THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 31 December 2017

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासतंत्र -विशेष माहिती

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासतंत्र -विशेष माहिती

अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?
††††††††††††††††††

आताच्या काळात अभ्यासाचं तंत्र मुलांना व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. बरेच पालक आपल्या पाल्यांना प्रश्नोत्तरे पाठ करायला सांगतात. पुढे जाऊन घोकंपट्टीची सवय घातक पडू शकते. पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लक्षात राहत नाही. तिथे विषयाचा आवका मोठा असतो. त्यामुळे विषय समजावून घेणं, विषयातील महत्त्वाच्या मुद्यांसाठी पेन्सिलनं अधोरेखित करणं, महत्त्वाच्या मुद्याचे टिपण तयार करणं तसेच त्याचे उपयोजन करणं, या गोष्टी अभ्यासाच्या तंत्राच्या दृष्टीनं उपयोगी ठरतात. अभ्यासाच्या तंत्राची सवय लहानपणापासून लागली, तर महाविद्यालयात विषयाच्या नोटस् स्वत: काढता येतात. गाईड वाचण्याऐवजी स्वतच्या नोटस् चांगल्या लक्षात राहतात. गाईडमध्ये प्रश्नांची उत्तरांची पुनरावृत्ती झालेली असते. पाठय़पुस्तकाच्या तुलनेत गाईड वाचायला वेळही जास्त लागतो. पाठय़पुस्तक वाचनाची सवय झाल्यावर पाठय़पुस्तक वाचायला कमी वेळ लागतो.
अभ्यासाचे तंत्र कसे विकसित कराल ?

➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣
१) शाळेत नवीन धडा शिकवण्यापूर्वी मुलांना वाचायला सांगा.
२) धडा शिकवून झाल्यावर शिक्षकांना प्रश्न विचारून शंकेचे निरसन करणं गरजेचं आहे. याबद्दल मुलांशी बोला.
३) घरी पुन्हा धडा वाचायला सांगा.
४) त्यानंतर महत्त्वाच्या मुद्यांच्या नोटस् तयार करायला सांगा.
५) परीक्षेच्या वेळी स्वतच्या नोटस् वाचण्याकडे मुलांचा कल हवा.
६) प्रश्न-उत्तराचा सराव करताना लिहून काढायला सांगा.
७) लिहिलेले दीर्घकाळ स्मरणात राहते.
अभ्यास करताना पिक्चर ज्या आवडीनं पाहतो, त्या आवडीनं झोकून देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे.
हे स्वानुभवाचे बोल आहेत. माझ्या मुलांनी अभ्यासक्रमासाठी ही पद्धत अनुसरली होती. त्यामुळे नोकरीला लागल्यावर शालेय पाठय़पुस्तकातील अभ्यास त्याच्या मनात ताजा आहे. अभ्यास करताना पालकांनी टीव्ही बंद करून पाल्याजवळ बसलं म्हणजे त्यांची एकाग्रता साधली जाते. बराच वेळ आई-वडील आपला अभ्यास घेतात. ही भावनिक सुरक्षितता पाल्यासाठी यशदायी ठरते.
– प्रा. कुंदा कुलकर्णी, नाशिक

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★


अभ्यासाच्या माध्यमातून गुणसंवर्धन


अभ्यास करतांना स्वतःमध्ये गुण कसे येऊ शकतात किंवा असलेले गुण कसे वाढू शकतात, यांसंबंधी लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहे.
व्यावहारिक गुण कसे अंगी येतात ?

शिक्षक उपयोगी BEST EXCEL SOFTWARE साठी -
<<<【 क्लीक करा 】>>>
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
 शिवाजी महाराज जयंती - संपूर्ण माहिती 

_____________________________________________
    ◆◆◆गणिताचे धडे ◆◆◆
                  【  इयत्ता 1 ली ते 12 वी  】

अ. व्यवस्थितपणा : वह्या-पुस्तके ठरलेल्या ठिकाणी ठेवल्यास व्यवस्थितपणा हा गुण येतो.
आ. चांगली सवय लागणे : जसा नामजप प्रतिदिन केल्यावर त्याची सवय लागते, तसा अभ्यास प्रतिदिन केल्यावर त्याचीसुद्धा सवय लागते.
इ. एकाग्रता : बराच वेळ एका ठिकाणी बसून अभ्यास केल्यावर एकाग्रता वाढते.
ई. चिकाटी : प्रतिदिन अभ्यास केल्यावर चिकाटी वाढते.
उ. संयम : अभ्यास भरपूर असेल, तेव्हा धीर न सोडता तो पूर्ण कसा करावयाचा, हे शिकायला मिळते. यातून संयम वाढतो.
ऊ. प्रामाणिकपणा : परीक्षेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर नीट येत नसल्यास, ते दुसर्‍याचे न बघता (‘कॉपी’ न करता) स्वतःला येते, तेवढेच लिहिण्याने प्रामाणिकपणा विकसित होतो.

