सावित्रीबाई फुले
स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
Download audio klip
👉👉मी सावित्रीबाई फुले बोलतेय
👉👉मी सावित्रीबाई फुले बोलतेय
CONTENTS
स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८६ वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात जीवनपट…
सावित्रीबाईंचा जन्म
क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोबा सिदूजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रुपाने झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व इनामदार घराणे होते. माई या त्यांचे पहिले अपत्य होत्या. माईंना सिंदूजी, सखाराम आणि श्रीपती हे तीन लहान भावंडे होती.
विवाह
फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) मध्ये नायगांवला तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला. त्यावेळी माईंचे वय अवघे नऊ वर्षे तर तात्यांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले. फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
पहिल्या मुख्याध्यापिका
तात्यासाहेब फुले हे शेतात काम करता करता फावल्या वेळात आंब्याच्या झाडाखाली त्यांची विधवा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागार व सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत असत. त्यानंतर मिसेस मिचेल यांनी सगुणाबाई व माईंची परीक्षा त्यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये 1846-1847 मध्ये तिसऱ्या इयत्तेत प्रवेश दिला. या दोघींनीही इ.स.1846 -47 मध्ये चौथे वर्षे पूर्ण केल्यावर त्यांना प्रशिक्षीत शिक्षिका व मुख्याध्यापक बनवले.
मुलींची प्रथम शाळा
1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात प्रथम शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून त्यात
- अन्नपुर्णा जोशी
- सुमती मोकाशी
- दुर्गा भागवत
- माधवी थत्ते
- सोनू पवार
- जनी कार्डिले या चार ब्राम्हण एक मराठा व एका धनगर जातीच्या मुलींना प्रवेश दिला.
सावित्रीबाईंनी 15 मे 1848 ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी प्रथम शाळा काढून 1 मे 1849 ला पुणे येथील उस्मानशेख वाड्यात प्रौढासाठी शाळा काढली. त्या शैक्षणिक प्रचार आणि प्रसार करतात, त्यांच्या या कृत्यामुळे सनातन्यांकडून माईंना नेहमीच अंगावर शेण -दगड झेलून घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागत. म्हणून माई नेहमी सोबत दोन लुगडे ठेवत असत. इतका त्रास देऊनही माई आपल्या हातातील शैक्षणिक कार्य सोडत नाहीत, हे लक्षात आल्यावर सनातन्यांनी भाडोत्री मारेकरी पाठवले. मात्र त्याचा परिणाम उलट झाला. त्यातील धोंडिराम कुंभार हा तात्यासाहेबांच्या प्रेरणेने पंडित झाला त्याचे "वेदाचार" हे पुस्तक फार गाजले, तर रामोशी रोडे हा "भक्षकच " तात्याचा रक्षक झाला.
अशाप्रकारे शुद्र-अतिशुद्राना शिक्षण देत असल्याच्या कारणाने तात्यासाहेबांना व माईंना इ.स. 1849 ला गृहत्याग करावा लागला. तसेच 14 जानेवारी 1852 मध्ये महिला सेवा मंडळातर्फे पहिला तिळगुळ सभारंभ साजरा केला. तर 16 नोव्हेंबर 1852 ला मेजर कँडीच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याचा इंग्रज अधिकाऱ्याकडून शैक्षणिक कार्यात उल्लेखणीय कार्य केल्याबद्दल गौरव केला. इ.स. 1848 - 1852 या काळात पुणे, सातारा, नायगांव, नगर, ओतुर, सासवड, भिंगार, मुंढवे, शिरुर, शिरवळ, हडपसर, तळेगांव इत्यादी 18 ठिकाणी शाळा तर 1 डिसेंबर 1854 ला अध्यापक शाळा काढली. तसेच इ.स.1855 मध्ये कामगारांच्या व शेतकऱ्यांसाठी रात्रशाळा काढली.
अशाप्रकारे शुद्र-अतिशुद्राना शिक्षण देत असल्याच्या कारणाने तात्यासाहेबांना व माईंना इ.स. 1849 ला गृहत्याग करावा लागला. तसेच 14 जानेवारी 1852 मध्ये महिला सेवा मंडळातर्फे पहिला तिळगुळ सभारंभ साजरा केला. तर 16 नोव्हेंबर 1852 ला मेजर कँडीच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याचा इंग्रज अधिकाऱ्याकडून शैक्षणिक कार्यात उल्लेखणीय कार्य केल्याबद्दल गौरव केला. इ.स. 1848 - 1852 या काळात पुणे, सातारा, नायगांव, नगर, ओतुर, सासवड, भिंगार, मुंढवे, शिरुर, शिरवळ, हडपसर, तळेगांव इत्यादी 18 ठिकाणी शाळा तर 1 डिसेंबर 1854 ला अध्यापक शाळा काढली. तसेच इ.स.1855 मध्ये कामगारांच्या व शेतकऱ्यांसाठी रात्रशाळा काढली.
