिरिक्त खेळ लांबवणे, खेळताना मधूनच बाहेर जाणे वगैरे तांत्रिक नियमभंग एखाद्या संघाकडून घडल्यासही त्याच्या प्रतिपक्षास मुक्तफेकीची संधी मिळते. मात्र अशा मुक्तफेकीने गोल झाल्यास त्यास फक्त एक गुण मिळतो. एरव्ही खेळताना झालेल्या गोलास (फील्ड गोल) २ गुण असतात. खेळताना चेंडू प्रांगणाबाहेर गेल्यास, ज्या संघाने तो बाहेर घालवला असेल, त्याच्या विरुद्ध संघास तो जेथून बाहेर गेला असेल, त्या ठिकाणाहून आत फेकता येतो. तसेच गोल झाला की, चेंडू पुन्हा मध्यभागी न आणता तिकडील प्रांगणातील खेळाडूंपैकी एकाने तो अंतिम रेषेपासून आत फेकावयाचा असतो. यामागे वेळ वाचवण्याचा उद्देश असतो. तसेच खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी वा खेळाडू जखमी झाल्यास प्रत्येक संघास तीन वेळा एकेक मिनिटाचा कालावधी (टाइम आउट) मागून घेता येतो. हा अवधीही पुढे वेळ वाढवून भरून काढला जातो. त्यामुळे प्रत्येक डाव संपूर्ण वीस मिनिटांचा होतो. खेळाच्या शेवटी जो संघ जास्त गुण मिळवेल तो विजयी ठरतो.
फुटबॉल
फुटबॉल
आक्रमक खेळाडू (क्र.१०) गोल करण्याच्या प्रयत्नात
| |
| सर्वोच्चसंघटना | फिफा |
|---|---|
| उपनाव | असोशिएशन फुटबॉल, सॉकर, फुटी, "द ब्युटीफुल गेम", "द वर्ल्ड गेम" |
| सुरवात | मध्य १९ वे शतक ब्रिटन |
| माहिती | |
| कॉन्टॅक्ट | हो |
| संघ सदस्य | ११ खेळाडू संघागणिक |
| मिश्र | हो, स्वतंत्र स्पर्धा |
| वर्गीकरण | सांघिक खेळ, चेंडू खेळ |
| साधन | फुटबॉल |
| मैदान | फुटबॉल मैदान |
| ऑलिंपिक | इ.स. १९०० |
फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचे उद्दिष्ट आहे. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
२१ मे १९०४ रोजी पॅरीस येथे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड(हाॅलंड), डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना स्थापन केली. इ.स. १८६३ साली फुटबॉल असोसिएशन या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्द केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन (फिफा) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धाफुटबॉल विश्वचषक होय.
१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत चिली व इटली यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम बघणारे इंग्लिश पंच केन ॲस्टन हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७० च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण जगभरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.
खेळाचे स्वरूप
हा खेळ एका गोलाकृती चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतर होतो.
महत्त्वाच्या संघटना[संपादन]
- फिफा : फेदेरात्सिओन इंटरनात्सिओनाल दे फुटबॉल आसोसिआत्सिओन
- युएफा : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन
मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]
हॉकी
हॉकी
हॉकी सामना
| |
| सर्वोच्च संघटना | आतंरराष्ट्रीय हॉकी संघटन |
|---|---|
| सुरवात | १९ वे शतक |
| माहिती | |
| कॉन्टॅक्ट | नाही |
| संघ सदस्य | ११ खेळाडू मैदानात |
| वर्गीकरण | इंडोर - आउटडोअर |
| साधन | हॉकी चेंडू,हॉकी स्टीक |
| ऑलिंपिक | १९०८,१९२०,१९२८-सद्य |
हॉकी, किंवा फिल्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरूध्द संघाच्या गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. खेळाचे मान्यता प्राप्त नाव हॉकी असले तरी ज्या देशा हॉ़की नाव इतर हॉकी प्रकारांसाठी उदा. आइस हॉकी, वापरल्याजाते त्या देशात ह्या खेळाला फिल्ड हॉकी म्हणले जाते.
हॉकी मध्ये पुरूष व महिलांसाठी अनेक नियमीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. महत्वाच्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक स्पर्धेंचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) हि खेळाची सर्वोच्च संघटना आहे. एफ आय एच हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावळी ठरवते.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेट नंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ इंडोर खेळल्या जातो. इंडोर फिल्ड हॉकी चे नियम हॉकी पेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात ६ खेळाडू असतात नियमीत ११ एवेजी, मैदान सहसा ४० मी x २० मी; [मराठी शब्द सुचवा]शूटींग सर्कल ९मी. बाजूच्या सीमा एवेजी [मराठी शब्द सुचवा]बॅरीयर्स असतात. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.


No comments:
Post a Comment