THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 22 August 2018

महर्षींचा वसा चालवणारे              शिक्षकी पेशात  कधीच नाही कमी

महर्षींचा वसा चालवणारे             
शिक्षकी पेशात  कधीच नाही कमी |
मुलांप्रती मित्रत्वाचे नाते आमचे
आंम्ही देतो गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी || १ ||

विविध क्लुप्त्या आणि उपक्रम
सदैव आमच्या सोबती |
विद्यार्थी  विकास साधतो आम्ही
वर्तनवाद,ज्ञानराचानावाद आमच्या संगती || २ ||

ग्रामीण भागाचे रुपडे बदलण्याची
आहे इच्छा आमच्या मनामनातून |
भारताचे भविष्य आकार घेत आहे
आमच्या ग्रामीण शाळा शाळांतून || ३ ||

विद्यार्थ्यांशी नाते जुळले आमचे
सहानुभूतीचे प्रेमाचे |
प्रत्येक मुल प्रगत व्हावे
हेच ध्येय धोरण आमचे || ४ ||

प्रत्येक काम करतो
आम्ही शर्थीने  कर्तव्यनिष्ठतेने |
विद्यार्थी हिताची कास धरून
प्रगतीच्या वाट शोधतो तन मन धनाने || ५ ||

भावी इतिहास घडवण्याची
आहे आमच्यात क्षमता |
संस्कारमय पिढी घडावी
यासाठी सतत घेतो  दक्षता || ६ ||

चाकोरीबाद्द जीवन जगणे
आहे आमची कमजोरी |
याच ठिकाणी होते आमची
टिंगल टवाळखोरी || ७ ||
सामाजिक संस्कृतीचे भान जपणारे
आम्ही आहोत उपासक |
राष्ट्रीय संपती संवर्धनासाठी आम्ही
असतो आजन्म अभ्यासक || ८ ||

ज्ञानप्रसारक,सहशोधक
आम्ही सदैव  प्रशिक्षक |
आम्हीच समुपदेशक प्रबोधक
आणि मूल्य संवर्धक || ९ ||

संशोधक, साहित्य लेखक परीक्षक
आणि गुणवत्ता समीक्षक ज्ञानदाता |
विद्यार्थ्यांचा कौशल्य दाता ,संस्कारदाता
नवनिर्मितीचा  गुरुजीच आहे  स्फुर्तीदाता

No comments:

Post a Comment