बौद्धिक गुण कसे अंगी येतात ?

अ. नियोजनबद्धता : अभ्यासाचे नियोजन केल्यास किती दिवसांत, किती घंटे (तास) अभ्यास केल्यावर विषय पूर्ण होईल, हे कळते. यामुळे नियोजन करण्याची सवय लागते.
आ. निर्णयक्षमता वाढणे : दोन महत्त्वाच्या विषयांत कुठला विषय जास्त महत्त्वाचा आहे, हे ठरवावे लागते आणि त्यानुसार अभ्यासाला प्राधान्य द्यावे लागते. यामुळे निर्णयक्षमता वाढते.
इ. पूर्वसिद्धता करणे : आधीपासूनच सर्व प्रकारची सिद्धता (तयारी) केली, तर परीक्षेच्या वेळी ताण येत नाही, हे समजल्याने कोणत्याही कामासाठी पूर्वसिद्धता करण्याची सवय लागते.
ई. वेळेचे महत्त्व समजणे : उत्तरपत्रिका लिहितांना वेळ किती महत्त्वाचा आहे आणि काही मिनिटेसुद्धा कशी महत्त्वाची आहेत, हे कळते.
आध्यात्मिक गुण कसे अंगी येतात ?
अ. जिज्ञासूवृत्ती वाढणे : प्रत्येक विषयात पुढचे पुढचे शिकायला मिळते आणि जिज्ञासाही वाढते.
आ. विचारून घेण्याची सवय लागणे : एखादे सूत्र न कळल्यास ते शिक्षकांना विचारावे लागते.
इ. तत्परता : मनात आलेली शंका शिक्षकांना तत्परतेने विचारायला शिकतो.
ई. इतरांकडे लक्ष न देणे : एखादा प्रश्न किंवा शंका वर्गात शिक्षकांना विचारल्यास इतर विद्यार्थी हसतील, हे ठाऊक असूनही शंकानिरसन करून घ्यावे लागते.
उ. उत्साह वाढणे : प्रतिदिन नवीन शिकायला मिळाल्यामुळे उत्साह वाढतो.
ऊ. सातत्य : शाळेत / महाविद्यालयात प्रतिदिन जाणे आणि प्रतिदिन अभ्यास करणे, यांमुळे त्यात सातत्य येते.
ए. तळमळ वाढणे : एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर त्याचे उत्तर मिळवण्याची तळमळ वाढते.
ऐ. स्वभावदोष-निर्मूलन : उत्तरपत्रिका पडताळल्यावर (तपासल्यावर) शिक्षक चुका सांगतात, त्यामुळे स्वभावदोष (उदा. घाई करणे) कळतात आणि त्यांचे निर्मूलन करण्याची संधी मिळते.
ओ. अहं-निर्मूलन : गुण अल्प (कमी) मिळाल्यावर आपोआप अहं-निर्मूलन होते. मित्र / मैत्रीण यांना एखादा प्रश्न विचारल्यास त्यांनी ‘एवढेही तुला येत नाही’, असे म्हटल्यावर अहं-निर्मूलन होते.
औ. मनाविरुद्ध कार्य करणे : अभ्यासाची इच्छा नसतांना अभ्यास करण्यास बसल्यावर मनोलय होण्यास साहाय्य होते. विषय आवडता असो कि नावडता त्याचा अभ्यास करावाच लागतो; म्हणून आवड-नावड घटते.
अं. दुसर्‍यांचे साहाय्य घेणे आणि त्यांना साहाय्य करणे : एखादे कठीण गणित न कळल्यास अन्य विद्याथ्र्यांना विचारावे लागते, तसेच त्यांनाही एखादे गणित न कळल्यास साहाय्य करावे लागते.
क. तळमळीने प्रार्थना करणे : एखादा विषय जास्त अवघड असला, तर ईश्वराला ‘मला खरंच काही येत नाही, तू साहाय्य कर’, अशी तळमळीने प्रार्थना होते.
ख. अंतर्मुखता येणे : अन्य विद्यार्थी जेव्हा जास्त गुण मिळवतो, तेव्हा ‘मी कुठे मागे (कमी) पडलो’, याविषयी अंतर्मुखतेने विचार होतो.
ग. कृतज्ञता वाढणे : परीक्षेत अभ्यास केलेल्या भागावरच प्रश्न येतात, तेव्हा ईश्वराप्रती कृतज्ञता वाटते.
घ. त्याग : अभ्यासाच्या दिवसांत पाहुणे आल्यास त्यांच्यासमवेत बाहेर फिरायला जाता येत नाही, त्या प्रसंगी त्याग शिकतो.
च. आनंद मिळणे : अभ्यास मनापासून केला की, समाधान आणि आनंद मिळतो.

