THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 17 January 2018

मुख्याध्यापकांची कामे- RTE-2009 नुसार

मुख्याध्यापकांची कामे- RTE-2009 नुसार

RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे


१) वयाचा पुरावा नसतांनाही बालकास शाळेत प्रवेश दयावा. 
 शाळेत दाखल करतांना पालकाजवळ वयाबाबतचा सक्षम पुरावा नसतांना सुदधा मुख्याध्यापकांनी मुलास पालकाच्या प्रतिज्ञा पत्रावरून दाखल केले पाहिजे.

२) बालकास वर्षभरात केव्हाही प्रवेश देणे.
    बालकाला त्याच्या सोईनुसार जेथे सोईस्कर वाटेल तेथे त्याला शैक्षणिक सत्रात केव्हाही प्रवेश दयावा.

३) विदयार्थ्याचे स्थलांतरण– 
पालकाचे अथवा बालकाचे कोणत्याही कारणस्तव स्थलांतर झाल्यास
विदयार्थ्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यात यावा. देतांना विदयार्थी जेथे शिकू इच्छीत आहे तेथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमतीपत्र घ्यावे. असे संमतीपत्र प्राप्त होताच संबंधीत मुख्याध्यापकांनी त्वरित शाळा सोडल्याचा दाखला हस्तांतरण करावा.

४) वयानुसार प्रवेश- 
एखादा बालक दुस-या ठिकानावरून गावात राहण्यासाठी येत असेल तर त्याला त्याच्या वयोगटानुसार प्रवेश दयावा. नंतर त्याचा दाखला मिळत असल्यास प्रयत्न करावे. बालक पुन्हा शाळाबाहय होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे.

५) विशेष गरजा असलेल्या बालकाचे शिक्षण–
 विशेष गरजा असलेल्या बालकास प्रवेश देवून त्याच्या गरजाकडे विशेष लक्ष पुरविण्यात यावे. त्यास उनीव भासवू नये.

६) वंचित व दुर्बल घटकातील बालकाचे प्रवेश व शिक्षण-
  वंचित व दुर्बल घटकातील बालकास शिक्षण हक्क अधिनीयम २००९ अन्वये २५% प्रवेश देण्याचे बंधन प्रत्येक शाळांवर लागु आहे. व शिक्षणाबाबत उदासीन धोरण ठेवू नये. तसेच सामाजिक व आर्थिक
दरी निर्माण होईल असे भासविता कामा नये. इतर बालकासोबत त्यालाही समान संधी देण्यात याव्यात.

७) बालकाचे सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन–
 या कायदयानुसार यापुढे कोणत्याही बालकास मागे ठेवता येणार नाही. त्यामुळे त्याला पुढील वर्गात
प्रवेश देतांना मागील वर्गातील अपेक्षीत संपादणुक पातळी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्या करिता
अतिरिक्त अध्यापनाची गरज असल्यास नियोजन मुख्याध्यापकांनी करावे.

८) शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य-
शिक्षण हक्क अधिनीयम २००९ अन्वये प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. समितीचे वेळोवेळी शैक्षणिक विकासाकरिता आढावा बैठकी बोलावण्यात याव्या व त्याप्रमाणे नियोजन करावे.

९) शालेय आपत्ती व्यवस्थापन–
अ)नैसर्गिक आपत्ती –
१) भुकंप २)महापूर ३) वादळे ४) वीज कोसळणे ५) वणवा लागणे ६) दरड कोसळणे ७) वृक्ष कोलमडणे ८)त्सुनामी लाटा ९) प्राण्यांचा हल्ला होणे (उदा- कुत्रा चावणे, सर्प दंश, मधमाशी चावणे, इतर प्राण्यांपासून दुखापत होईल असे) १०) थंडीची लाट येणे ११) अतिउष्मा १२) अतिवृष्टी १३) अनावृष्टी/दुष्काळ पडणे.
ब)मानव निर्मित आपत्ती-
१) आग लागणे २) अपघात ३) विजेचा धक्का लागणे(शॉक) ४) इमारत कोसळणे ५) बॉम्ब स्फोट होणे ६)विषारी वायू गळती होणे ७) चेंगराचेंगरी होणे ८)विषबाधा होणे ९) विदयार्थी अपहरण १०) अचानक उद्भवणारे आजार (उदा-फिट,चक्कर, लखवा, मिरगी, दमा सारखे इतर)

उपाययोजना –
१) शिक्षक विदयार्थी यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन देणे.
२) विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जागृती करणे.
३) आपत्ती व्यवस्थापनावर आधारित माहितीपट दाखविणे.
४) तज्ज्ञ व्यक्तिंची व्याख्याने आयोजीत करणे.
५) स्काउट/गाईड सारख्या चमूंना विशेष प्रशिक्षण देणे.
६) एखादया तज्ञ शिक्षकाची स्पेशल नेमणुक करणे.
७) एखादा आराखडा आखून ठेवणे.
८) आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करणे.
९) विद्युत यंत्रणा, प्रथमोपचार यंत्रणा, अग्नीशामनयंत्रणा, वाळूची यंत्रणा,  पाणी यंत्रणा, सुसज्ज ठेवणे.
१०) धोकादायक बाबींची विशेष काळजी ठेवणे.
११) शालेय परिसरात ज्वालाग्रही पदार्थ तत्सम वस्तुंवर बंदी घालणे.
१२)गरजेनुसार इमारतीची दुरुस्ती करणे.
१३) येजा करणा-या विद्यार्थ्यांना सुचना देणे.
१४) वाहतुक सुरक्षा समिती गठीत करणे.
१५) पोषण आहाराजवळ सुरक्षीतता ठेवणे /पोषण आहार सुरक्षीत स्थळी ठेवणे.
१६) पालकांचा,तज्ज्ञ व्यक्तींचा, डॉक्टरांचा, वाहनधारकांचा संपर्क क्रमांक दर्शनी मांडून(लिहून) ठेवणे.

शासन निर्णय
१)२२जुलै २००४ २) ५ ऑगस्ट २००४ ३) ६ सप्टेंबर २००४

No comments:

Post a Comment