आदर्श परिपाठ
प्राथमिक शाळेतील इ.1 ली ते 8 वी च्या विदयार्थ्याचे प्रत्येक दिवशी 5 -6
विदयार्थ्याचे इयत्तेनुसार गप्रत्येक विदयार्थ्याकडे परिपाठातील विशिष्ट घटकाची जबाबदारी सोपवावी.आठवडयातील 6 वार वर्गवार विभागून दयावेत.
उदा. सोमवार -8 वी
मंगळवार - 7 वी
आपणांस परिपाठासाठी 30 मिनीटे वेळ असल्याने पुढीलप्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा..
संचालन करणा-या विदयार्थ्याने इतर विदयार्थ्यांना सूचना कराव्यात
सावधान स्थितीमध्ये 52 सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येइल असा प्रयत्न करावा.शक्य झाल्यास साउंडद़वारे राष्ट्रगीत घ्यावे.
आठवडयात 5 दिवस शाळा भरते .एक दिवस मराठी भाषेत दुस-या दिवशी हिंदी व तिस-या दिवशी इंग्रजीत प्रतिज्ञा घ्यावी व पुन्हा उरलेल्या तीन दिवसात मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी किंवा सलग दोन दिवस एका भाषेतूनही प्रतिज्ञा घेता यईल.विदयार्थ्यांचा स्तर पाहूनही बदल करता येईल
( उदा. 7 वी 8 वी - इंग्रजी,5 वी 6वी -हिंदी,3 री 4 थी - मराठी)
परिपाठातील एका विदयार्थ्याला संविधान पुढे म्हणण्यास सांगणे व बाकीचे विदयार्थी मागे म्हणतील.याही ठिकाणी शक्य असल्यास मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेतून संविधान घेता
येवू शकते.
ठरलेल्या 6 वारानूसार विदयार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे, प्रार्थना या विशिष्ट धर्माच्या असू नयेत,ज्यातून मानवता,दया,त्याग अशा गुणांची रूजवण
होईल अशा असाव्यात.
केव्हा दिवस उगवतो,केव्हा दिवस मावळतो,
कोणता वार कोणती तारीख आहे.
अनेकवाईट विचारांना नष्ट करू शकतो म्हणून
आजचा सुविचार घेवून येत आहे--........
संबधित विदयार्थ्याचे नाव घ्यावे.
चला जाणून घेवूया ,आजच्या दिवशी इतिहासात काय घडले ते सांगत आहे .....(विदयार्थ्याचे नाव )
कमी शब्दात जास्त अर्थ सांगणारी आजची म्हण
घेवून येत आहे .......विदयार्थ्याचे नाव ,त्यानंतर एक वाक्प्रचार अर्थासह सांगावा व त्याचा वाक्यात उपयोग करून दाखविण्याची संधी समोर उपस्थित विदयार्थ्यांनादयावी.
जगाच्या कानाकोच-यात दररोज काहीतरी घडत
असते अशाच आजच्या बातम्या घेवून येत आहे
.........संबधित विदयार्थ्याचे नाव
आठवडयातील 6 दिवस वेवेगळी गीते घ्यावीत
त्यात एखादे स्फूर्तीगीतही असावे,सर्व विदयार्थ्यांनी मिळून समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे. mp3 फॉरमॅटमधील गीते माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
आजची बोधकथा घेवून येत आहे .....संबधित
विदयार्थ्याचे नाव घेणे.सुंदर व वाचणीय बोधकथा खालील ब्लॉगवर उपलब्ध आहेत.
आजची प्रश्नमंजुषा घेवून येत आहे .....
........संबधित विदयार्थ्याचे नाव घ्यावे,
सोपे 5 सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारावे ,ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित
प्रश्न विचारले तर चांगले
समाजात अनेक समज-गैरसमज असतात,
त्यामुळे अंधश्रद़धा पसरतात,म्हणून घटनांचे वैज्ञानिक कारण स्पष्ट करावे.शिक्षकांनी मार्गदर्शन केले तरी चालेल.
आजचे इंग्रजी शब्दार्थ घेवून येत आहे .....
............संबधित विदयार्थ्याचे नाव
(सोपे 5 इंग्रजी शब्दार्थ विदयार्थ्यांना विचारावेत)
आजचा पाढा घेवून येत आहे.....
.........संबधित विदयार्थ्याचे नाव
( प्रतिदिन 2 ते 31 पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावे.)
स्वत:चा जन्मदिवस स्वत:साठी खास असतो,
तर असे आजचा दिवस खास बनविणारे आहेत...
.....वाढदिवस असणा-या विदयार्थी/विदयार्थीनींचे नाव शिक्षकाने घ्यावे व फुल किंवा पंष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करावे.
बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ,
हात गुडघ्यावर सरळ ठेवून दोन्ही डोळे मिटवून व सरळ बसून समूहाने पसायदान घ्यावे.
2 मिनीटे शंत अचस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
विदयार्थ्यांनी तीन टाळया वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.
★★★★★★★★★★★★★★★★★
ह्या फोल्डर मध्ये आपणास आवश्यक असणारे गीते जसे कि - राष्ट्रगीत,प्रतिज्ञा,प्रार्थना, समूह गीत,संविधान गीत इत्यादींची mp3 फाइल्स मिळतील
ह्या फोल्डर मध्ये आपणास 100 हुन अधिक लहान मुलासाठी बोधात्मक कथा संग्रह मिळेल.आपण ह्या गोष्टी मुलांना परिपाठ वेळेला किंवा वर्गात अध्यापन करतांना एकवू शकता
<<[DOWNLOAD]>>
<<[डाउनलोड]>>
★★★★★★★★★★★★★★★★★
ह्या ठिकाणी आपणास विविध सुविचारांचा संग्रह मिळेल त्या मध्ये मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे सुविचार PDF मध्ये मिळतील
<<【मराठी सुविचार संग्रह】>>
<<【हिंदी सुविचार संग्रह】>>
<<【इंग्रजी सुविचार संग्रह】>>
★★★★★★★★★★★★★★★★★
No comments:
Post a Comment