हे ईश्वरा, अभ्यास ही एक सत्सेवाच आहे, हे शिकवलेस आणि तसे केल्यास त्यातून विकसित होणारे गुणही दाखवून दिलेत, यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘हे सगळे गुण आम्हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये येऊ देत’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’ 


– कु. प्राजक्ता घोळे, चंदीगड
★★★★★★★★★★★★★★★★★★★★


अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी देवतांची चित्रे ठेवावीत


श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता / उपास्यदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते.
१. देवतांच्या चित्रांसमोर सात्त्विक उदबत्ती लावावी
उदबत्तीच्या सुगंधामुळे वातावरणाची आणि मनाची शुद्धी होते, तसेच वातावरणात ईश्वरी चैतन्य पसरून प्रसन्नता जाणवते. त्यामुळे मन उत्साही रहाते आणि मनाची एकाग्रताही टिकून रहाते.
२. प्रार्थना करावी
अ. अभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येशी संबंधित देवता श्री गणपति आणि श्री सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करावी, ‘अभ्यास चांगला होण्यासाठी मला बुद्धी द्या आणि मी करणार असलेल्या अभ्यासाचे मला नीट आकलन होऊ दे.’
आ. अभ्यास करतांना मध्ये मध्ये कुलदेवतेला / उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, ‘माझा अभ्यास एकाग्रतेने होऊ दे.’
इ. अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी दहा मिनिटे नामजप करावा : प्रार्थनेनंतर अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी १० मिनिटे कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !

मुलांनो, आपण पहातो की, दोन मुले सारखीच बुद्धीमान (हुशार) असली, तरीसुद्धा त्यापैकी एकाला चांगले गुण मिळतात, तर दुसर्‍याला अल्प. अभ्यासात मिळणारे यश हे बर्‍याचदाअभ्यास करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. पुढील लेखात याविषयीची काही सूत्रे दिली आहेत, ती अवश्य अभ्यासा !
अ. प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा : ‘ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे किंवा जी कला शिकावयाची आहे, तिचे महत्त्व आणि लाभ समजून घ्यावेत. त्यानंतर अभ्यासास प्रारंभ करावा. आवडीने आणि मनापासून अभ्यास केल्यामुळे विषयाचे आकलन लवकर होते.’ – कु. मधुरा भोसले
आ. सकाळची वेळ शांत असते, तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्ही तरतरीत असतात; म्हणून या वेळी अवघड वाटणार्‍या विषयाचा अभ्यास करावा. जो विषय समजत नाही किंवा अवघड वाटतो, त्या विषयास अधिक वेळ द्यावा. तो विषय किंवा ती प्रश्नोत्तरे दोन-तीन वेळा वाचावीत. नंतर त्यावर वर्गातील बुद्धीमान विद्यार्थी आणि त्या विषयाचे शिक्षकयांच्याशी चर्चा करावी.
इ. अभ्यासातील समजलेल्या सूत्रांवर (मुद्यांवर) चिंतन करून ती सूत्रे स्वतःच्या भाषेत लिहून काढावीत. यासाठी प्रथम एखादा परिच्छेद वाचून १-२ ओळींत त्यातील महत्त्वाची सूत्रे लिहिण्याची सवय लावून घ्यावी. नंतर संपूर्ण धड्यातीलच मुख्य सूत्रे लिहून काढावीत.
ई. एखाद्या विषयावर साधारणपणे ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मन एकाग्र करणे अवघड असते. त्यामुळे मध्ये मध्ये थोडा वेळ विश्रांती घ्यावी. विश्रांतीच्या काळात ५ मिनिटे प्रार्थना आणिनामजप करावा.
उ. वाचनानंतर लेखन, लेखनानंतर वाचन किंवा पाठांतर, पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास करावा.
वरील सूत्रे लवकरात लवकर आचरणात आणून उज्वल यशाकडे वाटचाल करूया !

