टेक्नो टिप्स
टेक्नो टिप्स
Android फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..
Android फोन अथवा टॅब्लेट हरवलाय/ चोरीला गेलाय ? शोधा तुम्हीच घरबसल्या सोप्या पद्धतीने..
आज आपण एका जबरदस्त app ची ओळख करून घेणार आहोत जे तुम्हाला तुमचा फोन / टॅब्लेट चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास शोधण्यात मदत करेल .....
अॅन्ड्रॉइड डिवाइस मॅनेजर फीचर्स ::● तुमच्या गूगल अकाऊंटने जोडलेले सर्व Android डिवाइस (मोबाइल, टॅब्लेट)शोधू शकता
● तुमच्या फोनचा Screen Unlock Pattern बदलू शकता तेही फोन प्रत्यक्ष हातात नसताना
● तुमच्या फोनवरील डाटा चोराच्या हाती लागू नये म्हणून सर्व डाटा पुसून टाकू शकता(Erase)
● तुमच्या फोनला ठराविक ठिकाणी शोधल्यानंतर नेमका कोणाकडे आहे हे समजण्यासाठी तुमच्या फोन Ring Full वॉल्यूम मध्ये वाजवू शकता तेही फोन हातात नसताना
● असाही एक पर्याय आहे ज्यात चोराला तुम्हाला फोन करण्यावाचून उपायच सापडणार नाही Call Me नावाच्या पर्यायाचा वापर करताच चोराला फोन वापरता येणार नाही व शेवटी त्याला आपणास कॉल करावाच लागणार
अॅन्ड्रॉइड डिवाइस मॅनेजर सुरू करण्यासाठी ::
Android Device Manager वापरण्याआधी तुम्हाला ते तुमच्या फोनवर सुरू (enable) करावे लागेल आणि त्याला तुमच्या गूगल अकाऊंटला जोडावे लागेल. मात्र ह्या App साठी फोनमध्ये इंटरनेट सुरू असायला हवे.
आणि हे app स्वतः गूगलने डेवलप केलेलं असल्यामुळे ह्याच्या इतका अचूक रिजल्ट दुसर्या कोणत्याही app मध्ये मिळणार नाही व दुसर्या कोणत्याही एकस्ट्रा app ची गरजही पडणार नाही
Android Device Managerतुमच्या फोन अथवा कोणत्याही अॅन्ड्रॉइड डिवाइसवरती सुरू करण्यासाठी खालील सुचनांनुसार सेटिंग्स करा.
- तुमच्या डिवाइस च्या App Menu मधून गूगल सेटिंग्स उघडा .
- त्यात Android Device Manager निवडा
- तुम्हाला खालील पर्याय दिसतील ज्यातील ज्याची तुम्हाला गरज आहे ते पर्याय तुम्ही निवडू शकता :
Remotely locate this device :: तुम्ही Android Device manager तुमच्या डिवाइसची लोकेशन पहाण्यासाठी वापरू शकता. त्यासाठी ह्या ऑप्शन समोर असलेल्या बॉक्सवर टिक करा
For devices running 4.1 and higher: Location access सुद्धा सुरू असलेला हवा. तो सुरू करण्यासाठी,
Google Settings > Location आणि “Location” समोरील बटन सुरू करा.
Allow remote lock and factory reset :: तुम्ही Android Device Manager तुमच्या डिवाइसला रीमोटली लॉक करण्यासाठी वापरू शकता जेजेकरून तुमचं फोन हरवल्यास त्यातील महत्वाचा डाटा कोणाच्या हाती लागू नये. ह्या पर्यायाने तुम्ही डिवाइस लॉक करू शकता, त्यातील डाटा पुसून टाकू शकता, Screen Unlock Pattern सुद्धा बदलू शकता. त्यासाठी Allow Remote Lock and factory reset ऑप्शन वर टिक करा आणि त्याला ऑन करा.
ज्यावेळी “Activate device administrator” स्क्रीन डिस्प्ले होईल,तेव्हा स्क्रीनवरील सूचना वाचून Android device administrator अॅक्टिवेट करा.
तुमचा फोन ट्रॅक करण्यासाठी, लॉक करण्यासाठी, डाटा इरेज करण्यासाठी, पासवर्ड बदलण्यासाठी किंवा त्या फोनल तुम्हाला कॉल कर म्हणून सांगण्यासाठी खालील २ पर्याय आहेत ज्यासाठी तुम्हाला तुमच्या गूगल अकाऊंटची गरज पडेल.
- Android Device Manager on Web : वेबसाइट वरून कम्प्युटर वापरुन
- Android Device Manager on Android App on Play Store : हे app वापरुन तुम्ही मित्राच्या फोनवरून तुमचा फोन ट्रॅक करू शकता मात्र तुमच्या गूगल अकाऊंटवरूनच .
वेबसाइटच्या माध्यमातून ट्रॅक करण्यासाठी ह्या वेबसाइट वर जा
तिथे गूगल अकाऊंटने लॉगिन करून तुम्ही अगदी सहज तुमचा हरवलेला फोन लोकेट करू शकाल
आणि दुसरी पद्धत जिच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मित्राच्या फोनवर app इंस्टॉल करा
ह्या App च्या सोबत तुमच्या गूगल अकाऊंटने लॉगिन करून त्या सर्व गोष्टी करता येतील ज्या तुम्ही Android Device Manager च्या वेबसाइटवरून करू शकता.
सारांश तुमचं android डिवाइस हरवण्याच किंवा हरवल्यानंतरच टेंशन नक्कीच कमी झालं असणार.
हा लेख मित्रांसोबतसुद्धा शेअर करा आणि त्यांनाही हे App नक्की घ्यायला सांगा जेणेकरून सर्वांनाच मदत होईल त्यांचा हरवलेला फोन शोधण्यात.....
जर ह्या App ने सुद्धा तुमच्या फोनला शोधण्यात अपयश येत असेल तर तुमच्या फोनचा IMEI क्रमांक जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा तेच तुमची मदत करू शकतील.
मोबाइलचा unlock pattern विसरलात का ?
मोबाइलचा unlock pattern
विसरलात का ?
या वेळी तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत
1) Give Google Account Username and Password
पाच वेळा unlock pattern चा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला येथे एक Forgot pattern चा पर्याय दिसतो. येथे क्लिक करुन तुम्ही तुमचा Gmail चा username आणि password देऊन ता unlock pattern reset करु शकतात. पण जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर खालील शेवटचा पर्याय शिल्लक राहतो.
2) Factory
जर तुम्ही तुमचा Gmail चा पासवर्ड देखील विसरलात तर तर तुम्हाला तुमचा मोबाईल Factory reset करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. पण त्याने मोबाईल मधील सर्व डाटा नष्ट होईल, कॉन्टॅक्टस्सुध्दा.
Factory reset करण्यासाठी खालील स्टेप्स कराव्यात
मोबाईल बंद करावा.
- Volume UP+Home+Power बटन्स एकाच वेळी प्रेस करावे. (For HTC One: VolumeDown+Power, For Google Nexus 4: VolumeDown+Power)
- आता Recovery mode आलेला दिसेल.येथे Volume key चा वापर करुन “Wipe Data/ Factory Reset” हा पर्याय सिलेक्ट करावा.
- Conformation झाल्यानंतर मोबाईल factory reset होऊन restart होतो.
- आता तुम्ही परत unlock pattern सेट करु शकता.
No comments:
Post a Comment