आदर्श शाळा
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा वाढलेली आहे. यात आपल्या शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. त्यासाठी अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. तुमच्या शाळेत राबविल्या जाणा-या उपक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी तसेच तुमचे उपक्रम सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहचवून त्यांनाही नवीन काही करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून या पेजची निर्मिती करण्यात आलेली आहे. तुम्ही तुमच्या शाळेत राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती , फोटो mahazpschool@gmail.com वर पाठविल्यास ते या ठिकाणी सर्व शिक्षकांसाठी उपलब्ध करुन दिले जातील.
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव, ता-अंबड, जि-जालना.
उपक्रम- के-क्लास
आज माहिती-तंञज्ञानाने संपूर्ण जग एका बोटाच्या क्लिकवर उपलब्ध करुन ठेवले आहे. विदयार्थ्यांना या तंञज्ञानाचा अविष्कार त्यांच्या डोळयासमोर असावा तसेच या तंञज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात समावेश करुन घेवून ही प्रक्रिया जीवंत बनवावी. या साठी शाळेत के-क्लास सुरु करण्यात आला.
सूर्य, ग्रह, तारे, परिवलन, परिभ्रमन , ऐतिहासिक किल्ले, लेणी, नाणे, ताम्रपट , हदय, रक्तवाहिन्या, रोगजंतू, कवितांच्या चाली, संभाषण, प्राण्यांचे आवाज, गणिती आकृत्या , क्षेञफळ, घनफळ संबोध, तसेच इतर सहशालेय माहितीचा खजिना या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या समोर ठेवावा, त्यांनीही शहरी भागातील शाळेप्रमाणे सर्व सुविधायुक्त शिक्षण घ्यावे , अध्ययन-अध्यापनातून अनेक संबोध चिरकाल त्यांच्या स्मरणात राहावेत असे तंञज्ञान शाळेत आणण्याचे शालेय व्यवस्थापन समिती तत्कालीन अध्यक्ष श्री कल्याणराव तार्डे तसेच सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या विचारातून एका तंञज्ञानाची निवड केली. त्याव्दारे शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी या निर्णयाचा खूप फायदा झाला. या तंञज्ञानामध्ये अतिशय अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत यामध्ये ओव्हर हेड प्रोजेक्टर, इन्फ्रारेड पेन, संगणक , माऊस, की-बोर्ड, इंटरअक्टिव बोर्ड यांच्या मदतीने प्रभावी अध्यापन करता येवू शकते.
स्काऊट - गाईड
शाळेत स्काऊट-गाईड पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सणांच्या दिवशी या पथका द्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना दिली जाते. या पथकासाठी श्री नरसाळे एस.एच. हे मार्गदर्शन करत आहेत.
जि.प.प्राथमिक शाळा किनगाव, ता-अंबड, जि-जालना.
उपक्रम- के-क्लास
आज माहिती-तंञज्ञानाने संपूर्ण जग एका बोटाच्या क्लिकवर उपलब्ध करुन ठेवले आहे. विदयार्थ्यांना या तंञज्ञानाचा अविष्कार त्यांच्या डोळयासमोर असावा तसेच या तंञज्ञानाचा अध्ययन-अध्यापनात समावेश करुन घेवून ही प्रक्रिया जीवंत बनवावी. या साठी शाळेत के-क्लास सुरु करण्यात आला.
स्काऊट - गाईड
शाळेत स्काऊट-गाईड पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय सणांच्या दिवशी या पथका द्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना दिली जाते. या पथकासाठी श्री नरसाळे एस.एच. हे मार्गदर्शन करत आहेत.
No comments:
Post a Comment