संदर्भ: सनातन-निर्मित-ग्रंथ ' अभ्यास कसा करावा? '
★★★★★★★★★★★★★★★★★★★★

मुलांनो, केवळ ‘परीक्षार्थी’ न बनता खर्‍या अर्थाने विद्यार्थी व्हा !

आजकाल केवळ एका इयत्तेतून दुसर्‍या इयत्तेत जाण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, त्याला ‘अभ्यास’ म्हटले जाते. असा अभ्यास ही केवळ परीक्षेची सिद्धता (तयारी) असते; कारण परीक्षा झाल्यावर कालांतराने त्या विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारल्यास मुलांना उत्तरे देता येत नाहीत. यामुळे ‘विद्यार्थी’ बनण्यापेक्षा मुले नकळतपणे ‘परीक्षार्थी’ बनतात.
अ. मुलांनो, केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, हे तुमचे ध्येय नसावे, तर मिळवलेल्या विद्येतून (ज्ञानातून) मोठेपणी विद्यादान करता यावे, मिळवलेली विद्या राष्ट्राच्या उपयोगी पडावी, असे अभ्यास करण्यामागचे तुमचे उद्देश असावेत. राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर, तसेच धर्मासाठी जीवन वेचणारे स्वामी विवेकानंद यांची चरित्रे अभ्यासल्यास हे लक्षात येईल.
आ. एखाद्या विषयाचा अभ्यास करणे, म्हणजे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी त्या विषयाचे वाचन करणे, असे नसून तो विषय समजून घेऊन स्वतः कृतीत आणणे होय. पुढील दोन उदाहरणांवरून हे अधिक लक्षात येईल.
नागरिकशास्त्रात सांगितलेले असते की, डाव्या अंगाने (बाजूने) वाहन चालवावे. प्रत्यक्ष जीवनातही तुम्ही सायकल नेहमीच डाव्या अंगाने चालवली पाहिजे.
विज्ञान सांगते, ‘उघड्यावरचे अन्नपदार्थ प्रकृतीला हानीकारक असतात.’ सहलीला गेल्यावरही या ज्ञानाची आठवण ठेवावी आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
मनातील परीक्षेची भीती किंवा चिंता कशी घालवाल ?
मुलांनो, परीक्षा जवळ आली की, तुमच्यापैकी अनेकांच्या पोटात गोळा येतो. काहीजण तर चक्क आजारी पडतात. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
१. स्वतःविषयी नकारात्मक विचार करू नये, उदा. मला गणिते सोडवता येणार नाहीत. उत्तरपत्रिका लिहितांना मला काहीच आठवणार नाही इत्यादी. असे नकारात्मक विचार मनात आल्यास ते लिहून काढावेत आणि त्यांविषयी आई-वडिलांशी, मोठ्या भावाशी किंवा शिक्षकांशी चर्चा करावी.
२. स्वतःची क्षमता समजून घ्यावी. त्याला एवढे गुण मिळाले, म्हणजे मलाही तेवढेच मिळाले पाहिजेत, अशी इतरांशी तुलना करू नये.
३. परीक्षेत मिळणारे गुण म्हणजेच सर्वस्व, असे समजू नये.
४. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो.
५. काही दिवस आधीपासून परीक्षेच्या प्रसंगाचा सराव करावा : ‘प्रसंगाचा सराव करणे’, ही ताण येणे, भीती वाटणे यांसारखे स्वभावदोष दूर करण्यासाठी उपयोगात आणावयाची मानसोपचार पद्धत आहे. यामध्ये आपल्याला सर्व जमते, अशी कल्पना करून त्याप्रमाणे मनाला सांगायचे असते.
६. परीक्षेला जाण्यापूर्वी मारामारी, हत्या आदी प्रसंग असलेले चित्रपट पाहू नयेत. त्यामुळे आपले मन दूषित होते. आपण त्या प्रसंगांचा विचार करत रहातो. त्यामुळे मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. शक्यतो आनंदाचे क्षण आठवावेत.
७. परीक्षेला जाण्यापूर्वी घरचेच अन्नपदार्थ ग्रहण करावेत; कारण अन्न बनवणार्‍या व्यक्तीच्या मनातल्या विचारांचा परिणाम अन्नावर होतो आणि हे अन्न सेवन केल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. बाहेरचे अन्न हे व्यावसायिक हेतूने बनवलेले असते, तर घरच्यांनी आपल्यावरच्या प्रेमापोटी ते बनवल्यामुळे ते सात्त्विक असते.
मुलांनो, वरीलपैकी प्रत्येक गोष्ट तुमच्या आवाक्यातील आहे ना ? मग परीक्षेचा ताण कशाला घ्यायचा ? ते सगळे आता विसरा आणि परीक्षेला आनंदाने सामोरे जा !’

– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल

वरील लेखात शालेय परीक्षेचे उदाहरण दिले आहे, हाच नियम थोड्या-फार भेदाने इतर स्पर्धात्मक परीक्षांनाही लागू होतो.

संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ‘ अभ्यास कसा करावा? ‘

★★★★★★★★★★★★★★★★★★★★


विद्यार्थी मित्रहो, रात्रीच्या जागरणाऐवजी पहाटे उठून अभ्यास करा !


विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रात्री जागरण करून अभ्यास करायची सवय आहे का? तुम्ही कधी पहाटे उठून अभ्यास केला आहे का ?
मित्रांनो, लक्षात घ्या, रात्री अभ्यास करण्यासाठी जेवढी मनाची, बुद्धीची आणि शरीराची शक्ती खर्च होते, त्यापेक्षा अत्यल्प शक्ती पहाटे अभ्यास करतांना खर्च होते! त्यामुळे अतिशय अल्प वेळात तुमचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे अभ्यास हा पहाटेच्या वेळी होऊ शकतो. उदाहरणार्थ एखादा भाग वाचून लक्षात ठेवायचा असेल आणि रात्री तुम्ही हा प्रयत्न करत असाल, तर जो वेळ आणि शक्ती लागेल त्यापेक्षा खूप कमी वेळ आणि शक्ती पहाटेच्या वेळी लागेल ! त्यामुळे पहाटे केलेला अभ्यास अधिक चांगला लक्षात रहातो.
याचे कारण पहाटे वातावरणात सात्त्विकता अधिक असते. त्यामुळे आपले मन, शरीर आणि बुद्धी यांवर रज-तमाचे आवरण अत्यल्प असते. रात्री वातावरणात तमोगुण वाढलेला असतो, त्याचा परिणाम आपले मन, शरीर आणि बुद्धी यांवर होऊन त्यांची सात्त्विकता कमी होते. आपण जेवढे अधिक सात्त्विक असतो, तेवढी आपली ग्रहण आणि आकलन क्षमता अधिक असते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत.
दिवसभर आपण विविध कृती आणि विचार करत असतो. त्यामुळे या कृती आणि विचार यांमुळे मन, शरीर आणि बुद्धी थकलेले असतात आणि त्यांच्यावर ताण आलेला असतो. पहाटेच्या वेळी रात्रीच्या विश्रांतीमुळे हा ताण दूर झालेला असतो.
पहाटेच्या वेळी वातावरण सात्त्विक असण्यामागचे कारण म्हणजे जगाने त्याचे व्यवहार चालू केलेले नसतात, त्या वेळी हिमालयातील अज्ञात ऋषीमुनी, तसेच संत आणि साधक त्यांची साधना करत असतात. त्याच्या सात्त्विक लहरी वातावरणात पसरतात. रज-तम अल्प असल्याने त्या लहरी आपण ग्रहण करू शकतो. अनेक प्रसिद्ध गायकही पहाटे उठून गायनाचा सराव करत असल्याचे तुम्ही ऐकले असेल.
पहाटेच्या वेळी आपल्या शरिरातील वात, कफ इत्यादी पदार्थ उत्सर्जित होण्याची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे शक्य होत असल्याने उत्साह वाढतो. 
 ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य, धनसंपत्ती मिळे ।’, असे म्हटले आहे. 
म्हणून मुलांनो लवकर निजा आणि लवकर उठा आणि अभ्यासातील एकाग्रता साधून यशाचे धनी व्हा!

