THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 28 January 2018

स्मार्ट टिचर

स्मार्ट टिचर

              आज ई-लर्निंग सुविधा बहुतेक शाळांमध्ये कॉम्प्युटर, प्रोजेक्टर आणून सुरु झालेली आहे. तसेच अनेक शाळांमध्ये ई-लर्निंग सुुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये प्रामुख्याने खाजगी कंपनीने तयार केलेला अभ्यासक्रमच वापरला जातो. या मध्ये अनेक उणीवा शिक्षकांना अध्यापन करताना जाणवतात. परंतु पर्याय नसल्यामुळे शिक्षकांना तोच अभ्यासक्रम वापरावा लागतो. पण जर स्मार्ट टिचर असतील तर ते स्वत: अनेक शैक्षणिक गोष्टी त्यात तयार करतील . 
              यामध्ये प्रामुख्याने , ऑनलाईन टेस्ट तयार करणे,  शैक्षणिक व्हिडिओ तयार करणे, शाळेचा ब्लॉग तयार करणे, शैक्षणिक सॉप्टवेयर तयार करणे, पावर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे यासारख्या अनेक गोष्टी शिक्षकांना करता आल्यास स्मार्ट टिचर तयार होतील. व विदयार्थ्यांसाठी  ई-लर्निंग सुविधेचा वापर करुन दर्जेदार शैक्षणिक अध्ययन- अनुभव देवू शकतील. यासाठी सर्व शिक्षकांना उपयोगी येतील अशा अनेक गोष्टींची निर्मिती कशा प्रकारे करावी याची माहिती याठिकाणी करुन देण्यात येणार आहे.

ऑनलाईन टेस्ट तयार करणे -
1. प्रथम www.classmarker.com ही वेबसाईट ओपन करावी. त्यानंतर खालील स्क्रीन दिसेल.


2. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या Register free  वर क्लिक करावे.


3. वर पिवळया बाणाने दाखविलेल्या For educational use  वर क्लिक करावे.



4. त्यानंतर वरील फॉर्म ओपन होईल . त्यात सर्व माहिती भरावी युझर आयडी व पार्सवर्ड लक्ष्यात ठेवावा. व Register वर क्लिक करावे.

5. त्यानंतर युझर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिन करावे. 

6. खालील विंडो ओपन होईल त्यात Test वर क्लिक करावे.


7. खाली पिवळया बाणाने दाखविलेल्या New Test वर क्लिक करुन ऑनलाईन टेस्ट करावी.


8. अशा प्रकारे तुमची ऑनलाईन टेस्ट तयार झाल्यावर त्याची लिंक देवून ती टेस्ट तुम्ही तुमच्या वेबसाईटवर, ब्लॉगवर देवू शकता.


लवकरच ब्लॉग तयार करण्यास शिकूया...........

No comments:

Post a Comment