THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 22 August 2018

भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांची पायाभूत चाचणी

दि.28, 29, 30 ,31 ऑगस्ट 18 या कालावधीत भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांची पायाभूत चाचणी घेण्याचे निश्चित झालेले आहे व त्या प्रमाणे आपण विदयार्थ्यांची तयारीही केलेली असेल .
       सदर पायाभूत चाचणीसाठी आपण आपल्या शाळेतील 100% विदयार्थी उपस्थित ठेवणे बंधनकारक आहे. याबाबत प्रत्येक वर्गशिक्षकांना लेखी सूचना देण्यात याव्यात गैरहजर विदयार्थी बाबतीत गृहभेटी घेवून पालकांना विदयार्थी शाळेत पाठविण्यासाठी उद्बोधन करावे.       100% विदयार्थ्यांची पायाभूत चाचणी लेखी व तोंडी( आवश्यक तेथे विविध शैक्षणिक साधनांचा / ज्ञानरचना वादाचा वापर करावा व संग्रहित ठेवावे )परीक्षा घेवून भाषा, गणित, इंग्रजी ,विज्ञान या विषयांचे गुण अचूक गुणदान तक्त्यात भरुन वेळेत कार्यालयात सादर करणे .
   तसेच प्रत्येक प्रश्नांचे लेखी व तोंडी गुणदान student Portal ला नोंदवावे. यासाठी वेळेत उत्तरपत्रिका तपासून दिलेल्या क्षमतांनुसार मार्क विभागणी पाहूनच portal ला मार्क नोंदवणे व कार्यालयात Format मध्ये मुले + मुली= एकूण विषयानुसार अहवाल सादर करावा .
   यापूर्वी प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील 100% विदयार्थ्यांचा अध्ययन स्तर विदयार्थी निहाय निश्चित केलेला आहे अध्ययन स्तरावरून मागे असणाऱ्या विदयार्थ्यांचा विषयानुरूप कृती कार्यक्रम तयार करणे बाबत यापूर्वी मिटिंग व शाळा भेटीमध्ये सूचित करणेत आलेले होते तथापि बऱ्याच शाळा भेटी केल्या असता वर्गात पूरेसे शैक्षणिक साहित्य तसेच विदयार्थी निहाय कृती कार्यक्रम दिसून आलेले नाही याबाबत मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. यामध्ये प्रगती होऊन आपला वर्ग आपली शाळा 100% प्रगत होणे हे तुम्हाला व आम्हाला अभिमानास्पद असेल यासाठी सर्व मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांना शुभेच्छा !
     सूचनांची कार्यवाही व्हावी .
   

No comments:

Post a Comment