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
कॉपी’ हा शिक्षणक्षेत्राला प्रदीर्घ काळ लागलेला ‘कर्करोग’

वार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो. पेपरच्या वेळी ‘कॉपी’ करतांना विद्यार्थी पकडला गेल्यास काहींचे वर्ष फुकट जाते, तर काहींचे जीवन उद्ध्वस्त होते. व्यावहारिक दृष्टीने ही कुप्रथा म्हणजे भ्रष्टाचार ! या भ्रष्टाचाराचा वेध घेणारा लेख…१. शिक्षणक्षेत्रात कॉपी ही केवळ दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये होते, असे नसून कायद्याच्या परीक्षेतसुद्धा होत असणे, म्हणजे कायद्याच्या रखवालदारांकडूनच चौर्यकर्म होत असणे : ‘कॉपी हा शिक्षणक्षेत्राला प्रदीर्घ काळ लागलेला असा ‘कर्करोग’ असल्याचे सांगितले जाते. खरे तर आपल्या शिक्षणक्षेत्राला आता इतके असाध्य रोग जडलेले आहेत की, त्या रोगांच्या पुढे कॉपीसारखा रोग हा सर्दी- पडशासारखा वाटावा, अशी अवस्था आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हेही तितकेच खरे आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी होते, असे नाही, तर अलीकडे ती चक्क कायद्याच्या परीक्षेतसुद्धा होत असल्याचे आढळून येते, म्हणजे ‘उद्या जे कायद्याचे रखवालदार होणार, तेच आज हे चौर्यकर्म करत आहेत’, असा त्याचा उघड उघड अर्थ आहे.
२. ग्रामीण भागात शाळांचा पट टिकवून ठेवण्यासाठी संस्था-चालक आणि शिक्षक यांची परीक्षार्थीना फूस असणे आणि तसे पोषक वातावरण त्यांना सिद्ध करून दिले जाणे : ग्रामीण भागात शाळांचा पट टिकवून ठेवण्यासाठी संस्था-चालक आणि शिक्षक यांची परीक्षार्थीना फूस असते आणि तसे पोषक वातावरणही त्यांना सिद्ध करून दिले जाते. अनेक निब्बर बनून गेलेल्या पालकांना हे हवे असते; कारण त्यांना त्यांचा बाळ्या अथवा बाळी परीक्षेच्या मांडवाखालून कोणत्याही कटकटीविना (सहीसलामत) बाहेर पडणे आवश्यक वाटत असते. अशा वेळी संबंधित सारेच घटक कातडी बचावू धोरण स्वीकारून, मूग गिळून गप्प रहाणेच पसंत करतात. मुख्याध्यापकाला आपली आसंदी टिकवायची असते आणि संस्था-चालकांना शाळा चालवायची असते. बहुतांशी शिक्षक हे आपल्या अशा वरिष्ठांचीच री ओढणारे असल्याने कॉपीचा प्रसार होण्यास विलंब लागत नाही. काही काही केंद्रांवर तर अशा अघोषित कॉपी प्रकारांना एवढा ऊत येत असतो की, कॉपी न करता सरळ मार्गाने उत्तीर्ण होऊ पहाणार्‍या असंख्य परीक्षार्थींना याचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यातून मनस्तापसुद्धा होत असतो. आता हे सारे गृहित धरूनच परीक्षेला त्यांना सामोरे जावे लागत असते.
३. कॉपी करणारा परीक्षार्थी एवढा एकच घटक या रोगाचे मूळ नसून असंख्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटक त्यात गुंतलेले असणे : अशा वेळी आपण संबंधित मंडळींना कायद्याची भीती दाखवून कितपत नमवू शकणार आहोत आणि कॉपीचा समूळ नायनाट कसा काय करणार आहोत, असा तो गुंतागुंतीचा प्रश्न आहे. म्हणजेच कॉपी करणारा उमेदवार अगोदर त्याकरिता सिद्ध होतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष कॉपी करण्यास सरावतो. यातूनच कॉपी करणार्‍यांची संख्या बळावते आणि पर्यवेक्षकांना धमक्या देणे, शिवीगाळ करणे असले अश्लाघ्य प्रकार चालू होतात. मग सरळमार्गी शिक्षक या कामातून सुटका करून घेण्याकरता खटाटोप करू लागतात आणि आपसूकच कॉपीखोरांना मोकळे रान मिळते. त्यामुळे कॉपी करणारा परीक्षार्थी एवढा एकच घटक या रोगाचे मूळ नसून असंख्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे घटक त्यात गुंतलेले असतात.
४. ‘तू अनुत्तीर्ण झालास, तरी चालेल; पण कॉपी करून उत्तीर्ण होता कामा नये’, असे खडसावून सांगणारे पालक आज दिसत नसणे आणि ‘कॉपी करणार नाही’, असा विचार विद्यार्थ्यांनी करण्यासाठी तशा संस्कारांचीआवश्यकता असणे : खरे तर ‘तू अनुत्तीर्ण झालास, तरी चालेल; पण कॉपी करून उत्तीर्ण होता कामा नये’, असे खडसावून सांगणारे पालक आज दिसेनासे झालेले आहेत. शिक्षक तर नाहीतच नाहीत. जे असतील ते अपवादात्मकच म्हणावे लागतील. तसे हे शिक्षकांचेच मानले, तर नैतिक दायित्व आहे. शिक्षकांनी जर परीक्षेची उत्तम सिद्धता करून घेऊन परीक्षार्थींना उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास प्राप्त करून दिला, तर कॉपीकडे मुले वळणार नाहीत. शिक्षकांचे शिकवणे त्या अर्थाने समाधानकारक असत नाही, असा याचा उघड उघड अर्थ आहे. ‘मी कॉपी करणार नाही’, असा आपल्या पाल्याचा आणि विद्यार्थ्यांचा मनोनिग्रह सिद्ध करून घेणे अन् यासाठी तशा संस्कारांची जोपासना करणे, हाच यातील महत्त्वाचा मार्ग आहे.’


