THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 6 January 2020

तंबाखूमुक्त शाळा



सलाम मुंबई फाउंडेशन आणि प्राथमिक माध्यमिक
 शिक्षण विभाग ,महाराष्ट्र आयोजित
          
     तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था उपक्रम
  2017-2018

 तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्थेचे ११ निकष :

१. शैक्षणिक संस्थेत तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन विद्यार्थी ,शिक्षक कर्मचारी व अभ्यागत ह्यांकडून करण्यास बंदी असणे .
पुरावा –जनजागृती  कार्यक्रम सभा ह्यामध्ये उपस्थित असणार्‍यांच्या स्वाक्षर्‍या ,अहवाल

२. धूम्रपान निषिद्ध क्षेत्र येथे धूम्रपान करणे अपराध आहे असा ६० ३० से.मी. आकाराचा फलक शैक्षणिक संस्थेत  महत्वाच्या ठिकाणी लावलेले असणे
पुरावा- फलकाचा फोटो

३. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याची विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी व अभ्यागत ह्यांना माहिती व्हावी ह्यासाठी शैक्षणिक संस्थेत पोस्टर्स घोषणा नियम लावलेले असणे .
पुरावा – पोस्टर्स नियम घोषणा यांचे फोटो

4. शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापकाकडे तंबाखू नियंत्रण कायदा 2003 आणि अध्यादेश ह्यांच्या प्रत असणे.
पुढील वेबसाइट वर कायद्याची प्रत उपलब्ध होईल 
http://www.searo.who.int/india/tobacco/guidelines law enforcers implementation tobaccocontrol law.pdf?ua=1
पुरावा – कायद्याच्या प्रती सोबत मुख्याध्यापकांचा फोटो

5 शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखू जन्य पदार्थावर पूर्णत बंदी  असणे आणि शैक्षणिक संस्थेच्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ फलक असणे
पुरावा –फलकाचा फोटो

6. शैक्षणिक संस्थेने शालेय आरोग्य उपक्रमात तंबाखू नियंत्रण कार्यक्र्माचा अंतर्भाव केलेला असणे
पुरावा – आरोग्य अधिकारी उपक्रम घेतांनाचा फोटो

7.शैक्षणिक संस्थेत जे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी तंबाखू नियंत्रणासाठी हिरीरीने भाग घेत आहेत त्यांचे मुख्याध्यापकाकडून प्रमाणपत्र आणि अॅवार्ड देऊन त्यांचा जाहीर सत्कार केला असणे
पुरावा- सोहळ्याचा फोटो

8 तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त राज्य सल्लागार प्रतिंनिधी /तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी ह्यांची संबंधित कामासाठी मदत घेतलेली असणे.
पुरावा – पत्रव्यवहारची फोटोकोपी सलग्नं रित्या आयोजित केलेल्या उपक्र्माचा  फोटो

9 तंबाखू विरोधी संदेश शैक्षणिक संस्थेच्या स्टेशनरीवर लिहिलेले/चिकटवलेले  असणे
पुरावा –संदेश लिहीलेल्या स्टेशनरीचे  फोटो

10.शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करण्यात येणे आणि समितीच्या त्रैमासिक  बैठका आयोजित होणे .
पुरावा – समिति स्थापनेच्या नोंदी व अहवालाची नोंदवही

11. शैक्षणिक संस्थेच्या मुख्यप्रवेश द्वाराजवळ तंबाखूमुक्त शाळा किवा तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था परिसर असा  फलक लावला असणे 
पुरावा –फलकाचा फोटो तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा फोटो कार्यक्रमाच्या बातम्या वर्तमानपत्रातील कात्रणे .

 आपली शाळा तंबाखूमुक्त झाल्यावर दस्त ऐवजसहित अहवाल सलाम मुंबई फौंडेशनला पुढील     
 पत्त्यावर पाठवावा
  
 पत्ता : निर्मल बिल्डिंग नरीमन पॉइंट मुंबई 400021 दूरध्वनी 022-61491900

No comments:

Post a Comment