PENDRIVE किंवा SD कार्ड खराब झाले -दुरुस्त करा सोप्या पद्धतीने.
PENDRIVE किंवा SD कार्ड CORRUPT झाले असतील तर संगणकाच्या साह्याने कसे दुरुस्त करावे?
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
आपणास माहीतच आहे की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत प्रत्येक शिक्षक हा तंत्रस्नेही बनलायलाच हवा आहे.त्यासाठी शिक्षकाला विविध तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे जसे की --संगणक, प्रोजेक्टर, डीव्हीडी प्लेयर, माईक, हेडफोन, SD कार्ड, PENDRIVE, मोबाईल, टॅबलेट, अँड्रॉइड अँप्स, इत्यादी. ह्या सर्व तंत्राची माहिती असणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच त्यांचा वापर आपणास विविध शैक्षणिक क्षेत्रात तसेच वर्गात कसा करता येईल महत्वाचे आहे.
कधी कधी हे तंत्र काम करत असताना खराब होतात व म्हणून आपण विद्यार्थ्यास तंत्राने शिकवण्याचे थांबवतो याचे कारण म्हणजे रिपेअर करण्यास खर्च येतो.
आता आपणास घाबरण्याची आवश्यकता नाही मी ह्या ठिकाणी टप्प्या टप्याने विविध तंत्रे कसे घरी बसल्या बसल्या रिपेअर करता येईल याचे मार्गदर्शन करणार आहे
सर्व प्रथम PENDRIVE किंवा SD कार्ड CORRUPT झाले असतील तर संगणकाच्या साह्याने कसे दुरुस्त करवे ?
【 ही process करण्यापूर्वी लक्ष्यात घ्या की तुमचा pendrive/SD card मध्ये साठवलेला सर्व data delete होणार आहे】
1.सर्व प्रथम खराब झालेले (corrupted) pendrive/sd कार्ड CPU च्या USB पोर्ट ला लावा.
2.संगणकावरील WINDOWS LOGO ला क्लिक करा आता SEARCH करायसाठी थोडी जागा आली असेल
3.आता search बॉक्स मध्ये CMD नाव टाका.खलील प्रमाणे.
4.अशी window उघडेल ह्या मध्ये आपल्याला cmd वर mouse चे right क्लीक करून run as administator चा पर्याय निवडायचा आहे(क्लीक करा)
5.आता command file उघडेल.ह्या ठिकाणी आपणास लक्ष्य पूर्वक काम करायचे आहे.ह्या ठिकाणी आपणास काही command टाकाययाच्या आहे.ह्या सर्व commond अचूक असणे फार गरजेचे आहे.window कशी उघडणार ते बघा.
6.ज्या ठिकाणी 'I' किंवा ' - 'अशा प्रकारचे blink करणारे कर्सर किंवा निशाणी येईल त्या ठिकाणी आपणास "disk part " नाव टाकायचे आहे व enter बटन दाबा.
7.आता परत आपणास सारखीच कृती करून diskpart चा जागी "list disk" नाव टाकून enter बटन दाबायचे आहे.लक्ष्यात ठेवा कृती न.6 मधील कुठली भाग delete करायचा नाही.ही कृती आपणास त्या खाली करायची आहे.disk part >_ असे commond आपोआप येणारे आहे.
Enter बटन दाबल्या नंतर दोन डिस्क दिसत आहेत
Disk 0 व disk 1.ह्या मध्ये disk 1 हे pendrive आहे.
इथे आपणास डिस्कचे size बघणे आवश्यक आहे.तुमचा pendrive/sd कार्ड किती mb/GB चा आहे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.अचूक पर्याय निवडणे आवश्यक आहे
Disk 0 व disk 1.ह्या मध्ये disk 1 हे pendrive आहे.
इथे आपणास डिस्कचे size बघणे आवश्यक आहे.तुमचा pendrive/sd कार्ड किती mb/GB चा आहे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.अचूक पर्याय निवडणे आवश्यक आहे
8.disk part >_ पुढे select disk 1 नाव टका व enter बटनाला क्लिक करा.कृती खाली दिली आहे.
9.ह्या कृती मध्ये आपण आपला pendrive/sd कार्ड format करणार आहोत त्यासाठी disk part >_ पुढे 'clean' नाव टाका व enter बटन दाबा.
10.आता आपण अंतिम कृती वर येत आहोत . disk part >_ पुढे "partition primary" नाव टाकून enter बटन दाबा.
11.ह्या ठिकाणी आपणास नवीन झालेला Pendrive/SD कार्ड active करून घ्यायचा आहे त्यासाठी disk part >_ पुढे "active" असे नाव टाका व enter बटन दाबा.
12.ह्या कृती मध्ये disk part >_ पुढे "select partition 1" असे नाव टाका व enter बटन दाबा.खलील कृतीत दाखवले आहे.
13.ही शेवटची कृती आहे ह्या मध्ये disk part >_ पुढे "format fs=fat32" असे नाव टाका व enter बटन दाबा.खलील कृतीत दाखवले आहे.आता 1 ते 100 % पर्यंत process चालू होईल जो पर्यंत 100% प्रोसेस पूर्ण होत नाही तो पर्यंत संगणकाशी छेडछाड करू नका.100% प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपण आपला पेंद्रीवे पुन्हा नव्याने वापरू शकता.
★★★★★★★☆★★★★★★★★★★★★★★
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★☆★★★★★★★★★★★★★★
माहिती PDF मध्ये डाउनलोड करा
<<[DOWNLOAD]>>
No comments:
Post a Comment