कवितासंग्रह
1854 साली माईंचा काव्यफुले नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यात 41 पैकी 12 कविता मोडी लिपीत आहेत. अंधश्रद्धेवर कविता लिहिताना सावित्रीबाई लिहितात.
नवस करिती ! बकरु मारीन
बाळ जन्मी ! धेंडे मुल देती
नवसा पावती ! लग्न का करती ! नर - नारी !!
(दगडधोंडे जर मुले देत असतील तर स्त्री-पुरुषांना लग्न करण्याची
गरजच काय ?)
पिण्याच्या पाण्यासाठी अस्पृश्यांना किती भयानक संघर्ष करावा लागतो हे लक्षात येताच तात्यांनी आपल्या घरातील हौद 1868 साली अस्पृश्यांसाठी खुला केला. 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची समाजाची स्थापना करुन 25 डिसेंबर 1873 ला बिनहुंड्याचा व बिनभटाचा मंगलपरिणय केला. 1873 मध्ये अहमदनगरला पूर आल्याचे समजताच माईंनी 325 रुपये देणगी दिली व त्यावेळी सोन्याचा भाव 15 रुपये तोळे असा होता.
इ.स.1874 साली काशीबाई नावाची दुसरी महिला आत्महत्या करायला गेल्याचे तात्यांना समजताच त्यांनी तिला स्वत:च्या घरी आणले. तसेच तिच्या बाळंतपणाची सर्व काळजी माईंनी स्वत:च्या मुलीप्रमाणे घेतली. तिच्या मुलाला आपलाच मुलगा समजून दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. नावाप्रमाणे त्याला डॉक्टर बनविले व आपले व्याही ग्यानबा ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी पहिला आंतरजातीय विवाह 4 फेब्रुवारी 1879 साली सत्यशोधक पद्धतीने लावला.
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
इ.स. 1876 मध्ये भीषण दुष्काळ पडला असताना माणसे मरत होती. त्यावेळी माईंनी आपल्या मैत्रिणींच्या सहकार्याने दोन हजार रूपये वर्गणी जमा करुन 1877 ला पुणे जिल्ह्यातील धनकवडी येथे "व्हिक्टोरिया बालकाश्रम’ उभारले व तेथे अन्नछत्र उभारुन दररोज 1000 मुलांना जेवणाची व इतर मदत केली.
नाभिकांचा ऐतिहासिक संप
त्यावेळी विधवा महिलांचे केशवपन करून त्यांना विद्रुप केले जाई. त्यामुळे नारायण बंधु लोखंडे यांनी आपल्या दिनबंधु या वृत्तपत्रात 23 मार्च 1890ला आवाहन करुन नाभिकांचा ऐतिहासिक संप घडवून आणला.
तात्या अनंतात विलिन
28 नोव्हेंबर 1890 रोजी तात्यासाहेब यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी तात्यांच वय 63 वर्षे 7 महिने 17 दिवस होते. नेहमीच त्यांच्या कार्याला विरोध करणारे तात्यांचे नातेवाईक महादजी व बालाजी फुले यांनी संपत्तीच्या लोभापायी दत्तकपुत्र यशवंत यास विरोध केला. त्यावेळी माईंनी स्वत: हातात टिटवे घेऊन तात्यांच्या शवास अग्नी दिला. तात्यासाहेंबांची इच्छा होती की त्यांना मिठात घालून पुरावे व त्याकरिता त्यांनी अगोदरच तसा खड्डाही खोदून ठेवला होता. परंतु पुणे महानगरपालिकेने परवानगी नाकारल्याने त्यांना अग्नी द्यावा लागला. त्यानंतर इ.स. 1890 ते 1897 पर्यंत तात्यांच्या कार्याची धुरा सांभाळली. इ.स. 1893 मध्ये सासवड येथील सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
प्लेगची साथ
इ.स. 1897 पुणे व परिसरात प्लेगची साथ पसरल्याने इंग्रज सरकार कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नाही, हे लक्षात आल्यावर माईंनी ग्यानबा ससाणे यांच्या धनकवाडी-घोरपडी येथील मोकळ्या जागेत प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. रुग्णांकरिता हॉस्पिटल काढून डॉ. यशवंतला नगरहून रजा काढून बोलावले व रुग्णाची सेवा करायला सांगितले.
मुंढवा येथील प्लेग पिडीत रुग्ण पांडुरंग बाबाजी गायकवाड या बौद्ध वस्तीतील मुलाला पाठीवर घेऊन यशवंतकडे घेऊन जात असताना त्यांना प्लेगचा संसर्ग झाल्याने 10 मार्च 1897 रोजी रात्रौ 9 वाजता वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी माईंचे वय 66 वर्षे 2 महिने 7 दिवस होते.
अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तसेच प्रतिभावंत कवयित्री महाराष्ट्रातील प्रथम शिक्षीका, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंती दिनानिमित्त त्यांनी अभिवादन.
No comments:
Post a Comment