महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे भव्य राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा
📝 *रंगभरण स्पर्धेस राज्यभरातून लाभतोय प्रचंड प्रतिसाद*🥇🏅
📝 *३१ऑगस्ट पुर्वी स्पर्धा यशस्वी करून स्पर्धाचित्रे पाठविण्याचे आवाहन*
....................................................................................
मुंबई (प्रतिनिधी )महाराष्ट्र पत्रकार संघाचे मुखपत्र दै.झुंजार सेनापतीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुक्त कलागुणाना वाव मिळावा त्यांचा कलात्मक विकास व्हावा रंगसंगतीचे ज्ञान मिळावे ग्रामीण विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व्यासपिठ मिळवून देऊन त्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरूजनांचा सन्मान व्हावा या उदात्त उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी भव्य राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्पर्धेला राज्यभरातील शाळा महाविदयालयातून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे राज्यभरातील तमाम शाळा महाविद्यालये व स्पर्धा संपर्क प्रमुखांच्या विनंतीनुसार या स्पर्धेस राज्य कार्यकारीणीने मुदतवाढ दिली आहेे ३१ ऑगस्ट पुर्वी स्पर्धा यशस्वी करून स्पर्धाचित्रे पाठविण्याचे अवाहन राज्य कार्यकारीणीने केले आहे या स्पर्धा तीन गटात शाळास्तरावर घेतल्या जात असून पहिल्या गटात पहिली ते चौथी दुसऱ्या गटात पाचवी ते सातवी तर तिसऱ्या गटात आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत तसेच पहिल्या गटात अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्याना तर तिसऱ्या गटात महाविदयालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रत्येक गटासाठी रोख १५०१ / - १००१ /- ५०१ /-बक्षिसासह आकर्षक सन्मानचिन्ह, गुणवत्ता प्रमाणपत्र,मेडल देवून तसेच विभागीय विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, गुणवत्ता प्रमाणपत्र,मेडल देवून गौरविण्यात येईल. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरिय विशेष प्राविण्य गुणवत्ता यादीतील १०० विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र व मेडल तर प्रत्येक शाळा स्तरावरील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांस विशेष गुणवत्ता प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडणा-या व २०० पेक्षा अधिक कलाकृती पाठविणाऱ्यI स्पर्धा संयोजकास *राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार* तर ३०० पेक्षा अधिक कलाकृती पाठविणाऱ्या स्पर्धा संयोजकास *राज्यस्तरीय शिक्षणभूषण पुरस्काराने* सन्मानित करण्यात येईल .या स्पर्धेतील विजेत्यांना व पुरस्कार पात्र स्पर्धा संयोजकास महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय कलागौरव महोत्सव या खास कार्यक्रमात मान्यवरांचे शुभहस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. स्पर्धा संयोजकांनी या स्पर्धा आपल्या शाळास्तरावर घेऊन स्पर्धाचित्रे *श्री बाबासाहेब राशिनकर राज्य संपर्क प्रमुख तथा राज्य स्पर्धा प्रमुख महाराष्ट्र पत्रकार संघ कार्यालय व्दारा दैनिक प्रहार कार्यालय बस स्टॅडसमोर,गुहागर ता गुहागर जि. रत्नागिरी पिन ४१५७०३ मोबाईल 9922452635 / 9403845584* या पत्त्यावर ३१ऑगस्टपूर्वी पोहचतील अश्या बेताने पाठवावेत या स्पर्धा यशस्वी .करण्याचे व अधिकाधिक सहभाग नोंदवण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष *विलासराव कोळेकर* राज्य संपर्क प्रमुख तथा राज्य स्पर्धा प्रमुख *बाबासाहेब राशिनकर* दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक *सोमनाथ पाटील* व राज्य कार्यकारिणीने केले आहे.
No comments:
Post a Comment