THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 17 September 2017

👉 _*शुन्यातून विश्व निर्माण करणारी प्रेरणादायी चरित्र…! (भाग - 2)*_

_*
1) _*ग्रेटा गार्बो*_ (अमेरिकन चित्रपट अभिनेत्री) : त्यांचा जन्म गरीब शेतकर्‍याच्या घरात झाला. त्यांना तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हॉलीवुडचे दरवाजे उघडले.

2) _*चार्ली चॅपलिन*_ (कॉमेडियन आणि चित्रपट दिग्दर्शक) : त्यांनी प्रचंड गरिबी अनुभवली. विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली. पुढे जाऊन त्यांनी आपल्या विनोदाने जगभरातील लोकांना हसवले.



3) _*सुशीलकुमार शिंदे*_ (राजकारणी) : ते सोलापूरला कोर्टात शिपाई होते. कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

4) _*लक्ष्मणनराव किर्लोस्कर*_ (उद्योजक) : त्यांनी दहा वर्षे ड्रॉईंग टिचर म्हणून काम केले. पुढे जाऊन नांगराचा कारखाना निर्माण केला.

5) _*यशवंतराव गडाख*_ (राजकारणी, साहित्यिक, लेखक) : ते अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता-शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले. पुढे जाऊन वयाच्या पंचविशीत सोनईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.

6) _*धिरुभाई अंबानी*_ (उद्योजक) : त्यांचे वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता. स्वतः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते. अशा वातावरणातून त्यांनी स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले.

7) _*स्टीव्ह जॉब्स*_ (अमेरिकन उद्योजक, व्यापारी, संशोधनकर्ता आणि औद्योगिक डिझायनर) : त्यांनी कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवले. पुढे जाऊन जगातल्या मोठ्या कॉम्प्युटर कंपन्यापैकी एक ’अँपल’ ची स्थापना केली.

8) _*सुनील दत्त*_ (अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणी) : रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच त्यांचा चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. मग अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य त्यांनी जगले.

9) _*जॉनी वाँकर*_ (कॉमेडियन) : ते बस कंडक्टर होते. प्रवाशांची तिकीटे फाडता-फाडता त्यांच्या सिनेमाची तिकिटे लोकांनी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसर्‍या तिकीटावर स्थिरावला.

10) _*महेमूद*_ (अभिनेता, गायक, दिग्दर्शक आणि निर्माता) : ते ड्रायव्हर होते. चलतीका नाम गाडी, सबसे बडा रुपया म्हणायला सुरुवात केली आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वतःलाही समजले नाही.

खरंच ही प्रेरणादायी चरित्र आपल्या संघर्षमय जीवनाला जगण्याचा नवा धडा आणि नवा उत्साह देतात!


No comments:

Post a Comment