THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 6 January 2020

सुट्टीतील उपक्रम

सुट्टीचा मनमुराद आनंद असा घ्या
माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनो! सुट्टी पडली.हुश्श! संपली परीक्षा....असेच तुम्हाला वाटत असेल. हात आकाशाला लावावेत की पंख पसरून हुंदडावे,हे करू का ते करू असे झाले असेल.
हो तुमच्या मनाप्रमाणे करू. तुमच्या विहरण्याला एक अचूक दिशा देऊ या. ही सुट्टी म्हणजे नवं काही चांगल शिकायची संधी आहे हे लक्षात घेवूनच लहान पण महान असे उपक्रम,कृती स्वानंदाने राबवूया .....!
अशा काही उपक्रम, कृतीची यादी :-
१. सतत टि.व्ही, मोबाईल, संगणकावर खेळ खेळू नका. त्यापेक्षा प्रत्यक्ष बागेत, मैदानात सवंगडयासोबत खेळा.घाम गाळा.
२. .whatsapp वर संदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष नातेवाईकाना सस्नेह भेट द्या. प्रेमाने विचारपूस करा.दूरच्या नातेवाईकाना स्वहस्ते पत्रलेखन करा.
३. सुट्टी आहे म्हणून अंथरुणात उशिरापर्यंत लोळत पडण्यापेक्षा लवकर नियमितपणे उठा. सकाळचा सूर्योदय अनुभवा.शेतीची कामे स्वानुभवाने जगा.
४. .वहीची शिल्लक पाने शिवून पुढील वर्षीसाठी नवीन वही बनवा. सोबत भावडांनाही घ्या. कागदी पिशव्या बनवा व वापरा.
५. ह्या ऋतुतील भरपूर फळे खा व बियांचा संग्रह करा.मित्रपरिवारालाही सांगा.जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्या बिया जवळच्या डोंगर, टेकडी, माळरानावर खड्डे खणून रुजत घाला. प्रवासात येता जाता ह्या बिया उधळा व पुढील हिरव्या वनश्रीसाठी समृद्ध करा.
६. गावी मोठयांच्या साहाय्याने पोहायला शिका. मातीशी नाते जोडा. मातीचे किल्ले, कलाकृती बनवा.
७. वाचन करा. आजी आजोबांच्या जवळ बसून त्यांना वर्तमानपत्र , पुस्तके, पोथी वाचून दाखवा.
८. पाणी वाया न घालवता झाडांना घाला. तेच आपले जलजीवन आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प सोबत्याच्या साहाय्याने राबवा.
९. इंग्रजी, मराठीत स्वतःची दैनंदिनी, स्वतःचे अनुभव , विचार मांडण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करा. स्वतःच स्वतःला समृद्ध करा व इतरांनाही विकसित करा.
१०. “ जुन ते सोन”.जुन्या बाटल्या , सिडी, टायर, जुन्या साड्या,ओढणी अशा विविध वस्तूपासून सुशोभनाच्या वस्तू बनवता येतील.
११. मुक्तपणे चित्र रेखाटा व स्वतःला अभिव्यक्त करा. कचरा व्यवस्थापन करा. खत तयार करा.
१२. सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून , सकाळीच उठून पक्षी किलबिलाट, निसर्गाचा आवाज ऐका. निसर्गाच्या जवळ जा, अनुभव घ्या.
१३. भांवड, सोबती , पालकांशी नियमितपणे संवाद साधा. विविध चांगले छंद जोपासा.
उन्हाळी सुट्टी आपल्यासाठी एक स्वतःची space आहे. स्वतःला विकसित करण्यासाठी . नवं काही चांगल शिकायची संधी आहे.
नाविन्याचा शोध घ्या आणि ह्या नाविन्याची जोड जूनमध्ये येणाऱ्या शैक्षणिक प्रवाह....अनुभवाला द्या.
अनुभवाची क्षितिजे विस्तारा!

No comments:

Post a Comment