THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 22 August 2018

सातत्य सर्वंकष मूल्यमापन CCE जाणून घेऊ या.    20 ऑगस्ट 2010 शासननिर्णयानुसार  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत आपण माहीती करून घेऊया . C.C.E.  नुसार आकारीक मुल्यमापन व संकलीत मुल्यमापन

सातत्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE जाणून घेऊ या.
   20 ऑगस्ट 2010 शासननिर्णयानुसार  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याबाबत आपण माहीती करून घेऊया . C.C.E.  नुसार आकारीक मुल्यमापन व संकलीत मुल्यमापन यातुन आपण विद्यार्थ्याचे मुल्यमापन करतो  . आकारीक मुल्यमापनात विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेचे मुल्यमापन तर संकलीत मुल्यमापनातुन विद्यार्थ्याचे संपादणुकिचे मुल्यमापन करतो . आकारीक मुल्यमापनात एकुण आठ साधनतंत्राचा वापर करतो .  इयत्ता३ री ,४ थी ,व ५  वी परिसर अभ्यास याविषयाचे  * परिसर अभ्यास भाग 1 साठी 60 टक्के भारांश *व *परिसर अभ्यास भाग 2 साठी 40 टक्के भारांश घ्यावा.*
दैनंदीन निरीक्षण
तोंडी काम
कृती / उपक्रम
प्रयोग /प्रात्यक्षिक
प्रकल्प
स्वाध्याय / वर्गकार्य
चाचणी
इतर साधने ( स्वंयमुल्यमापन व सहाध्यायी , पडताळा सुची , विद्यार्थी संचिका , पदनिश्चयन श्रेणी , मतावली , प्रासंगीक नोंदी , अभिरुची प्रश्नावली ) इत्यादी

