THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 31 December 2017

HOW TO MAKE BLOG

HOW TO MAKE BLOG

HOW TO MAKE BLOG 

१) आपल्या वेब ब्राऊजर सुरू करून www.blogger.com वर जा.
२) जर आपले गुगल अकांऊट नसेल (म्हणजे आपण gmail  वैगरे गुगलच्या सुविधा वापरत नसाल तर)  सर्वप्रथम ते तयार करा.
       अ) त्यासाठी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उजव्या कोपर्‍यातील SIGN UP बटणावर क्लिक करा.

       ब) खाली दर्शवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा.
३) जर तुमचे गुगल अकाऊंट असेल तर तुम्ही ते वापरून साइन इन करू शकतात. नवीन अकाऊंट तयार    करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साईन इन करा.



४) त्यानंतर खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे "Back to Blogger" या बटणावर क्लिक करा.


५) आता खाली दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जर Google+ प्रोफाइल तयार करायची असल्यास "Create a Google+ profile" बटणावर क्लिक करा, अन्यथा केवळ "Create a Limited Blogger profile"  या बटणावर   क्लिक करून तुमचे Display name टाका आणि "Continue to Blogger" या बटणावर क्लिक करा.


६) आता नवीन पृष्ठ उघडेल. येथे उजव्या कोपर्‍यात "New Blog" या बटणावर क्लिक करा.




७)  त्यानंतर एक पॉप अप विंडो उघडेल. त्यात तुमच्या ब्लॉगचे नाव ( खालील आकृतीत 'Example Blog' ), वेब अ‍ॅड्रेस (खालील आकृतीत 'mr-exblog.blogspot.com' ) आणि तुम्हाला आवडणारी टेंम्प्लेट निवडा. टेंम्प्लेट म्हणजे तुमच्या ब्लॉगचा दर्शनीय अवतार. सविस्तर पुढे बघूच. आता 'Create Blog!' या बटणावर क्लिक करा. येथे भरलेली माहिती व निवडलेली टेंम्प्लेट तुम्ही नंतर केव्हाही बदलू शकता


.
८) आता तुमचा नवीन ब्लॉग तयार झालेला आहे. ब्लॉगवर लिहण्यासाठी खाली दाखविल्याप्रमाणे 'Start Posting' वर क्लिक करा.

९) आता तुम्ही ब्लॉगवर लिहू शकतात. त्यासाठी पोस्टला शीर्षक द्या आणि मजकूर लिहा. जर लिहणे पूर्ण झाले असेल तर Publish बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर दिसेल.  नाहीतर  पोस्ट अर्धवट असल्यास save बटणावर क्लिक करा म्हणजे ती पोस्ट तुमच्या ब्लॉगवर न दिसता जतन केली जाईल. नवीन पोस्टबद्दल सविस्तर नंतर बघूच.


१०) तुमच्या ब्लॉग संबधीत माहिती (पोस्ट्स, स्टॅट्स, सेटिंग्स, इ.) पाहण्यासाठी ब्लॉगच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर खाली पृष्ठ उघडेल.

 ११) आता तुमचा ब्लॉग पाहण्यासाठी "View Blog" बटणावर क्लिक करा.
बस काम फत्ते!

एका गुगल अकाऊंटवर तुम्ही जास्तीत जास्त १०० ब्लॉग्ज बनवू शकता. प्रत्येक ब्लॉगसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही.

CLICK HERE FOR PPT 
सौजन्य - श्री उमेश उघडे सर

VIDEO बघण्यासाठी खाली क्लिक करा
सौजन्य - tech मराठी












पुढील पोस्ट लवकरच प्रसिद्ध होईल

Till stay tuned..........

No comments:

Post a Comment