THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 31 December 2017

पायाभूत चाचणी गुण विद्यार्थी पोर्टल मध्ये कसे भरावे

पायाभूत चाचणी गुण विद्यार्थी पोर्टल मध्ये कसे भरावे

Pdf file  तसेच video file पोस्ट च्या शेवटी दिली आहे,बघण्यास विसरू नका.
*पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल  मध्ये भरणे बाबतचे Manual*

सरल मध्ये मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. *दिनांक २5/११/२०१६* ही माहिती भरून पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे.

   मागील वर्षी सर्वर च्या कमतरतेमुळे माहिती भरताना काही अडचणी  निर्माण झालेल्या होत्या परंतु या वर्षी सर्व अडचणीचा विचार करून त्या पुन्हा येणार नाही याची काळजी घेऊन सदर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे याची  नोंद घ्यावी.या संदर्भात मा.संचालक (प्राथ.) यांचे दिनांक ५/११/२०१६ रोजीचे पत्र आपण वाचलेले असेलच.

  सदर माहितीमध्ये एकाच ठिकाणी संकलीत आणि पायाभूत परीक्षा ची माहिती ऑफलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

*महत्वाचे* : पायाभूत व संकलीत परीक्षाचे गुण student पोर्टल  मध्ये भरणे बाबतचे Manual download करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.

 सर्व प्रथम मुख्याध्यापकाने आपले login करून excel या tab ला क्लिक करावे.या  स्क्रीन मध्ये excel या tab मधील download baseline and summetive exam 1 या बटनावर क्लिक करावे.
   यामध्ये आपण आपणास ज्या वर्गाची file download करावयाची आहे तो वर्ग आणि तुकडी भरावी आणि download या tab ला क्लिक करावे.लगेचच आपल्या कॉम्पुटर मध्ये त्या वर्गाची एक excel file download झालेली दिसेल.

  या file ला ओपन करून आपण दिलेल्या नमुन्यात पायाभूत आणि संकलीत चाचणी चे गुण भरावयाचे आहे.ही excel file open करताना पुढीलप्रमाणे सुचना संगणकावर दिसून येईल त्या सूचनेस आपण yes असे करावे.

  सदर स्क्रीन मध्ये आपणास वरील बाजूस असलेल्या enable editing या बटनाला क्लिक केल्याशिवाय सदर स्क्रीन मध्ये कोणतेही काम करून दिले जात नाही याची नोंद घ्यावी.

 या sheet मध्ये ज्या ठिकाणी आकाशी रंग दर्शविला गेलेला आहे फक्त त्या कॉलम मध्ये  माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.इतर ठिकाणी आपण काहीही माहिती भरू शकणार नाही.तशी सुविधा sheet मध्ये करून देण्यात आलेली आहे.

सदर स्क्रीन चे निरीक्षण व्यवस्थित केल्यास आपणास असे लक्षात येईल की आपण ज्या वर्गाची file download करू त्या वर्गासाठी पायाभूत चाचणी आणि संकलीत मूल्यमापन यासाठी असलेल्या गुणानुसार सदर sheet download होते.

*उदा.,*  इयत्ता पहिली च्या वर्गासाठी पायाभूत चाचणी नसल्याने सदर sheet मध्ये फक्त संकलीत मूल्यमापन १ चीच माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांना देखील आपणास लागू असणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे गुण लक्षात घेऊन त्याप्रमाणे भरण्याची सुविधा असलेली file download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण माहिती त्वरीत भरून पूर्ण करावयाची आहे.

  अशा प्रकारे आकाशी रंगात असलेल्या कॉलम मध्ये प्रथम पायाभूत चाचणी आणि नंतर संकलीत मूल्यमापन-१ च्या गुणांची नोंद करावी.यामध्ये दोन्ही परीक्षेच्या बाबतीत present yes/no आणि marks obtaine अशा दोन कॉलम मध्ये माहिती भरावयाची आहे.ही माहिती भरताना खालील काही सूचना वाचा.

१) *विद्यार्थी जर परीक्षेसाठी उपस्थित असेल तर त्याच्या नावासमोर present Y/N या कॉलम मध्ये फक्त कॅपिटल मध्ये Y असे लिहावे.जर विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर कॅपिटल मध्ये N असे लिहावे.*

२) *जर विद्यार्थी  गैरहजर असेल तर त्याच्या नावासमोर marks obtaine या कॉलम मध्ये गुणांची नोंद काहीच घेऊ नये म्हणजेच blank सोडावे.कृपया तेथे 0 देखील लिहू नये याची नोंद घ्यावी.*