          ही साधनतंत्रे  अध्ययन अध्यापन व मुल्यमापन यासाठी उपयुक्त आहेत .
दैनंदीन निरिक्षण : विद्यार्थी निरीक्षणातुन शिकतो . क्षेत्रभेटी , सहली , प्रयोगशाळा , याठिकाणी अनेक प्रकारची निरिक्षणे करत असतो . यातुन त्याचे अध्ययन होते . शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अध्ययनातील प्रगती , रुची , आवड , मुल्य, जीवनकौशल्ये , व्यकतीमत्व विकास , शिकण्याची गती, पध्दती , अध्ययनातील अडथळे , शारीरिक , भावनिक , बौध्दीक याचा मागोवा घेवुन अध्यापनात सुधारणा व विद्यार्थ्याला मार्गदर्शन यासाठी शिक्षकाने दैनंदीन निरिक्षण करावे . सत्रनिहाय विषयापुढे नोंदवहीमध्ये अत्यंत उल्लेखनिय नोंदी कराव्यात .
तोंडी काम : हे साधनतंत्र भाषण , संभाषण , मुलाखत गटचर्चा , प्रश्नोत्तरे , भुमिका मांडणी , आकृती , नकाशा , आलेख , चित्रवाचन यासाठी वापरता येते . गटात व वैयक्तिक स्वरुपात घेता येते . योग्य भारांष ठरवुन सत्रनिहाय विद्यार्थ्याचे तोंडी काम तपासावे.
कृती / उपक्रम : चित्रावर , स्वाध्यायावर , निरिक्षण यासाठी  विशिष्ट हेतु डोळ्यासमोर ठेवुन केलेले काम म्हणजे कृती आणि अनेक कृतीची गुंफन म्हणजे उपक्रम. चौकटीबाहेर जाऊन प्रत्येक्ष अनुभवातुन  स्वताच्या गतीने अनौपचारीक वातावरणात शिकता येते . शिक्षकानी सत्रात अनेक कृती आणि उपक्रम यांचा सराव घ्यावा . त्यातील एका कृतीची किंवा उपक्रमाची मुल्यमापनासाठी निवड करून त्यातील सहभाग सातत्य सफाईदार पणा  याचा विचार करून गुणदान करावे.
प्रयोग / प्रात्यक्षिक : कृतीतुन संकल्पना , नियम , गुणधर्म , निष्कर्ष यांचा पडताळा घेणे म्हणजे प्रयोग होय. यातुन कारक कौशल्याचा विकास होतो . कृतीतुन शिकता येते . घोकंपट्टी टळते . अमुर्त कल्पना स्पष्ट करण्यास मदत होते. प्रात्यक्षिकातुन सराव , दृढीकरण होते . सत्रात शिक्षकाने अनेक प्रयोग प्रात्यक्षिके घ्यावेत . एका प्रयोगाचे किंवा प्रात्यक्षिकाचे मुल्यमापनासाठी निवड करून कृतीतील क्रम सातत्य , अचुकता सफाईदारपणा निरिक्षणातील वेगळॆपण साधने हाताळण्याचे कौशल्ये या निकषावर गुणदान करावे .
प्रकल्प : प्रकल्पातुन प्राप्त ज्ञानाचे उपयोजन कृतीतुन अध्ययन , जीवनकौशल्याचा विकास आत्मविश्वास , स्वावलंबन , सहकार्य , सादरीकरण , निवेदन  या गुणाचा विकास होतो . प्रकल्पाचे प्रकार संग्रह , सर्वेक्षण , संशोधन , प्रतिकृती तयार करणे . कोणत्याही एका सत्रात विद्यार्थ्याने एक प्रकल्प पुर्ण करावा . प्रकल्पाचे नियोजन कार्यवाही माहीती संकलन , निष्कर्ष , सादरीकराण यानुसार गुण द्यावेत .
स्वाध्याय / वर्गकार्य : शाळेत व शाळॆबाहेर स्वंयअध्ययनातुन शिकण्याची प्रक्रिया सतत चालू रहावी , ज्ञानाचे दृढीकरण व उपयोजन यासाठी उपयुक्त . शिक्षकानी स्वताची प्रश्नपेढी तयार करुन नियोजनपुर्वक स्वाध्याय द्यावेत . आशयाची समज नाविन्य , मांडणी याचा विचार करून  गुणदान करावे.
चाचणी : पुस्तकासह व पुस्तकाशिवाय चाचणी घेता येते. यातुन लेखी प्रतिसाद , विचारप्रक्रिया , मध्यवर्ती कल्पना , आशयाची समज , उपयोजन , अभिव्यक्ति , आकलन पडाताळता येते . सराव , मुल्यमापन यासाठी उपयुक्त उता-यावरील प्रश्न , नकाशा , चित्रे , आलेख , यावरील प्रश्न काढून पुस्तकासह चाचणी घेता येते . यासाठी पुरेसे साहित्य नियोजन , विद्यार्थ्याना नीट सुचना दिल्या पाहिजेत .
इतर साधने ( स्वंयमुल्यमापन व सहाध्यायी , पडताळा सुची , विद्यार्थी संचिका , पदनिश्चयन श्रेणी , मतावली , प्रासंगीक नोंदी , अभिरुची प्रश्नावली ) इत्यादी यातुन विद्यार्थ्याचा छंद , कल , आवड , अभिरुची , जीवनकौशल्ये पडताळता येतात.

  
संकलीत मुल्यमापन

    प्रत्येक सत्राच्या अखेरीस करावयाचे मुल्यमापन , संकलीत मुल्यमापन आणि आकारीक मुल्यमापन यातील प्राप्त गुण एकत्रीत करून विषयनिहाय श्रेणी द्यावी . संकलीत मुल्यमापनानंतर अतिरिक्त व पूरक मार्गदर्शनासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी  राखुन ठेवावा . संकलित मुल्यमापन तोंडी , प्रात्यक्षिक   व लेखी स्वरूपात घ्यावा . लेखी चाचणीसाठी संविधान तक्ता तयार करून ज्ञान , आकलन , उपयोजन , कौशल्य ही उद्दीष्टे मुक्त , बध्द प्रश्न ,  दीर्घोत्तरी , लघुत्तरी वस्तुनिष्ठ या प्रश्नप्रकारासह सृजनात्मक प्रश्न विचारांना चालना देणारे प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न  , मुल्य तपासणारे प्रश्न , कारण मिमांसा जाणणारे प्रश्न चाचणीत टाकावेत . सोपे, मध्यम, कठीण  याचेही प्रमाण राखावे . यासाठी शिक्षकाकडे स्वताची प्रश्नपेढी  असणे आवश्यक आहे . शिक्षकाने स्वता प्रश्नपत्रिका काढावी .

No comments:

Post a Comment