मोबाईला बनवा माउस - विना इंटरनेट
"चला तंत्रस्नेही बनुया"च्या या भागात आपले स्वागत आहे.आज आपण मोबाईल फोनला माउस व किबोर्ड कस बनवता येईल? व संगणक/लॅपटॉप कसे हाताळता येईल ? ह्या विषयी जाणून घेणार आहोत.
शिक्षक मित्रानो आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शाळा डिजिटल झाल्या आहेत.सर्वानाच आज संगणक हाताळता येऊ लागले आहे.मोबाईलचा वापर पण आज डिजिटल शिकवणीचा भाग झाला आहे.
आपण आज नवीन प्रयोग करूया व मोबाइलाच माउस व कीबोर्ड बनुया अगदी सोप्या पद्धतीने.
"इंटरनेट ची मुळीच आवश्यकता नाही ते तुह्मी बंद करा."
मोबाईला माउस का बनवावे ?
आज आपण बघत आहोत की जवळपास सर्व व्यक्ती मोबाईल चा वापर करत आहेत.जेवढ्या गतीने व्यक्ती मोबाईल वर काम करतो तेवढ्या गतीने संगणकावर काम करत नाही.जसे की -संगणकाचा किबोर्ड व मोबाईलचा कीबोर्ड एकच आहे पण मोबाईल च्या कीबोर्ड वर व्यक्ती उत्तम प्रकारे व जलद गतीने काम करतो.म्हणूनच आपण मोबाईल ला माउस व कीबोर्ड बनुया व जलद गतीने काम करूया.

अतिशय महत्वाचे
१.मोबाइलमध्ये एक अँड्रॉइड अँप आवश्यक आहे तिचे नाव आहे "wifi mouse"Play store वरून अँप डाउनलोड करा.
२.संगणक/लॅपटॉपमध्ये एक सॉफ्टवेअर लोड करणे अवश्यक आहे.सॉफ्टवेअर चे नांव आहे "mouse server" अवघ्या दोन मिनिटातच सॉफ्टवेअर डाउनलोड होईल.
3.संगणक/लॅपटॉप मध्ये wifi असणे आवश्यक.
मोबाईला माउस व कीबोर्ड बनवण्याची पद्धत
1.सर्व प्रथम वरील लिंक वरून संगणक/लॅपटॉप व मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या.
2.मोबाईल मध्ये सर्व प्रथम हॉटस्पॉट ऑन करा.
3.संगणक/लॅपटॉप मध्ये तुमच्या मोबाईल चे नाव येईल तिथे क्लीक करा (wifi जोडणी)
4.मोबाईल मधले सॉफ्टवेअर उघडा तिथे तुम्हला तुमच्या संगणकाचे/लॅपटॉप चे नाव जिथे दिसेल तिथे क्लीक करा.क्लीक केल्यानंतर आपणास खालील प्रमाणे चित्र दिसेल त्याचा अभ्यास करा.
आपणास शुभेच्छा
तांत्रिक अडचणीसाठी comment box मध्ये प्रतिक्रिया द्यावी
No comments:
Post a Comment