THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 18 January 2018

कला विभाग

कला विभाग



कला विषयात सहा कलांचा समावेश होतो .या कलांची तीन गटात विभागणी केली आहे .
१) चित्र -शिल्प : दृक/दृश्य कला
२) नृत्य -नाट्य : श्राव्य /प्रायोगिक कला
३) गायन -वादन : श्राव्य /प्रायोगिक कला

कला शिक्षणाचे ध्येय :
                     कलांच्या माध्यमातून बालकाचा सर्वांगीण विकास करणे .

कला शिक्षणाचे उद्दिष्टे :
१.कलेबद्दल आवड निर्माण करणे .
२.मुक्त अभिव्यक्तीचा आनंद उपभोगण्याची संधी उपलब्ध करून देणे .
३.संवेदनक्षमता जोपासणे.
४.सुप्त कलागुणांना अविष्काराची संधी देणे .
५.कल्पकता व शोधकवृत्ती विकास .
६.जीवनाबद्दल सौंदर्यवादी दृष्टिकोन निर्माण करणे .
७.कलेच्या माध्यमातून संस्कृती संवर्धनास साहाय्य करणे .

           
                पाठ्यक्रम
         
             (१) चित्र - शिल्प

* चित्र (द्विमित) -
1.रेखांकन - रेषा ,मानवाकृती,प्राणी ,पक्षी,वाहने यांचे रेखांकन .
2.स्मरण चित्र - शालेय जीवनाशी , घराशी ,सामाजिक जीवनाशी ,परिसराशी संबंधित विषयावर चित्रण.
3.संकल्प चित्र - मूळ आकार व त्यापासून तयार होणाऱ्या भौमितिक ,नैसर्गिक ,अलंकारिक आकारांचा वापर करून संकल्प रचना तयार करणे .
4.स्थिर चित्र -निसर्गनिर्मित,मानवनिर्मित तीन ते चार वस्तू समुहांचे चित्रण.

* शिल्प (त्रिमित) -
1.कागदकाम - कागदाच्या लगद्यापासुन बाहुल्या ,खेळणी, प्राणी ,पक्षी ,फळे इ.             कागदाच्या तुकड्यापासुन भांडी व मुखवटे.
2.मातीकाम - मातीपासुन पदक,बिल्ला, नाणे, मानवाकृती, पक्षी, प्राणी इ.तयार करणे.


               (२) नृत्य -नाट्य

१.मुक्ताविष्कार आणि पारंपारिक नृत्य कलेतील साम्य -भेद
२.समुहनृत्य सादरीकरण
३.नृत्याचे बोल व नृत्यरचना यांतील समन्वय .
४.नृत्यात्मक हालचाली व व्यायाम यांची माहिती .
५.नाटकाच्या इतिहासाची माहिती .
६.एकपात्री स्वगते व नाट्यछटा.
७.रंगमंचावरील हालचाली .
८.नाट्यलेखनास प्रवृत्त करणे .
९.वेशभुषा व रंगभुषा याबद्दलची माहिती .
१०.नाटिका व नाट्यप्रवेश लिहिणे.
११.भूमिका सादर करणे .
१२.उत्स्फूर्त अभिनय करणे .


            (३)गायन - वादन
१.स्वर आणि राग, लय आणि ताल या संकल्पना स्पष्ट करणे .
२.रागांची सरगम शिकविणे व वेगवेगळ्या तालांत या रागांच्या बंदिशींचे गायन करण्यास शिकविणे.
३.विलंबित, मध्य, द्रुत लय हे प्रकार प्रात्यक्षिकासह स्पष्ट करणे .
४.हार्मोनियम या वाद्याची माहिती देणे .
५.पाठ्यपुस्तकातील कविता वैयक्तिकरित्या गाता येणे.
६.रागांवर आधारित पाठ्यपुस्तकातील गीते वैयक्तिकरित्या गाता येणे.
७.रेडिओवर लागणाऱ्या चालीत वंदे मातरम् म्हणणे.





No comments:

Post a Comment