– श्री. वैजनाथ महाजन (संदर्भ : दै. तरुण भारत, 
१६.१.२०११
★★★★★★★★★★★★★★★★★★★★
निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !
         काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत. आतातर प्रेमभंग, निराशा, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचे कडक बोलणे, एखादी गोष्ट मनासारखी न होणे आदी कारणांमुळेही विद्यार्थी सर्रास आत्महत्या करतात ! वर्ष २०१० च्या प्रारंभी ४३१ हून अधिक विध्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.
आत्महत्येचा विचार का अयोग्य ?
         ‘आत्महत्या करणे’, हा काही समस्येवरील उपाय नव्हे, उलट तो तर शुद्ध पळपुटेपणाच आहे. आत्महत्येचे विचार येणार्‍या मुलांनी पुढील विचार करावा. आत्महत्येसाठी केवळ एकच कारण असते, तर जगण्यासाठी अनेक कारणे असतात, उदा.
अ. मला माझ्या माता-पित्यांचे प्रेम अनुभवायचे आहे.
आ. मला मित्र-मैत्रिणींसमवेत खेळण्याचा आनंद लुटायचा आहे.
इ. माझ्या देशात अनेक सुंदर गोष्टी आहेत, त्या मला पहायच्या आहेत.
ई. मला आजूबाजूचे लोक आणि निसर्ग यांकडून नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत.
उ. जन्मदात्या आई-वडिलांना वृद्धपणी सांभाळण्याचे दायित्व (जबाबदारी) माझ्यावर आहे.
         छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांसारखे राष्ट्रपुरुष; तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांसारखे संत यांनाही अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. त्यांच्या तुलनेत स्वतःला होणारा त्रास किती आहे, याचा विचार करावा. आज भोगावे लागणारे दुःख काळाच्या ओघात नष्टसुद्धा होईल !
आत्महत्येवरचा खरा उपाय म्हणजे ‘साधना’ !
         विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे खरे कारण म्हणजे ‘मनाची दुर्बलता’. ध्यानधारणा, नामजप यांसारखी ‘साधना’ केल्यानेच मनोबल वाढून जीवनात स्थिरता येते. असा विद्यार्थी आत्महत्येच्या विचारावर सहज मात करतो.
अशा प्रकारचे प्रयोग निरनिराळ्या महाविद्यालयामधूनही केले गेले आहेत आणि त्यांना यामुळे अभ्यासात लाभ दिसून आला आहे. यासाठी मुलांनो, मनोबल वाढवण्यासाठी आजपासूनच साधनेला आरंभ करा !
संदर्भ : सनातन-निर्मित-ग्रंथ ‘ अभ्यास कसा करावा?
 ★★★★★★★★★★★★★★★★★★★★

No comments:

Post a Comment