३) *काही मुले परीक्षेसाठी हजर असतील परंतु त्याना जर गुण 0 मिळाले असतील तर तेथे 0 असेच लिहावे.तेथे blank सोडू नये हे लक्षात घ्यावे.*

४) *ज्या मुलांची नोंद आपण student पोर्टल मध्ये केलेली नाही अशा मुलांचे नाव गुण भरण्यासाठी सदर excel sheet मध्ये दिसून येणार नाही.यासाठी सर्व विद्यार्थी student पोर्टल मध्ये नोंद करणे गरजेच्घे आहे हे लक्षात घ्यावे.*

५) *जे student आपण out of school केलेले आहे किंवा not known तुकडी मध्ये टाकलेले आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव देखील excel sheet मध्ये दिसून येईल.*

६) *मिळालेले गुण हे एक अंकी असेल तर अशा गुणाची नोंद ही एक अंकीच करावी.म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याला ९ गुण मिळालेले असेल तर अशा गुणांची नोंद ही 09 अशी न करता फक्त 9 अशीच करावी.*

७) *माहिती भरून पूर्ण केल्यावर आणि सदर माहिती upload केल्यानंतर असे लक्षात आले की माहिती भरताना चूक झालेली आहे अशा वेळी सदर sheet पुन्हा भरून पुन्हा नव्याने upload करू शकाल.अशा वेळी आगोदर भरलेली माहिती निघून जाऊन नव्याने भरलेली माहिती त्या ऐवजी save होईल याची नोंद होईल.*

   यानंतर सदर sheet ही save as करून घ्यावी.save as करताना ही शीट other format मधील  .csv (comaa delimited) या format मध्ये save करावी.

*सदर file save करताना file name मध्ये त्या file चे नाव बदलवू नये.अन्यथा सदर file ही system ला upload होणार नाही.*

   आता आपण विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद ही सदर file मध्ये केलेली आहे.ही file आपण आपल्या login मध्ये दिलेल्या सुविधेचा उपयोग करून upload करणार आहोत.यासाठी मुख्याध्यापक आपले student पोर्टल मध्ये login करतील.login केल्यावर excel tab मधील upload baseline and summative १ या बटनावर क्लिक करतील.

excel tab मधील upload baseline and summative १ या बटनावर क्लिक केल्यावर आपणास एक स्क्रीन पहावयास मिळेल.

   या स्क्रीन मधील browse या बटनावर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांची गुणांची नोंद केलेली .csv (comaa delimited) या format मधील file जी आताच आपण save केलेली आहेत ती file select करावी आणि open या बटनावर क्लिक करावे.

  अशा प्रकारे आपण सदर file browse या बटणाचा वापर करून select करावी.यानंतर browse या बटणाच्या समोर सदर file चे नाव दिसून येते.

  यानंतर आपण upload step – १ या बटनावर क्लिक करावे.या बटनावर क्लिक केल्यावर जर आपण excel sheet मध्ये नभरलेली माहिती ही योग्य प्रकारे भरलेली असेल तर आपणास पुढील प्रकारची नोटीफिकेशन स्क्रीन वर आलेली दिसून येईल.अशा प्रकारे  upload-step १ completed, please click on upload step २ अशा अर्थाची नोटीफिकेशन स्क्रीन वर आपणास दिसून येईल.या नोटीकेशन ला ok केल्यावर आपणास खाली आपण नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि गुणांची माहिती दिसून येईल.तसेच आपण माहिती भरताना काही चुक झालेली असेल तर याच स्क्रीन वर तसा error देखील दाखवण्यात येतो.

  वरील स्क्रीन वर असलेल्या upload २ या बटनावर क्लिक करावे. या बटनावर क्लिक केल्यावर आपणास data uploaded successfully अशा नोटीफिकेशनची स्क्रीन दिसून येईल.

  अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या पायाभूत आणि संकलीत परीक्षांच्या गुणांची नोंद सरल student पोर्टल मध्ये नोंद्वावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.सदर माहिती नोंद केल्यावर आपण ही माहिती व्यवस्थितपणे नोंदवली गेली अथवा नाही हे पहाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर माहिती तपासून पाहण्यासाठी आपण report या tab मधील Baseline & summative १ या बटनावर क्लिक करावे.

या बटनावर क्लिक केल्यावर एक स्क्रीन आपणास पहावयास मिळेल.

  या स्क्रीन मध्ये आपणास कोणत्या परीक्षेचा report बघावयाचा आहे त्यानुसार report पहाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याप्रमाणे आपण आपल्या शाळेचा वर्ग/तुकडी निहाय report तपासून पाहू शकाल.

To download manual click below


 To see the video tutorial click below link
DONT FORGET TO LEAVE COMMENT

SHARE TO ALL

No comments:

Post a Comment